भजन काव्य पुष्प-२०२



भजन 
राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी 

संतदेवांच्या स्तुतीचे कवन 
आळवायला समूह गायन
देवाचिया दारी गाऊया भजन 
तल्लीन होतो अवघा जन||

हार्मोनियमचे सूर साथीला 
टाळचिपळ्यांचा नाद साथीला
तबला डग्गा पखवाजाची थाप
रागदारी हरकतींचा घेई आलाप ||

गवळण भारुड अभंग 
भजनात भरला रंग 
मनात नाचती श्रीरंग 
नामस्मरणात श्रोते दंग||

भक्ती संगीताचा आविष्कार
संकिर्तनाचा हरीजागर 
हरीनामाचा होतोय गजर 
ज्ञानामृताचा होतो पाझर||

मृदंग हार्मोनियमचं नातं तालसूरांचे
भजनीमंडळ पाईक सांप्रदायिकतेचे  
वारकरी वाजवतात टाळ्या टाळ 
भक्तीरसात जुळाली श्रध्देची नाळ||

ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-२०२
फोटो साभार-विश्वकोश

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड