लावणीचे लावण्य काव्य पुष्प-१९९




लावणीचे लावण्य


लोक संगीताची अदाकारी 

मराठी माणसं फिदा सारी 

अदा भाव भक्तीची शृंगारी 

शालूची नजाकत भरजरी|


 पायपेटीच्या सूरावर 

ढोलकीचा खणखणाट 

 तुणतुण्याच्या तालावर

 घुंगरांचा खळखळाट |


पदलालित्याने मोहीत मनमयुरा

सातासमुद्रा पलिकडे तिला मान 

नेत्रकटाक्षाने घायाळ दिलवरा 

उत्सव सोहळ्याची लावणी जान |


नाच कडक ठसकेबाज 

शब्द चपखल चटकेबाज 

अभिनय भावस्पर्शी भावनेबाज 

त्रिवेणी संगम लावणी रंगबाज |


तमाशातील अस्सल सौंदर्य

नृत्याने नजरकैद करते 

दिलखेचक खड्या आवाजाने 

अन् हावभावाने मंत्रमुग्ध करते |


मराठमोळी लावणी बहार आणते

नृत्याविष्काराचा रंग ऊधळते 

रसिक मायबापा फिदा करते 

टाळ्या शिट्यांचा पाऊस पाडते |


लावणी समाजमनातील वेध भावनांचा  

कलावंतांच्या निस्सीम कलेचा 

नाच गाणं अभिनयाच्या अदाकारीचा 

रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा |


श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई

काव्य पुष्प-१९९

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड