पुरस्कार सन्मान सोहळा
ऋणानुबंध जपणाऱ्या सन्माननीय स्नेहीजणांचे कृतज्ञतापूर्वक वंदन!!!
'अक्षरप्रभुंचे शब्दांगण सजवायला
वाचनसाखळीचे स्नेही शुभेच्छेला |
चैतन्याचे चांदणे फुलले सांजेला
"वाचनयात्रीने" सन्मानित केले रवीला||'
*श्री.रविंद्रकुमार लटिंगे सर हे साहित्य क्षेत्रातील चालते-बोलते ज्ञानपीठ,राज्यस्तरीय वाचनयात्री पुरस्काराने सन्मानित*
आज *वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य आयोजित वाचनयात्री पुरस्कार वितरण सोहळा वाई येथील देवगिरी हॉटेल या ठिकाणी अतिशय उत्साहात संपन्न झाला* श्री.रविंद्र लटींगे सर यांनी केवळ चार महिन्यांमध्ये१०० पुस्तकांचे अतिशय उत्कृष्टरित्या पुस्तक परिचय केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. वाचन साखळी समूह हा जवळपास ७५०० सदस्यांचा समूह असून यामध्ये वाचनयात्री पुरस्काराचे ते दुसरे मानकरी ठरले.तर पहिले मानकरी हे सातारा जिल्ह्यातील श्री.गणेश तांबे,फलटण हे आहेत . सदर पुरस्कार वितरण प्रसंगी वाचनसाखळी समूहाच्या संयोजिका श्रीमती.प्रतिभाताई लोखंडे, लेखिका व कवयित्री सौ.अंजलीताई गोडसे, वाचनयात्री पुरस्काराचे प्रथम मानकरी व लेखक श्री.गणेश तांबे,आत्मप्रेरणा पुस्तकाचे लेखक श्री. लक्ष्मण जगताप,आदर्श शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते दीपक भुजबळ सर,विचारवेधचे लेखक श्री राजेंद्र बोबडेसर, उपक्रमशील शिक्षक श्री प्रकाश बडदरे,सेवानिवृत्त केंद्रप्रमुखा सौ विजया कांबळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. शकुंतला मर्ढेकर,दिलीप कासुर्डे, नंदकुमार डोईफोडे, विजयराव शिवथरे ,शेखर जाधव, शिवाजी निकम
तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य हा समूह वाचन संस्कृतीला जोपासणारा व वाढवणारा समूह असून अत्यंत कमी कालावधीमध्ये या वाचनसाखळी समूहाने अत्यंत गरुडझेप घेतलेली आपणास दिसून येते.यावेळी श्री राजेंद्र बोबडे,सौ शकुंतला मर्ढेकर, अंजली गोडसे, दीपक भुजबळ,लक्ष्मण जगताप, गणेश तांबे आदी मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.तर अध्यक्षीय भाषणात संयोजिका प्रतिभाताई लोखंडे मॅडम यांनी वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी वाचन साखळी समूहाची पार्श्वभूमी आणि विविध उपक्रमांची माहिती विषय केली.
'वाचन यात्री'सन्मान सोहळ्याचे आयोजन व संयोजक अप्रतिम केलेबद्दल संयोजकांना धन्यवाद दिले.वाचन संस्कृती संवर्धनासाठी
साहित्यिकांचे विचार आत्मसात करुन जीवनात सकारात्मक संस्काराची पेरण करुया.असे विचार व्यक्त केले.
श्री.रविंद्र लटींगे सर यांचे ऑगस्ट महिन्यामध्ये "हिरवी पाती" व "पाऊले चालती" ही दोन पुस्तके प्रकाशित झाली होती. अत्यंत कुशल व शब्द भंडाराची जादुई किमया असणारे हे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व त्यांना मिळालेला सर्वोच्च पुरस्कार असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले व त्यांच्या या पुरस्काराबद्दल अनेक विभागातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
कार्यक्रमाचे स्वागत सौ.प्रेमा लटिंगे,राहूल हावरे, शिवाजी फरांदे यांनी केले,प्रास्ताविक उध्दव निकम,सन्मापत्राचे वाचन सौ सारिका लटिंगे ,आभार सुनील जाधव यांनी मानले तर सूत्रसंचालन श्री संतोष शिंदे महाबळेश्वर यांनी केले.
कार्यक्रमास वाचन साखळी समूहाचे सदस्य व सदस्या उपस्थित होते.
Comments
Post a Comment