स्मृतींच्या पाऊलखुणा


             स्मृतींच्या पाऊलखुणा 
 चार डिसेंबरला क्रांतिस्मृती अध्यापक विद्यालयातून स्वरचित काव्यवाचन सादरीकरण झाले नंतर सायंकाळी चारच्या सुमारास चालतच राजवाड्यावर आलो.
 दुसऱ्या वर्षी कॉलेजला ओझर्ड्यावरुन येऊनजाऊन करत होतो.सायंकाळी कॉलेज सुटल्यावर घरी जाण्यासाठी सातारा एस. टी. स्टॅण्डवर कधी धावत पळत,कधी भरभर चालत तर निवांत वेळ असेल तर रमतगमत.दुकानांच्या पाट्या वाचत वस्तु न्याहाळत पुढं पुढं जात असायचो.त्या दिवसांच्या आठवणी जाग्या झाल्या.त्यावेळच्या दिवसातील सुखद दुःखत क्षणांची आठवण येऊ लागली.
 मग राजवाड्यावर आल्यावर पोटात भर घालावी म्हणून नामांकित चंद्रविलास हॉटेलमध्ये पावभाजी खाऊन पुढे पंचमुखी गणेशाचे दर्शन घेतले.तदनंतर धनकेशर समोरील एका दुकानातून पांढरे रुमाल खरेदी केली.अन् शेअर रिक्षासाठी परत राजवाड्यावर जाण्याऐवजी मनात विचार आला.चला आज चालतच एस. टी. स्टॅण्डवर खालच्या रस्त्याने गुरुवार पेठतून जाऊया.मग साधारणपणे दोन किलोमीटरचे अंतर कॉलेजच्या त्या दिवसांसारखे रमतगमत पार करायचं ठरवलं आणि मार्गस्थ झालो.सुमारे चाळीस वर्षांपूर्वीच्या परीसराचा बराच बदल झालेला दिसून येत होता.बऱ्याच दुकांनाचा लुक बदलला होता.रहदारीचे प्रमाणही वाढलं होतं. चालणाऱ्या माणसांपेक्षा दुचाकीवरून धावणाऱ्या माणसांची संख्या वाढलेली होती. दुकानांच्या आरश्यात स्वता:चे रुप आशाळभूतपणे न्याहळत पुढं पुढं जात होतं.पोलिसमुख्यालयावरुन पुढे गेल्यावर डावीकडे वळून भाजी मार्केटच्या रस्त्याने दोन्ही बाजूला बरीच सुधारणा झालेली दिसून आली.किसान मशिनरी दुकानाच्या आजूबाजूला बऱ्याच दुकानांची संख्या वाढत चाललीय.आता जरा पायाची चाल मंदावली त्यामुळे संथगतीने चालू लागलो.
रस्ता रुंदावला पण खड्डे मात्र जागोजागी दृष्टीस पडत होते.खरतरं हल्लीचे रस्ते दुकानांचे अतिक्रमण आणि गाड्यांच्या गर्दीतून वाट काढत पुढे चालावे लागते. रस्त्याच्या कडेला फळांची दुकाने बघत असताना उजवीकडे कोपऱ्यावर मनाली हॉटेल होते ते सध्या बंद असलेले दिसून आले.पुर्वी इथला चिकन मसाला प्रसिद्ध होता. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या पुढून जाताना  तिथल्या ऐतिहासिक वस्तूंची आभासी पटलावर प्रतिमा तराळू लागल्या.ते संपतेय तोच राधिकारोडवरील मार्केटयार्ड चौकात तर चालणं अन् रस्ता ओलांडणे गाड्यांच्या रांगामुळे किती अवघड झालेय हे प्रकर्षाने जाणवले.वाहतूक वाढली,रस्ता दुहेरी झाला.तो ओलांडून एस. टी. स्टँडवर वाहनांच्या गोंगाटात पोहोचलो.पाय दमगीर झाल्याची जाणीव होताच फलाटावर बैठक मारली अन् सातारा-वाई बसच्या 
प्रतिक्षेत मोबाईलमध्ये पहात बसलो.
  

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी