बडबड गीत काव्य पुष्प-१९६
****बडबड गीत
आई बाळाला दूधभात भरविते
बाळ खायला आढेवेढे घेते
मधेच पळते भोंगाड पसरते
आई तयाला गोष्ट सांगते |
मनीच बाळ ओटीवर आलं
सांडलेलं दुध चाटून गेलं
डॉगीच पिल्लू भुंकत आलं
लवंडलेलं दुध चाटून गेलं |
कोंबडीचं पिल्लू नाचत आलं
भाताची शितं चोचीत गेलं
चिऊची पिल्लू चिवचिवत आलं
चोचीनं दुध पिऊन गेलं |
करडू म्या म्या करत आलं
चारापाणी न्हाय म्हणून हुंदडलं
गायीचं वासरु धावत आलं
तसं बाळ आईला बिलगलं |
पिल्लांच्या गोष्टीनं आनंदलं
ताटलीत दुधभात मागू लागलं
आईचं भरवणं सुरू झालं
बाळ पटपट खाऊ लागलं |
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१९६
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
Comments
Post a Comment