माझी लेखन अभिरुची काव्य पुष्प-२००
माझी लेखन अभिरुची
लॉकडाऊनच्या काळात
फावला वेळ असताना
वेळ व्यथित कसा करावा
या विवंचनेत असताना ||
प्रेरणा दिली आप्पांनी
लेखनातून व्यक्त होण्याची
लेखन प्रपंच कसा करावा
घटना प्रसंग टिपण्याची||
सभोवती रेंगाळणाऱ्या
मनगाभाऱ्यातील आठवणी
बालपणीच्या गमती झाल्या
साठवणीतल्या आठवणी ||
लिहिण्याची संधी मिळाली
क्रिकेटच्या लेखाने नांदी केली
आजवर फिरलेल्या सह्याद्रीची
माझी भटकंती लिखीत झाली||
भटकंती लिहिता लिहिता
चित्र काव्याने मन वेधले
निसर्गातील सांजवेळ टिपता
गवतफुलांचे काव्य गुंफले ||
आवडीची निसर्ग चित्रे
नजरेतली छायाचित्रे
बहरत गेली रचनाचित्रे
त्यांची झाली काव्य चित्रे||
उपक्रमशिल हितगुज छांदिष्ठ
मित्रसमुह दाद देई अचूक
शेअरिंग केलेल्या अभिव्यक्तीचे
रचलेल्या काव्याचे झाले कौतुक||
लेखक कवी मित्रांच्या कौतुकाने
मग चैतन्य मिळाले नव्या उमेदीने
व्यक्त होण्याची संधी मिळाली मुक्तपणे
भटकंतीचा गौरव केला सन्मानपत्राने||
(सर्व शिक्षकमित्र,अक्षरप्रभू, व फेसबुक मित्रांचे मनपुर्वक आभार .)
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-२००
Comments
Post a Comment