नवागतांचे स्वागत शाळा कोंढावळे
कोंढावळे शाळेत स्कूलकीट व स्कूलबॅग देऊन नवागतांचे स्वागत….
वाई/सातारा दि.२- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोंढावळे ता.वाई येथे नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत मान्यवरांच्या हस्ते स्कूलकीट व स्कूलबॅग देऊन करण्यात आले.पश्चिम भागातील समाजहितैषी श्रीमान ज्ञानदेवशेठ सणस रेणावळे यांच्या सहकार्याने युनिसेफ आणि 'सीवायडीए' या संस्थेच्या माध्यमातून
शाळेतील ५८ मुलांना स्कूलबॅग आणि स्कूलकीटचे वाटप ज्ञानदेवशेठ सणस,माजी सरपंच आनंदा कोंढाळकर,मारुती कोंढाळकर, काशिनाथ कोंढाळकर,रोहिदास कोंढाळकर, अंकुश कोंढाळकर,दत्ता कोंढाळकर, नारायण सावंत आणि शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मदत करण्यात आल्याचे प्रतिपादन प्रमुख अतिथी ज्ञानदेवशेठ सणस यांनी केले. यावेळी रोहिदास कोंढाळकर व सुनील जाधव यांनी स्कूल कीटचा वापर कसा करावा याची माहिती दिली.अनाहुतपणे शैक्षणिक साहित्य मिळाल्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसत होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक रविंद्र लटिंगे यांनी केले.स्वागत रोहिदास कोंढाळकर व अंकुश कोंढाळकर यांनी केले.
आभार सुनील जाधव यांनी मानले.कार्यक्रम यशस्वितेसाठी सौ वर्षा पोळ मॅडम,सौ नलिनी मुसळे मॅडम आणि पूजा कोंढाळकर यांनी सहकार्य केले.कार्यक्रमास विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment