काव्य पुष्प क्रमांक-२५२ शिदोरी प्रत्येकाच्या जीवनासाठी







प्रा.कुंडलिक कदम पुणे लिखित शिदोरी पुस्तकावरील काव्य पुष्प

शिदोरी,प्रत्येकाच्या जीवनासाठी…


प्रत्येकाच्या सदानंदी जीवनासाठी

सकारात्मक भावविचारांची शिदोरी

जिव्हाळ्याच्या शब्दपालखीत नाचती

शक्तीभक्तीमय चैतन्याचे वारकरी ||


आजी-आजोबा अनुभवांचे व्यासपीठ

आई-वडील सुसंस्कारांचे विद्यापीठ

'आधारवड' बुजुर्ग सल्ल्यांचे विचारपीठ 

मूल्यांची शिदोरी आधाराचे ज्ञानपीठ|| 


वडिलधाऱ्या जेष्ठांची मायेची साथ

उकलत जाते समजावण्याची गाठ

कलह रुसण्या अबोल्यावर मात 

जीवनात येत असते संघर्षाची वाट||


प्रेरणा कामाची कौतुके मिळते

जेष्ठांच्या कष्टांचे मनी जाणते

संवाद चर्चाने मनमयूर नाचते

सुखसमाधान जीवनात फुलते ||


संवर्धूया गावच्या मातीशी नातंगोतं

त्यातून झळकेल प्रेमाची झालर

सळसळेल प्रेमळ आपुलकीचं नातं

त्यातून फुलेल भावनांचा बहर||


श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई

काव्य पुष्प क्रमांक-२५२

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड