माझं ओझं काव्य पुष्प-२०१
माझं ओझं
उचलू लागाया नाही कोण
झाली जाणीव जबाबदारीची
मोळी डोक्यावर तोलून
ओझी वाहते मी जीवनाची ||
मनाचा हिय्या करून
भारा तोलला हातानं
मोळी उचलली डोक्यावर
झालं तरातरा पावलांचं चालणं||
जीवनाचं रहाटगाडगं
पोटा पाठीवर चालतं
त्याला खायाला घालाय
सैपाक रांधाय लागतं||
चूल्हृयात अग्नी पेटवायला
समिधा सरपणाची फाटी
त्याच्या जाळा इंगळावर
भाजे भाकरी उकळे आमटी ||
प्रपंच्याचा सोसत ओझ्याचा भार
धन्याच्या संसाराला लावते हातभार
घराला मिळतो कष्टाचा आधार
लोकजीवनाचा खरा इतबार ||
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-२०१
फोटो साभार-श्री नितीन जाधव सर
Comments
Post a Comment