आनंदाची सांजवेळ काव्य पुष्प- २०६



आनंदाची सांजवेळ

सांजवेळी होतोय दिवाकराचा अस्त
जलाशयाचा नजारा फुललाय मस्त 
दिवसभराच्या कामात असता व्यस्त
छबी टिपण्यात रमलाय  दोस्त |

निसर्ग दृश्य मोहिनी घालते 
आनंदाला उधाण येते 
नजरभरी सिनरी टिपते
सांज सेलिब्रिटी बनते |

मंदावतात प्रकाश किरणं 
धूसरणाऱ्या छटेला बघणं
सेल्फित छबी चितारणं
नयनांची तृप्तता करणं|

आभाळाचं पाण्यासंग नांदणं
रंगछटेत मनसोक्त तरंगणं 
पर्यटकांना उल्हासित करणं
आनंदाचं चांदणं फुलवणं
 |

श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड