पुस्तक परिचय क्रमांक:१७९ सहचर
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१७९
पुस्तकाचे नांव-सहचर
लेखकाचे नांव-डॉ.मंजूषा सावरकर
प्रकाशन-कुसूमाई प्रकाशन, नागपूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती
पृष्ठे संख्या–९२
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--२००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१७९||पुस्तक परिचय
सहचर
लेखक: डॉ.मंजूषा सावरकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
“क्षितिजा पल्याड जीवनाचा शोध घेण्यापेक्षा आपल्या अंगणातील अस्तित्वाचा शोध मनाला अधिक उन्नत करत असतो.”असा ब्लर्ब लेखिका डॉ. मंजूषा सावरकर यांचा आहे.आयुष्याची वाटचाल ज्या सहचरामुळे झाली.त्याच्या ओंजळीत हा कथासंग्रह दिला आहे.
सहचर म्हणजे पती.त्यांना त्यांची पत्नी ‘अहो’याच नावाने हाक मारत असते. हल्लीच्या पिढीत नवऱ्याचे नाव घेऊन हाक मारण्याची पध्दत सुरु झाली आहे.
आपल्या प्रिय पतीचा जीवनपट,त्याचे अंतरंग आणि व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू छोट्या छोट्या कथांमधून उलगडून दाखविले आहेत.पतीपत्नी व जवळचे नातलग यांच्या गुणवैशिष्ट्यांची ओळख ‘सहचर’या कथासंग्रहातून होते.लेखिका डॉ.मंजूषा सावरकर यांचा साहित्यिक परिचय समारोपात आहे.त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन केला आहे.त्यांनी आपला कौटुंबिक परिचयही नमूद केला आहे.मुखपृष्ठ आणि मलपृष्ठाच्या आतील भागात आयुष्यातील अनमोल क्षणांची रंगीत छायाचित्रे समाविष्ट केली आहेत.
कुटुंब व्यवस्थेवर मनापासून प्रेम करणाऱ्या प्रत्येक अगं आणि अहो यांना ‘सहचर’हा कथासंग्रह समर्पित केला आहे.
सहचरच्या प्रारंभी मनोगतात लेखिका डॉ. मंजूषा सावरकर व्यक्त होतात दिसतात.पतीपत्नीच्या सहजीवनातील नात्यांचा गोडवा टिकवणारा मंत्र अहो…नावाची हाळी आहे.आयुष्यभर सोबतीला असणाऱ्या दोघांत आदर आणि विश्वास असेल तरच ही नाती फुलतात.सहजीवन सुखाने जगतात.अनूभुती घेतात.एकमेकांचा आधार होतात.विश्वास संपादन करतात.
या पुस्तकात पंचवीस कथा जोडलेल्या, जपलेल्या असलेल्या मैत्रपरिवारातील,जवळच्या स्नेहाच्या तेसंबंधातील माणसांचा ऋणानुबंध जपणाऱ्या आहेत.त्यातील भावनिक प्रसंग ओघवत्या शैलीत टिपलेले आहेत.तसेच जीवनातील घडलेल्या अनेक सुखदुःखाच्या घटना प्रसंगी ‘अहो’ची होणारी घालमेल,घुसमट, त्याप्रसंगी घेतलेला निर्णय त्यांचे झालेलं दूरगामी परिणाम याविषयी अतिशय समर्पक शब्दात मांडणी केली आहे.वाचकांना आपल्या घरातीलच घटनांचे स्मरण करून देणारे यातील बहुतांशी लेख आहेत.
व्यक्तिचित्रे समर्पक शब्दात शब्दबध्द केली आहेत.जीवाचं मोल अन् नात्यांची ओल जाणून देणारा सहचर हा शब्दसखा आहे. आपल्या पतीचे अनेक घटना प्रसंगातून अंतरंगातील स्वभाव वैशिष्टे या कथांमधून ओतप्रोत भरलेली दिसून येतात. अतिशय सहज सुंदर समर्पक शब्दातून व्यक्तता केली आहे.‘अहो’विषयीलेखिका म्हणतात की, “आमचं आयुष्य अनाकलनीय घटनांनी आणि आव्हानात्मक पैलूंनी भरलेलं असलं तरी अक्षरांचं देणं कधी उणं झालं नव्हतं. जिवाभावाची माणसं जुळत गेली.वैचारीक जगणं समृद्ध होत गेलं. प्रसिध्दी आणि पैशाचा हव्यास असणाऱ्या आजच्या बरबटलेल्या समाज व्यवस्थेत स्वच्छपणे जगता येण्याचे भाग्य आमच्या वाट्याला आले.पैशापेक्षा विचारांची कर्तृत्वाची आणि नैतिकतेची श्रीमंती असणारा माझा सहचर सहजीवनात सेवाव्रती म्हणूनच जगला.आव्हानांना पेलताना खंबीरपणे उभी राहणारी भरभक्कम तटबंदी आहे.ती सहचर अहोंमुळेच!!!
मैत्रीची गुंफलेली वीण आपलं जगणं जसं सुशोभित करते.तसेच हे बंध जगण्याच्या कक्षा विस्तारत नेतात.मैत्रीची सुरेल गुंफण ज्यांना वेळीच करता येते. त्यांच्या आयुष्याची आनंदयात्रा सदैव गजबजलेली दिसते.
पती पत्नीच्या नात्यांची वीण घट्ट करणारे पुस्तक ‘सहचर’होय.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
खूप छान
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete