काव्य पुष्प मायबोली कविता
मराठी साहित्य संमेलन सातारा.... मराठी साहित्य संमेलन.. शब्दोत्सव सोहळा रंगणार अजिंक्यताऱ्याच्या अंगणी दरवळणाऱ्या शब्दगंधात न्हायला चल जाऊ सजणी | वाचनवेड्या रसिकांना मिळणार अक्षरसाहित्याच्या खरेदीची पर्वणी साहित्य संमेलनात उलगडणार माझ्या मायबोलीची कहाणी | कथाकवितांची मैफिल सजणार परिसंवादात व्याख्याने गाजणार मुलाखतीतून यशोगाथा उलगडणार लेखक कवी साहित्यिक भेटणार| आख्यानातून ओळख लोकसंस्कृतीची बहुरूपी भारुडातून महती संतजनांची ग्रंथदिंडीत पाऊले उमटणार प्रतिभावंतांची भेट ही मराठी साहित्याच्या उत्सवाची | श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा