वाचनयात्री पुरस्कार अभिप्राय




प्रति,
आ.श्री.रवींद्रकुमार लटिंगे सर,
मुख्याध्यापक,जिल्हा परिषद शाळा कोंढावळे,ता.वाई,जि.सातारा.
                       स.न.वि.वि.
सर्वप्रथम आपले मनापासुन अभिनंदन करतो.
महाराष्ट्र राज्य वाचनसाखळी समुहावर आपण शंभर पुस्तकाचे वाचन करुन सुंदर अशा वाचनीय शब्दामध्ये आपण परिचय करुन दिलात आणि ' वाचनयाञी ' हा पुरस्कार मिळविणारे समुहाचे दुसरे विजेते बनलेले आहेत.
खरच,ह्रदयातुन अभिनंदन.इच्छाशक्ती,चिकाटी, सातत्य,प्रबळ अशी दृढ महत्वाकांक्षा,शब्दावरील प्रेम आणि निष्ठा,अविरत पणे परिश्रम करण्याची तयारी आणि वाचनाची आवड मनापासून जोपासणारे सिद्धहस्त लेखक म्हणजेच आ.रवींद्रकुमार लटिंगे सर.
तुम्ही इतरांसाठी प्रेरणा आहात सर.तुमच्याकडून बरच काही शिकण्यासारखं आहे सर.
प्रांपचिक जबाबदारी,शाळा हे सर्व सांभाळून आपण पुस्तक परिचयाची शतकपुर्ती साजरी केलीय.या काळात तुमची स्वतःची दोन पुस्तके प्रकाशित सुद्धा झालेली आहे.याबद्दल तुमच मनापासुन कौतुक.
तुम्हाला मिळालेला हा पुरस्कार तुमच्या व्यांसगाचा आणि साहित्यावरील निर्व्याज अशा प्रेमाचा आहे.
पुढेही तुमच समिक्षण कार्य अविरत चालू राहो आणि आम्हाला चांगल्या चांगल्या पुस्तकाचा परिचय वाचायला मिळत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करुन तुमच्या पुढील आयुष्याला शुभेच्छा व्यक्त करतो.
आपणास ऊंदड आयुष्य आणि ऊत्तम स्वास्थ्य लाभो ही शुभकामना व्यक्त करतो.स्नेहाचा आणि आपुलकीचा दरवळ पुढेही कायम राहीलच.
आपले पुनश्च अभिनंदन.

वाचनयाञी पुरस्काराचे पहिले विजेते श्री.गणेश तांबे सरांचे मनापासुन अभिनंदन.वाचनसाखळी समुहाच्या संयोजिका प्रतिभा ताई लोंखडे,प्रतिभा ताई टेमकर यांच्या प्रेरणेतून आणि अथक परिश्रमातून हे सर्व काही सहज शक्य होत आहे.दोन्ही प्रतिभा ताईच्या कायम स्नेहात आणि ऋणात.
पुनश्च अभिनंदन सर.स्नेह कायम असू द्यावा.

चंद्रपूर
२० डिसेंबर         
                                  आपला स्नेही
                                   राजू गरमडे

दादा,
मनापासून खूप खूप अभिनंदन....
एक सलग पणें..100 पुस्तकांचे परिचय करून देणे हे एक अवघड असे शिवधनुष्य तुम्ही अगदी लीलया पेलले...
   यासाठी लागणारी जिद्द, चिकाटी आणि परिश्रम याचा त्रिवेणी संगम तुमच्यात झाला आहे.. म्हणूनच आजचे हे धवल यश...
    या सुवर्णमय यशाचे आम्ही साक्षीदार आहोत.. याचा आम्हाला अभिमान आणि तुम्हाला त्रिवार सलाम...
असेच अनेक पुरस्कार उत्तरोत्तर तुम्हाला मिळत राहोत.. तुमच्या हातून कसदार.. साहित्य निर्माण होवो... हीच देवी शारदे कडे प्रार्थना..
 राजेंद्र वाकडे व परिवार
तारळे
19.12.2021

Comments

Popular posts from this blog

राजपत्रित अधिकारी वैष्णवी ढोकळे

गावच्या आठवणी-- सोंगे

राजपत्रित अधिकारी मयूर गवते....