पुस्तक परिचय क्रमांक:१८६ पांढरी मेंढरे हिरवी कुरणे







वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१८६
पुस्तकाचे नांव-पांढरी मेंढरे हिरवी कुरणे 
लेखक: व्यंकटेश माडगूळकर 
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-तृतीय आवृत्तीचे पुनर्मुद्रण डिसेंबर २०१३
पृष्ठे संख्या–११४
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य--१२०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१८६||पुस्तक परिचय 
             पांढरी मेंढरे हिरवी कुरणे 
       लेखक: व्यंकटेश माडगूळकर 
 📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
जेष्ठ साहित्यिक ग्रामीण कथा अन् कादंबरीकार आदरणीय व्यंकटेश माडगूळकर यांच्या ऑस्ट्रेलिया देशात केलेल्या प्रवासाचे वर्णन‘पांढरी मेंढरे हिरवी कुरणे’या कादंबरीत मांडले आहे.ते विलायतेला तीन महिने होते.आकाशवाणी केंद्रावर ग्रामीण विभागात काम करणाऱ्या निवडक प्रोग्रॅमर-ऑर्गनायझर, निवेदक, कथालेखक, डायरेक्टर अशा निवडक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण ऑस्ट्रेलियात आयोजित केले होते.तिथं देशोदेशीचे प्रशिक्षणार्थी आलेले होते.त्याच बरोबरीने देशातील सौंदर्य स्थळे पर्यटन स्थळे पाहणे झाले.त्याचा‘आँखो देखा हाल’ अतिशय समर्पक शब्दात व्यक्त केला आहे.तेथील स्थळकाळ व व्यक्तिंना आपल्या देशातील समर्पक असणारी स्थळे आणि व्यक्तिंची सांगड घालत प्रवास वर्णनपर कादंबरी वाचताना आपणास त्या त्या ठिकाणाचा फील येतो.असं अप्रतिम लेखन केले आहे.प्रशिक्षणाला सोबत असणाऱ्या व्यक्तिंचे शब्दचित्रांची ओळख त्यांनी अक्षरांच्या रेखाटनात केली आहे.
ऑस्टीन साहेब,कायुमांगी ओगचान्को, अबूबकर, मिस सोंबत,सायपन्ट,पेट्रिक लायन जयतुंगे आणि अभिशेखरा,ओंगळ, प्रतुंग हे सगळे ‘एक्सप्लनाड हॉटेलात’मुक्कामी होते.त्यांचेही वर्णन अतिशय समर्पक शैलीत केले आहे.
 कुठेही कुंपणाच्या सीमा नसणाऱ्या हिरव्यागार कुरणात चरणाऱ्या मेंढ्या मुखपृष्ठावर बघितल्यावर लोकरीच्या उबेचीआठवण होते.कारण हा देश लोकर उत्पादनात अग्रेसर आहे.आणि माणदेशी लोकप्रिय असणारी बनगरवाडी कादंबरीतील मेंढरं आणि ऑस्ट्रेलिया देशातील गुबगुबीत दिसणारी मेंढरं यांच्यातील तुलना मनात सुरू होते.तर 
मलपृष्ठावर ‘ब्लर्ब’ऑस्ट्रेलियातील उद्योगगाथा समृध्दी दाखवितो. “ऑस्ट्रेलिया! कसा आसेल हा देश? ऐकून माहित होतं की,या देशात जगातली सगळी पिकं होतात.या देशात माणूस हवा तो उद्योग करु शकतो.. समुद्रात बुड्या मारुन मोती काढा.हजारो गुरं पाळून त्यांचं मांस परदेशी पाठवा.हजारो मेंढ्या पाळून लोकरीचं उत्पादन करा, जगातलं लहान, मोठं ‘सबकुछ मिलेगा’दुकान चालवा. शेतकरी होऊन शेकडो एकर अननस, गहू,ऊस पिकवा किंवा भांडवल घालून ‘ओपेल’ खड्यांची खाण चालवा.काहीही करायला या देशात संधी आहे.’’
अशा देशातील सफरीचे वर्णन लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी या देशातील मेलबोर्न,सिडनी, कॅनबेरा शहरं लोकांचे राहणीमान, समुद्रकिनारे, ग्रामीण जीवन, नाईट लाईफ,सिने व्यवसाय, क्लब,नाईट बार,खाद्यपदार्थ आणि ऑस्ट्रेलियन कुटुंबात राहणं आदी गोष्टींचे वर्णन अतिशय साजेशा शब्दात केले आहे.
समुद्राच्या पाण्यात बोंडाय बीचवर पोहताना घटलेला किस्सा.शार्क माणूस खातो.आणि शार्कला माणसं खातात.या वाक्याची परिचिती घडविणारा प्रसंग चपखल शब्दात मराठी आणि ऑस्ट्रेलियन
भाषेत सांगितला आहे.
मेंढरांवर मिळालेला पैसा ऑस्ट्रेलियन लोक घोड्यांवर लावतात.आपल्याकडे विभूतीपूजा आहे तर तिथं हयपूजा आहे.हय देशात phar lap या नावाला मान आहे.ते घोडदैवत न्यूझीलंडमधून 
ऑस्ट्रेलियात आले.याची आपणास या कादंबरीत मिळते.तसेच टॅमवर्थच्या रीजनल स्टेशनवरून किथ फ्रॅंकलिनने रेडिओ स्टेशनवर सादर केलेला ‘कंट्री ब्रेकफास्ट’कार्यक्रमाचे वर्णन आपल्याकडील आमची माती आमची माणसं अथवा गावकरी फडात या दूरचित्रवाणी आणि आकाशवाणी कार्यक्रमाची ओळख करून देतात.
अतिशय सुक्ष्मपणे स्थळकाळात घडलेल्या घटनांचे वर्णन केले आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक:६ डिसेंबर २०२४


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड