विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन
*राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त माझेरी शाळेत विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न*
ता. फलटण – जिल्हा परिषद मॉडेल स्कूल माझेरी पुनर्वसन येथे विज्ञान दिनानिमित्त भव्य विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने विविध वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित 50 मॉडेल्स सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापक रवींद्र लटींगे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शिक्षक श्री संतोष जगताप गणेश पोमणे व सौ सरस्वती भोईटे,श्री भारती शेळके -बरकडे,प्रिया निंबाळकर मॅडम, यांनी विद्यार्थ्यांची प्रदर्शनासाठी विशेष तयारी करून घेतली.तर
स्वप्नाली जाधव,दिपाली पवार, अर्चना सणस यांनी विशेष परिश्रम घेतले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विष्णू दिघे, उपाध्यक्ष उमेश झांजुर्णे,माजी सरपंच श्री ज्ञानेश्वर दिघे,माजी उपसरपंच श्री प्रवीण दिघे, ग्रामपंचायत सदस्य श्री दत्ता पवार,श्री संपत चव्हाण, श्री राहुल सूर्यवंशी यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन झाले.पालक आणि विद्यार्थ्यांची बहुसंख्येने उपस्थिती लाभली.
विद्यार्थ्यांनी सौरऊर्जा, जलचक्र, नैसर्गिक पाणी स्वच्छता, पाण्याची बचत,स्वच्छता अभियान, पर्यावरण संरक्षण, वाहतूक सिंग्नल, दिवसरात्र,हवेचे नियम,डोलणारी बाहुली,साधे यंत्र यांसारख्या विषयांवर आकर्षक मॉडेल्स सादर केली. यातील मुलांनी तयार केलेल्या डी.जे.बघत ऐकत त्यावरील गाण्यावर तर ठेकाचधरला. लहानग्या विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपल्या प्रकल्पांचे स्पष्टीकरण देत विज्ञानाविषयीची आवड आणि जिज्ञासा व्यक्त केली.
उपस्थित पालक व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता, सादरीकरण आणि आत्मविश्वास वाढीस लागल्याचे समाधान मुख्याध्यापकांनी व्यक्त करण्यात आले.





Comments
Post a Comment