माझी मायबोली मराठी २०४
माझी मायबोली मराठी भाषा
माझा श्र्वास मराठी
माझा ध्यास मराठी
माझी चेतना मराठी
माझी प्रेरणा मराठी |
कथा कवितांचे माहेरघर
नाटक कादंबरीच विश्वभर
आजीच्या गोष्टींचे माजघर
आरत्या श्लोकांचे देवघर |
लोकगीतांची खाण मराठी
पोवाड्याची जान मराठी
भावगीतांची पवित्रता मराठी
अभंगवाणी संकिर्तन मराठी |
मातृभाषेतून ज्ञान मनाला भिडते
ह्दयातले ओठांवर उमटते
विचारांना चालना मिळते
अभिरुचीने अभिव्यक्ती होते |
अप्रतिम दादा💐
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteखूप छान रचना सर
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDeleteखूपच छान💐
ReplyDelete