वन भटकंती काव्य पुष्प-१९८

    



वन भटकंती  

ओहळाचं खळाळतं पाणी 
वारा गातो गुंजन गाणी 
पाखरांची किलबिल वाणी 
वृक्षलतांची सळसळ वनी |

पाखरे विहरती रानोमाळी
जीवनदायिनी नद्या तळी
सदाहरित छाया वृक्षवल्ली 
मोरपिसांनी गारवा घाली |

चढउताराच्या जंगलवाटा
 निर्झराचे अवखळ पाणी 
 किर्र झाडीतल्या अनवटवाटा
जंगल वाचूया पाऊलखुणांनी|

रम्य दृश्याने मन बावरते
कातळ पाषाणाने मन वेडावते 
सृष्टी पाहुनी मन सुखावते 
कैकदा पाहिलं तरी नवानुभव देते |

तुझ्या सौंदर्याच्या गंधाने 
आसमंत दरवळू दे
तुझ्या निसर्गरम्य दृश्याने 
मन रेंगाळत राहू दे|

जंगलाची जैवविविधता 
वाचायला अरण्यलिपी जाणूया
विहंगम नयनरम्य क्षेत्राचे 
दृश्य ह्रदयात साठवूया |

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१९८
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com


Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड