खळ्यातली मळणी काव्य पुष्प २०३







खळ्यातली मळणी 

शेतीची पारंपरिक वहिवाट
यंत्रामुळं दिसेनासी झाली 
अनवट वाटेच्या खळ्यानं   
गावची आठवण तराळली|

शेतीच्या वहिवाटीची पेरणी 
एका छायाचित्राने बिंबवली 
काबाडकष्ट करणाऱ्याच्या रानी
शेतीची सुगी अधोरेखित केली |

गव्हाची मळणी धरली 
एकाएकी हवा बदलली 
वातावरण झालं ढगाळी
थेंब टपकू लागलं अवकाळी|

खळ्यात पेंढ्या झाकण्याची 
उडाली धांदल शेतकऱ्याची 
पोटापुरतं धान झोळीत टाका 
कष्टाच्या भाकरीची आब राखा |

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

छायाचित्र साभार- अॅग्रोवन सकाळ

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड