पुस्तक परिचय क्रमांक:२६५








वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२६५
पुस्तकाचे नांव-कोवळे दिवस 
लेखक: व्यंकटेश माडगूळकर 
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- डिसेंबर २०१७ पुनर्मुद्रण 
पृष्ठे संख्या–१३६
वाड़्मय प्रकार-कादंबरी 
किंमत /स्वागत मूल्य-१५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२६५||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव-कोवळे दिवस 
लेखक: व्यंकटेश माडगूळकर 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
      चार भिंतीबाहेरची प्रत्येक प्रभात ही नवा उत्साह,जोम आणि नवचैतन्य घेऊन उगवत असली पाहिजे.याच समयी पाखरांना गाणे स्फुरते,कळीचे उमलून टपोरे फुल होते आणि वृक्षांना नवे धुमारे फुटतात…..

आजवर मानवजातीच्या कल्याणाचे जेजे विचार विचारवंतांना आणि प्रतिभावंतांना सुचले, उच्चारले, गाईले आणि लिहिले गेले,तेही अशाच एका मनस्वी कलाकाराचे ऐन तारुण्यातील ‘कोवळे दिवस’या कादंबरीत लोकप्रिय कथालेखक व्यंकटेश माडगूळकर तथा आदरणीय तात्यासाहेब यांच्या सिद्धहस्त लेखणीतून हे आत्मकथन रसिक वाचकांना आनंदानुभवासाठी बहाल केले आहेत.

          तात्यासाहेब म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्त्व लेखणी,वाणी आणि रंगरेषांतून नवनिर्मिती करणारे थोर साहित्यिक. या कादंबरीत त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात भूमिगत चळवळीत सक्रिय सहभाग घेऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे भूमिगत कार्यकर्ते.आपले काम निष्ठेने पुर्णत्वास नेहण्यासाठी सदैव तत्पर राहणारे व्यंकटेश माडगूळकर.यांनी ‘कोवळे दिवस’या कादंबरीत भूमिगत चळवळीतील त्यांचे योगदान शब्दबध्द केले आहे.इंग्रजांच्या शिपायांना मागमूसही दिसणार नाही.इतकं जागरूक कसं राहायचं? याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही कादंबरी होय.बालपणीचे शाळकरी मित्र आणि तारुण्यात पदार्पण झाल्यावर भूमिगत चळवळीतील काम करताना विविध गावतील इतरांच्या घरी राहताना भेटलेल्या सहवासातील व्यक्तींची व्यक्तिचित्रेही समर्पक शब्दात रेखाटली आहेत.वाचन करताना सजीव प्रसंगच आपणासमोर उघडतोय इतकं अप्रतिम लेखन केले आहे.

  लेखक तथा तात्यासाहेब म्हणतात की, “पुस्तकाच्या कपाटातील माझ्या पुस्तकांची रांग पाहून मला वाटतं, आणखी दहा वर्षांनी यातलं एक सुध्दा राहणार नाही!तरी मी लिहितोच का?” यावर ते पुढे म्हणतात की, “डॉक्टर होऊन माणसांच्या आजारावर जगणं मला नको होतं. धर्मोपदेशक होऊन त्यांच्या पापांवर जगणं मला नको होतं.वकील होऊन त्यांच्या भांडणावर जगणंही मला नको होतं.तेंव्हा आता लेखक होण्यावाचून दुसरं काहीच करायला उरलेलं नाही.’’असं जेव्हा एखादा नॅथनिल हॉथॉर्न म्हणतो, तेव्हा माझेच शब्द त्याच्या ओठांवर असतात.

 जे राजकीय गुन्हेगार कैदेत होते. ते देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते सगळेच गजांआडून बाहेर आले.तेंव्हा उघड झाले की ही सगळी लोकं भूमिगत होती. त्यांनाच सामान्य माणसं क्रांतिवीर म्हणू लागली.मग लेखकांना आग्रहाने बोलावून नेहणं.विराट सभेत भाषण करायला जाणं.अन् भूमिगत क्रांतिवीरांचा जयघोष होवू लागला. सत्कार समारंभ घडू लागले.अन् अशाच एका देशभक्ताच्या घरी त्यांची बालमैत्रिण यमू भेटली.तर मुंबानगरीत उमा भेटली. पुणे शहरात लेखक स्थिरस्थावर झाले. कथेतल्या जीवनातही योगायोग घडतो.तसं उमाचा कंगाल झालेला दादा भेटतो.
सुंदर शब्दात तारुण्यातील 'कोवळे दिवस'या कादंबरीत लेखक व्यंकटेश माडगूळकर व्यक्त झाले आहेत. रसग्रहणिय कादंबरी आहे.

परिचयक श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक- २४ जानेवारी २०२६


Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी