जीवन गाणे काव्य पुष्प-१९७
******जीवन गाणे
आनंद आणि दु:खाच्या
भावनेचं आयुष्य आहे
सुखाश्रू आणि दु:खाश्रू
भावनांचा ओलावा आहे❗
हसत का जगायचं
कण्हत का राहायचं
हे ज्याचं त्यानं ठरवायचं
पण आनंदातच राहायचं ❗
मनाच्या संवेदना गिळून
जीवनाला सामोरे जायचं
आभाळ कोसळलं तरी
उमेदीवर आरुढ व्हायचं❗
एक आशेचा किरण
सुखाचा ओलावा शिंपडतो
भविष्याचा वेध घेत
जीवन गाणे गातो ❗
चिंते पेक्षा चिंतन करणे
मन गाभाऱ्याला उभारी देणे
मरगळ झटकून कर्मे करणे
आनंदाची बाग फुलविणे❗
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१९७
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
Comments
Post a Comment