पुस्तक परिचय क्रमांक:१८७ तीन बाजू आणि इतर कथा
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१८७
पुस्तकाचे नांव-तीन बाजू आणि इतर गोष्टी
लेखक: कमलाकर धारप
प्रकाशन-साहित्य प्रसार केंद्र सीताबर्डी, नागपूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती १ डिसेंबर २०१३
पृष्ठे संख्या–१५४
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य--१६०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१८७||पुस्तक परिचय
तीन बाजू आणि इतर गोष्टी
लेखक: कमलाकर धारप
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
मूळ तमिळ लेखक समीर यांच्या लेखणीतून उतरलेलं ‘तीन बाजू आणि इतर गोष्टी’हे कथायुक्त पुस्तक दैनिक लोकमतचे संपादक समन्वयक तथा लेखक कमलाकर धारप यांनी अनुवादित केलेलं आहे.सदर पुस्तक मला उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल नोव्हेंबर २०२२ ला वाचन साखळी सदस्या श्रीमती सरोजिनी देवरे, मुंबई यांनी प्रायोजकत्व स्विकारुन भेट दिले होते.याचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो. या पुस्तकात एकूण चौदा कथांचा समावेश केला आहे.मलपृष्ठावर मूळ तमिळ लेखक सय्यद सलीम यांचा परिचय आणि साहित्यिक प्रवास अधोरेखित केला आहे.तमिळ म्हणजे तेलगू साहित्यात क्रांतिकारी आणि आगळ्या शैलीतील मालिका ‘रानी गारी कयालु’ओळखली जाते.त्यांना आंध्रप्रदेश सरकारने अनेक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
मराठीतून अनुवादित झालेली ‘सोनेरी मेघ’मूळ कादंबरी ‘कालुथुन्ना पुलाथोला’ यास साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभलेला आहे.त्यांच्या अनेक कथा कन्नड, मराठी, हिंदी, इंग्रजी व ओरिया भाषेत अनुवादित झालेल्या आहेत.अनुवादक लेखक कमलाकर धारप साहित्यिक आणि पत्रकार आहेत.यातील कथांच्या मालिकेत मूळ लेखक सय्यद सलीम यांचा जीवनातील घडामोडी
आणि हृदयातील आठवणींना उजाळा दिला आहे.यातील घटना, प्रसंग, गोष्टी वास्तववादी आहेत.म्हणजे एका अर्थाने लेखकांचं जगणं यातील कथांचे बीज आहे.
कथांमधून त्यांच्या कुटुंबातील(आई, वडील, बहिणभाऊ,नातलग) व्यक्तींच्या शब्दचित्रांची ओळख होते.ज्यांनी ज्यांनी त्यांच्या आयुष्यात सकारात्मक विचार, व्यवहारी दृष्टिकोन आणि ऊर्जा पेरली त्या बुजुर्ग व्यक्तिंच्या सहवासाची,स्वभाव गुणांची आणि विचारांची ओळख कथांतून दिसून येते.या कथा वाचताना आपल्याला आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांची मालिका समोर उभी राहते.इतकं सुंदर शैलीत या कथांचे अनुवादन केलेआहे.
शीर्षक कथा तीन बाजू,पत्र,वेडा,सापाचे बीळ, पाणी…पाणी…!मनी प्लॅन्ट,मिकी माऊस, सुपर बाजाराचे संकट,तुमचाच, दुष्टचक्र, अम्मा,खुला, कोंडय्याम्मा आणि समारोपाची कथा मरण.अशा चौदा कथांचा समावेश या पुस्तकात केला आहे.
‘दैवगती न्यारी तेथे बुध्दी काय करील बिचारी’ हळवी नाती गंभीर आजारामुळे कशी तुटतात.वडील मुलगा आणि पत्नी अशा त्रिकोणाच्या तीन बाजू असतात. त्यात अचानक वडिलांचे लिव्हर खराब होते.ते देण्यासाठी मुलगा स्वता:च्या लिव्हरचा छोटा भाग देण्याचं धाडस करतो पण त्याची पत्नी नकार दर्शवते एवढंच नव्हे तर कोर्टात केस दाखल करून स्थगिती मिळविते. इकडं वडिलांचे निधन, तर दोघांच्यात दुरावा त्यामुळे तीन्ही बाजूंना छेदून त्रिकोण दुभंगतो.अशी ‘तीन बाजू’ शीर्षक कथा.
सकारात्मक विचार कथांतून आपणाला दिसून येतात.नातेसंबंधातील अंतरंग उलगडून दाखविणाऱ्या कथा आहेत.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक -१५ डिसेंबर २०२४
Comments
Post a Comment