वाचनयात्री पुरस्कार ऋणनिर्देश
ऋणनिर्देश
पुस्तकपरिचय अनमोलभेट देवूया
वाचन चळवळीला हातभार लावूया
साहित्यकलेचे अवघे अनमोल भांडार
वाचायला मिळती नानाविध प्रकार |
वाचनसाखळीने ज्ञानयात्री जोडले
लेखक कवी समीक्षक स्नेही भेटले
वाचनाने विचाराला चालना मिळाली
लेखनाची अभिरुचीत वाढ झाली|
आपला वाचनसाखळी फेसबुक म्हणजे महाराष्ट्रातील नवसाहित्यिकांची लेखणी व वाणीची शृंखला आहे.लेखनाचा व्यासंग जपत अनेकांनी साहित्य क्षेत्रात आपले लेखन प्रकाशित करुन, लोकार्पण केले आहे.स्वत: साहित्य निर्मितीचा आनंद घेऊन रसिकांना आनंदानुभव पुस्तकातून वाटण्याचा प्रयत्न निश्र्चितच कौतुकास्पद आहे.
लिहित्या हातांना व्यक्त होण्यासाठी अॉनलाईन
व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महनीय कार्य वाचन साखळी फेसबुक महाराष्ट्र राज्याच्या संयोजिका आदरणीय प्रतिभाताई लोखंडे मॅडम व प्रतिभाताई टेमकर मॅडम यांनी केले आहे.
पुस्तकांना जीवश्य कंठस्य मित्र समजणाऱ्या वाचनसंस्कृतीचे आपण सर्वजण ज्ञानाचे वारकरी आणि या समूह शृंखलेतील एकेक कडी आहोत,सारस्वतांची मांदियाळी असणारा हा समूह… लेखक-लेखिका,कवी-कवयित्री,अध्यापक- अध्यापिका आणि सृजन वाचक मंडळी आहोत. याचं समूहात 'पुस्तक परिचय' उपक्रमात सहभागी होऊन मला भावलेल्या, आवडलेल्या आणि रसग्रहण केलेल्या पुस्तकांचा परिचय इतरांना करून देताना अतिव आनंद मिळत होता.तर काही जणांच्या अभिप्रायाने,प्रतिक्रियेने आणि कमेंट्स मुळे लिहिण्याची प्रेरणा आणि आत्मबळ मिळाले.
या समूहाच्या प्रशासकीय संयोजिका आदरणीय प्रतिभाताई लोखंडे मॅडम आणि आदरणीय प्रतिभाताई टेमकर मॅडम यांच्या मुळेच मी लिहिलेले 'पुस्तक परिचय' फेसबुक समूहावर प्रसिद्ध करण्याची संधी मिळाली. तर उपक्रमशील शिक्षक,छांदिष्ट,शिक्षक हितगुज आणि कला-उत्सव व्हाॅटस अप समूहावर प्रसिद्ध करण्याची संधी मिळाली.सजगपणे कमेंट देणाऱ्या आणि आवर्जून वाचन करणाऱ्या मित्रवर्यांचे मनस्वी धन्यवाद! आणि ज्यांनी प्रेरणा आणि प्रोत्साहन दिले.ते लेखक पत्रकार मित्रवर्य श्री सुनील शेडगे सर आणि स्नेही सन्माननिय गणेश तांबे सर यांनाही मनस्वी धन्यवाद,कमेंट देणाऱ्या सर्वंच गुरुतुल्य बंधू-भगिनींचे मनपुर्वक धन्यवाद! कारण त्यांच्यामुळेच माझ्या लेखणीची खासियत मला उमजत गेली.आणि सर्व रसिक वाचकप्रेमी स्नेहीजणांचे मनपुर्वक धन्यवाद!कारण व्यक्त झालेले परिचयाचे शब्दांकन लेखमालिका समूहावर आणि ब्लॉगवर वाचून रसास्वाद घेतला.अशा शब्दांगणाच्या प्रांगणातील सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!!! सर्व बंधूभगिनी आणि
लिहिणाऱ्या-वाचणाऱ्या मित्रांच्या कायम स्नेहात आणि ऋणात……..
पाखरं झेपावती जिद्दीने आसमंती
जशी चिमणचारा खाऊ शोधायला||
तसे वाचनसाखळीचे पुस्तकालय
आविष्कारी लेख वेचून वाचायला ||
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
आयोजित 'वाचनयात्री'पुरस्कार सन्मान सोहळा शनिवार दिनांक २५डिसेंबर २०२१ रोजी दु.३ वाजता वाई ता.वाई जि.सातारा येथे आयोजित केला आहे.
श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
यापूर्वीच्या सर्व पुस्तक परिचय, कविता, चारोळी आणि प्रवासवर्णने खालील ब्लाॅगवर उपलब्ध आहेत.
raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment