नक्षीदार वेली काव्य पुष्प २०५
नक्षीदार वेली
नक्षीदार बहारदार वेली
वृक्षाच्या संगतीनं गुंतली
जाळीदार नक्षीत सजली
पाहूनी नेत्रपल्लवी हरखली|
मनाला भुरळ पाडली
पक्ष्यांची कोलाहल गुंजली
वाऱ्याने बासरी वाजवली
मनाला मोहिनी घातली|
मनात विचारांचा गुंता
असाच वेटोळे घालतो
सतत सफलतेची चिंता
मनाला आठवण देतो|
गोलाईच्या जाळीसारखे
विचारचक्र सुरू असते
निसर्गरम्य सौंदर्य पाहण्याने
क्षणभरी चित्त एकाग्र होते |
मांडव झाडांच्या फांद्यांचा
झालर लतावेलीच्या जाळीची
खांब झाडाच्या खोडाचे
पायघडी पालापाचोळ्याची |
जंगलवाटेने भटकताना
जैवविविधता दृष्टीला पडतात
वृक्षवेलींची बहारदार रुपं
नजराणा नजरभेट करतात|
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
Comments
Post a Comment