माझी मायबोली मराठी २०४








मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ❗

माझी मायबोली मराठी भाषा 

माझा श्र्वास मराठी 
माझा ध्यास मराठी 
माझी चेतना मराठी 
माझी प्रेरणा मराठी |

कथा कवितांचे माहेरघर 
नाटक कादंबरीच विश्वभर 
आजीच्या गोष्टींचे माजघर
आरत्या श्लोकांचे  देवघर |

लोकगीतांची खाण मराठी 
पोवाड्याची जान मराठी 
भावगीतांची पवित्रता मराठी
अभंगवाणी संकिर्तन मराठी |

मातृभाषेतून ज्ञान मनाला भिडते
ह्दयातले ओठांवर उमटते 
विचारांना चालना मिळते 
अभिरुचीने अभिव्यक्ती होते |

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड