फुलांनी बहरलेली काटेसावर काव्य पुष्प-२०७





फुलांनी बहरली काटेसावर 


निळ्या आकाशी रुप गोजिरे

फांद्यांना लगडली शेंदरी झुंबरे

अंगाखांद्यावर फुलले फुलोरे 

झाडाचे रुप नव्याढंगात साजिरे|


उमलते फुल प्रतिक प्रितीचं  

गुलाबी ढंगात सजण्याचं

नवलाईचं रुप काटेसावरीचं

दुसऱ्यांना हर्ष वाटण्याचं|


पंचकार खुलली पाकळ्यांची

गोलाकार तुराई पुंकेसरांची

काळसर ठिपकं परागाची 

फांद्यावर नक्षी  रंगमाळेची|


मकरंद शोषायला भुंगे भ्रमरतात 

मकरंद खायला पक्षी झेपावतात 

मकरंद चाखायला मक्षिका आकर्षितात 

अनामिक वासाने परिसर गंधाळतात |


फुलांना गुलाबी रंगात खुलविते

वृक्षाचे सौंदर्य मनाला भुलविते

निसर्गाची रंगपंचमी आरंभिते 

रंगउधळण आविष्कारात सजते |


निसर्गाची रंगपंचमी गुलाबी शेंदरी रंगोत्सव जुनी पानगळ होऊनी आरंभिला झुंबरं उत्सव❗🍁


श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड