Posts

Showing posts from 2024

पुस्तक परिचय क्रमांक:१९२ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१९२ पुस्तकाचे नांव-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  लेखक: दिलीप बर्वे  प्रकाशन-दिलीपराज प्रकाशन,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती १डिसेंबर २०२४ पृष्ठे संख्या–९४ वाड़्मय प्रकार-ऐतिहासिक चरित्र  किंमत /स्वागत मूल्य--१४०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १९२||पुस्तक परिचय               पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर         लेखक: दिलीप बर्वे   📚📚📚📚📚📚📚📚📚📚 “हर हर महादेव,हर हर महादेव!”  कर्मयोगिनी रणरागिणी दातृत्वसरिता धर्मपरायण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्राची ओळख महाराष्ट्रातील सर्वांना व्हावी. यास्तव लेखक दिलीप बर्वे यांनी ‘सती न गेलेली सती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’हे जीवनचरित्र ३००व्या जन्मदिनाच्या निमित्ताने रेखाटले आहे. वाचन साखळी समूहाचे प्रसिध्दी प्रमुख तथा ब्लॉग रायटर आदरणीय कचरु चांभारे सरांनी मला बक्षिसरुपाने भेट दिलेला ग्रंथ.त्याबद्दल सरांना मनस्वी धन...

पुस्तक परिचय क्रमांक:१९१पांढऱ्यावर काळे

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१९१ पुस्तकाचे नांव-पांढऱ्यावर काळे लेखक: व्यंकटेश माडगूळकर  प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पाचव्या आवृत्तीचे पुनर्मुद्रण: नोव्हेंबर २०१३ पृष्ठे संख्या–१६६ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य--१७०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १९१||पुस्तक परिचय               पांढऱ्यावर काळे        लेखक: व्यंकटेश माडगूळकर   📚📚📚📚📚📚📚📚📚📚     समाजाप्रमाणे निसर्गाकडे देखील डोळसपणे बघणारे एक उमदे व्यक्तीमत्व म्हणजे जेष्ठ साहित्यिक तथा कथाकार आदरणीय‘तात्या’उर्फ व्यंकटेश माडगूळकर.संत, शाहिरी,वाड्मय, संकीर्तन,कथा यांचे संस्कार तर वैदू, फासेपारधी,रामोशी,वाणी,सुतार,धनगर,मांग,न्हावी,कुणबी,मराठी, तेली, मुसलमान अशा सर्व अठरापगड जातींच्या लोकांच्या संगतीत त्यांचे आयुष्य गेल्याने साहित्य,चित्रकला, बोलीभाषा, यांच्या संस्काराचा वैशिष्टयपूर्ण मेळ त्यांच्या व्यक्तिमत्वात आणि लेखनातही दिसून ये...

पुस्तक परिचय क्रमांक:१९०भेटीगाठी

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१९० पुस्तकाचे नांव-भेटीगाठी लेखक: शंकर पाटील  प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-दुसऱ्या आवृत्तीचे पुनर्मुद्रण  जून २०१८ पृष्ठे संख्या–१२० वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य--११०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १९०||पुस्तक परिचय               भेटीगाठी         लेखक: शंकर पाटील   📚📚📚📚📚📚📚📚📚📚  कथाकार, लेखक शंकर पाटील यांच्या कथा; गावरान अस्सल मराठी कथांचे लेणे आहे. गावगाड्यातील नमुनेदार इरसाल, मासलेवाईक आणि तऱ्हेवाईक माणसांचे स्वभाव वैशिष्टे उलगडून दाखवितात. त्यांच्या कथागोष्टीतून ग्रामीण भागातील माणसांच्या मनाची भाषा कथांतून उमगते. त्यांच्या अंतरंगाचे वर्णन ढंगदार आणि ग्राम्य शैलीत असते. ते वाचताना मनाला भुरळ घालते.कथा वाचल्यावर आनंद मिळतो.त्यांच्या कथा मनोरंजन करता करता सामाजिक जाणीव जागृती निर्माण करतात. सगळ्याच कथा एखाद्या गावच्या चावडी अथवा गप्पांच्या ग...

पुस्तक परिचय क्रमांक:१८९ बाजार

Image
  वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१८९ पुस्तकाचे नांव-बाजार लेखक: व्यंकटेश माडगूळकर  प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पाचवी आवृत्तीचे पुनर्मुद्रण  जानेवारी २०१८ पृष्ठे संख्या–१०४ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य--११०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १८९||पुस्तक परिचय               बाजार         लेखक: व्यंकटेश माडगूळकर   📚📚📚📚📚📚📚📚📚📚  माणसं चितारणारा लेखक अशी ज्यांची साहित्य क्षेत्रात ओळख आहे ते व्यंकटेश माडगूळकर.माणदेश तसा रुक्ष खडकाळ भाग पण संपूर्ण महाराष्ट्राला साहित्य रुपी ओलावा पुरविणारे दोन खळाळते निर्झर दिले; ते म्हणजे ग. दि .मा आणि व्यंकटेश माडगूळकर.कथा,कादंबरी, पटकथालेखन, गीत लेखन असे चौफेर क्षेत्रात लेखणीचा षटकार मारणारे कथालेखक व्यंकटेश माडगूळकर यांचा माणदेशी माणसांचे स्वभाव वैशिष्टे उलगडून दाखविणारा कथासंग्रह ‘बाजार’.  खरोखरच यातील तेरा कथांचे वाचन करताना आपण तहानभ...

पुस्तक परिचय क्रमांक:१८८ टारफुला

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१८८ पुस्तकाचे नांव-टारफुला लेखक: शंकर पाटील  प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-तृतीय आवृत्तीचे पुनर्मुद्रण सप्टेंबर२०१७ पृष्ठे संख्या–२८८ वाड़्मय प्रकार-कादंबरी किंमत /स्वागत मूल्य--२५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १८८||पुस्तक परिचय               टारफुला        लेखक: शंकर पाटील   📚📚📚📚📚📚📚📚📚📚 ग्रामीण जीवनातील परिवर्तनाची एक अस्सल मराठमोळी झलक ‘टारफुला’त प्रकटते. तिच्यातील मराठी सिनेमाच्या पटकथेसारखी दृश्यवार मांडणी आपल्याला गुंतवून ठेवते.इतकं सुरेख शैलीत लेखन केले आहे.सत्ता मिळवणे आणि त्या सत्तेच्या बळावर आपणच निर्माण केलेल्या तरुण कार्यकर्त्यांकडून आपल्या सत्तेला आव्हान मिळणे; एका खेड्याच्या संदर्भात हे सत्ताचक्र कसे काम करते हे कथाकार शंकर पाटील यांनी या कादंबरीत दाखवले आहे.  ‘टारफुला’ या कादंबरी विषयी लेखक शंकर पाटील 'पाटलांची चंची'या कथासंग्रहातील 'असेही काही प्राध्या...

पुस्तक परिचय क्रमांक:१८७ तीन बाजू आणि इतर कथा

Image
  वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१८७ पुस्तकाचे नांव-तीन बाजू आणि इतर गोष्टी  लेखक: कमलाकर धारप  प्रकाशन-साहित्य प्रसार केंद्र सीताबर्डी, नागपूर  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती १ डिसेंबर २०१३ पृष्ठे संख्या–१५४ वाड़्मय प्रकार-कादंबरी किंमत /स्वागत मूल्य--१६०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १८७||पुस्तक परिचय               तीन बाजू आणि इतर गोष्टी         लेखक: कमलाकर धारप   📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 मूळ तमिळ लेखक समीर यांच्या लेखणीतून उतरलेलं ‘तीन बाजू आणि इतर गोष्टी’हे कथायुक्त पुस्तक दैनिक लोकमतचे संपादक समन्वयक तथा लेखक कमलाकर धारप यांनी अनुवादित केलेलं आहे.सदर पुस्तक मला उत्कृष्ट अभिप्रायाबद्दल नोव्हेंबर २०२२ ला वाचन साखळी सदस्या श्रीमती सरोजिनी देवरे, मुंबई यांनी प्रायोजकत्व स्विकारुन भेट दिले होते.याचा आवर्जून उल्लेख करावा वाटतो. या पुस्तकात एकूण चौदा कथांचा समावेश केला आहे.मलपृष्ठावर मूळ तमिळ लेखक सय्यद सलीम यांचा ...

पुस्तक परिचय क्रमांक:१८६ पांढरी मेंढरे हिरवी कुरणे

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१८६ पुस्तकाचे नांव-पांढरी मेंढरे हिरवी कुरणे  लेखक: व्यंकटेश माडगूळकर  प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-तृतीय आवृत्तीचे पुनर्मुद्रण डिसेंबर २०१३ पृष्ठे संख्या–११४ वाड़्मय प्रकार-कादंबरी किंमत /स्वागत मूल्य--१२०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १८६||पुस्तक परिचय               पांढरी मेंढरे हिरवी कुरणे         लेखक: व्यंकटेश माडगूळकर   📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 जेष्ठ साहित्यिक ग्रामीण कथा अन् कादंबरीकार आदरणीय व्यंकटेश माडगूळकर यांच्या ऑस्ट्रेलिया देशात केलेल्या प्रवासाचे वर्णन‘पांढरी मेंढरे हिरवी कुरणे’या कादंबरीत मांडले आहे.ते विलायतेला तीन महिने होते.आकाशवाणी केंद्रावर ग्रामीण विभागात काम करणाऱ्या निवडक प्रोग्रॅमर-ऑर्गनायझर, निवेदक, कथालेखक, डायरेक्टर अशा निवडक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण ऑस्ट्रेलियात आयोजित केले होते.तिथं देशोदेशीचे प्रशिक्षणार्थी आलेले होते.त्याच बरोबरीने देशातील सौ...

पुस्तक परिचय क्रमांक:१८५पु.ल.एक आनंदयात्रा

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१८५ पुस्तकाचे नांव-पु.ल.एक आनंदयात्रा  लेखक:  प्रा.श्याम भुर्के  प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-द्वितीय आवृत्तीचे पुनर्मुद्रण डिसेंबर २०१८ पृष्ठे संख्या–११४ वाड़्मय प्रकार-ललित किंमत /स्वागत मूल्य--१३०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १८५||पुस्तक परिचय               पु.ल.एक आनंदयात्रा          लेखक:प्रा.श्याम भुर्के   📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚  महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, प्रतिभावंत साहित्यिक,विनोदवीर , हजरजबाबी वक्तृत्व साहित्य आणि संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक विजेते ऋषितुल्य लाडकं व्यक्तिमत्त्व   आदरणीय पु.ल.देशपांडे.आदरणीय भाईंनी वाड्मय क्षेत्रातील सर्वच क्षेत्रात पादाक्रांत करुन गाजवली आहेत.मराठी माणसाला पु.ल.देशपांडेंनी काय दिले असेल तर ,माणसांच्या दैनंदिन जीवनातील गमतीदार निरीक्षणे नेमकेपणाने टिपून त्यावर लेखन करुन रसिक वाचकांना मनसोक्त हसा...

पुस्तक परिचय क्रमांक:१८४ श्री शंभू छत्रपती स्मारकग्रंथ

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१८४ पुस्तकाचे नांव-श्री शंभूछत्रपती  स्मारक ग्रंथ  संपादक: सुशांत संजय उदावंत  प्रकाशन-एलोरा पब्लिकेशन नाथापुर, बीड प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती १४ मे २०२२ पृष्ठे संख्या–१४८ वाड़्मय प्रकार-ऐतिहासिक ग्रंथ किंमत /स्वागत मूल्य--३००₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १८४||पुस्तक परिचय               श्री शंभूछत्रपती स्मारक ग्रंथ         संपादक: सुशांत संजय उदावंत   📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 तलवारीचं कलम करून सह्याद्रीच्या रणांगणांच्या कागदावर मराठ्यांनी आपल्या रक्ताच्या शाईने इतिहासातील लिहिलेला झंझावात म्हणजे छत्रपती संभाजी महाराज! अन्याय व अत्याचाराच्या विरोधात लढणाऱ्या व नवनिर्माणाची आस बाळगलेल्या प्रत्येकाला स्फूर्ती देणारा कानमंत्र, म्हणजे शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज.पण या नावाला इतिहास लेखक आणि संशोधकांनी लावलेल्या बदनामीचा कलंक पुसण्यासाठी इतिहासाचार्य वा.सी. बेंद्रे यांना तब्बल ४२वर्षे सं...

पुस्तक परिचय क्रमांक:१८३ पाटलांची चंची

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१८३ पुस्तकाचे नांव-पाटलांची चंची  लेखकाचे नांव- शंकर पाटील  प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-अकरावी आवृत्ती  पुनर्मुद्रण फेब्रुवारी २०१८ पृष्ठे संख्या–१६८ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य--१५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १८३||पुस्तक परिचय               पाटलांची चंची         लेखक: शंकर पाटील   📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 ग्रामीण अन् विनोदी साहित्याचे दालन आपल्या कसदार लेखणीने वाचक रसिकांना श्रीमंत करणारे जेष्ठ साहित्यिक तथा कथाकार शंकर पाटील. लेखनाच्या क्षेत्रात कथेच्या बीजातून सामाजिक जाणीव जागृती निर्माण करणारे कथाकार. त्यांच्या कथेत खेड्यातील माणसांना नायक करून त्या कथेतील पात्रांच्या बहुरंगी बहुढंगी अंतरंगी खोलात जाऊन शब्दबध्द करणारे शब्दांच्या फडातले पाटील.त्यांच्या विशेषतःवळीव,धिंड आणि आभाळ या कथासंग्रहांना राज्यशासनाने 'उत्कृष्ट वाड्मय'' साहित्याचा पुरस्कार प्...

पुस्तक परिचय क्रमांक:१८२ रानफुलांचा झुला

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१८२ पुस्तकाचे नांव-रानफुलांचा झुला  लेखकाचे नांव-प्रा.सुहास बारटक्के   प्रकाशन-मधुराज पब्लिकेशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती जून २०१७ पृष्ठे संख्या–५४ वाड़्मय प्रकार-ललित कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य--१००₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १८२||पुस्तक परिचय              रानफुलांचा झुला          लेखक:प्रा.सुहास बारटक्के   📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 अवतीभोवती सहजपणे भेटणाऱ्या, दिसणाऱ्या,लक्ष वेधणाऱ्या फुलांचा ललित रम्य परिचय करून दिला आहे.मुलं आणि फुलं याचं नातं अनमोल आहे.सर्वांना टपोरी फुलं आणि सुहास्य वदनाची मुलं आवडतात.सौंदर्य, सुगंध आणि पावित्र्य यांची गुंफण करून अनुभवसंपन्न फुलांचा महोत्सव ‘रानफुलांचा झुला’या आवृत्तीचे रेखाटन आणि दुर्मिळ छायाचित्रे समाविष्ट करुन निसर्गाचे सौंदर्य प्राध्यापक सुहास बारटक्के यांनी गुलदस्त्यात बहरवले आहे. नेत्रदीपक आणि मनाला भुरळ घालणारी फुलझाडांची रंगीत...

पुस्तक परिचय क्रमांक:१८१ आनंद पेरीत जाताना

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१८१ पुस्तकाचे नांव-आनंद पेरीत जाताना  लेखकाचे नांव-दयानंद  घोटकर  प्रकाशन-दिलीपराज प्रकाशन, पुणे  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती जून २०२४ पृष्ठे संख्या–८४ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य--१३०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १८१||पुस्तक परिचय              आनंद पेरीत जाताना          लेखक: दयानंद घोटकर   📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांना संस्कारक्षम होण्यासाठी विचारांचे सौंदर्य कथांमधून ओतप्रोत भरलेले आहे.ते पुस्तक ‘आनंद पेरीत जाताना’ सेवानिवृत्त उपक्रमशील विद्यार्थीप्रिय अध्यापक तथा लेखक दयानंद घोटकर यांनी प्रकाशित केले आहे.सुंदर आकर्षक आणि समर्पक मुखपृष्ठ तर मलपृष्ठावरील प्राध्यापक रवींद्र कोठावदे यांचा ‘ब्लर्ब’आशयप्रधान आहे. अध्यापनात विविधता आणून ते अधिक प्रभावी कसे करता येईल?याचा वस्तुपाठ यातील कथांमधून उलगडून दाखविला आहे.विद्यार्थांमध्ये जबाबदार नागरि...

पुस्तक परिचय क्रमांक:१८० विचारशिल्प

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१८० पुस्तकाचे नांव-विचारशिल्प लेखकाचे नांव-डॉ.अलका गायकवाड   प्रकाशन-साईनाथ प्रकाशन, नागपूर  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती ऑक्टोंबर २०२३ पृष्ठे संख्या–१५४ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य--२००₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १८०||पुस्तक परिचय              विचारशिल्प          लेखक: डॉ.अलका गायकवाड   📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 माणसांना मिळालेलं विचारांची देणं त्याला चिंतनशील आणि सृजनशील बनवते. त्याच्या जीवनाला आकार आणि नाविन्य -पूर्ण कलाटणी मिळते ती विचारांमुळेच! लेखिका डॉ.अलका गायकवाड या पेशाने अध्यापिका.लोकसाहित्य, संतसाहित्य अन् साहित्यातील विविध प्रवाहांचे चिंतन मनन करीत त्यातील वाड्मयीन मूल्यांइतकेच जीवन विचारही आकर्षित करीत असतात. वैचारिकतेच्या प्रक्रियेमुळेच माणूस घडत असतो. भारतीय संस्कृतीतील थोर विचारांची परंपरा असलेल्या महनीय समाज सुधारकांचे खऱ्या अर्थाने हे ‘विचार शिल्प’आहे. ...

पुस्तक परिचय क्रमांक:१७९ सहचर

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१७९ पुस्तकाचे नांव-सहचर लेखकाचे नांव-डॉ.मंजूषा सावरकर   प्रकाशन-कुसूमाई प्रकाशन, नागपूर  प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती  पृष्ठे संख्या–९२ वाड़्मय प्रकार-कथासंग्रह किंमत /स्वागत मूल्य--२००₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १७९||पुस्तक परिचय              सहचर          लेखक: डॉ.मंजूषा सावरकर   📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 “क्षितिजा पल्याड जीवनाचा शोध घेण्यापेक्षा आपल्या अंगणातील अस्तित्वाचा शोध मनाला अधिक उन्नत करत असतो.”असा ब्लर्ब लेखिका डॉ. मंजूषा सावरकर यांचा आहे.आयुष्याची वाटचाल ज्या सहचरामुळे झाली.त्याच्या ओंजळीत हा कथासंग्रह दिला आहे. सहचर म्हणजे पती.त्यांना त्यांची पत्नी ‘अहो’याच नावाने हाक मारत असते. हल्लीच्या पिढीत नवऱ्याचे नाव घेऊन हाक मारण्याची पध्दत सुरु झाली आहे.   आपल्या प्रिय पतीचा जीवनपट,त्याचे अंतरंग आणि व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू छोट्या छोट्या कथांमधून उलगडून दाखविले आहेत.पतीप...

पुस्तक परिचय क्रमांक:१७८ ताई मी कलेक्टर व्हयनू

Image
 वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१७८ पुस्तकाचे नांव-ताई मी कलेक्टर व्हयनू लेखकाचे नांव-राजेश पाटील   प्रकाशन-मनोविकास प्रकाशन,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-सव्वीसावी आवृत्ती ३मार्च २०२० पृष्ठे संख्या–१८४ वाड़्मय प्रकार-आत्मचरित्र किंमत /स्वागत मूल्य--१५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १७८||पुस्तक परिचय              ताई मी कलेक्टर व्हयनू          लेखक: राजेश पाटील   📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚  परिस्थितीच्या झळा माणसाला खूप काही शिकवून जातात.या झळांमुळे माणूस पोळतो,होरपळतो आणि ‘शेकून’निघतो.हे‘शेकून’निघणे म्हणजे एका अर्थाने प्राप्त परिस्थितीशी झगडण्याचे बळ मिळवणे असते.मात्र असे बळ मिळवण्यासाठी सजगता आणि संवेदनशीलता असावी लागते. ती राजेश पाटील यांच्याकडे असल्याने त्यांनी संघर्षातून आपली वाट ‘घडवली.’प्रचंड परिश्रमाच्या आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर; शून्यातून विशाल अवकाशाकडे झेपावणारा संघर्षमय प्रवास करत उच्च पदस्थ आय.ए.एस.अधिकारी झ...

पुस्तक परिचय क्रमांक:१७७ ग्रामसंस्कृती

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१७७ पुस्तकाचे नांव-ग्रामसंस्कृती लेखकाचे नांव- आनंद यादव   प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती २०००पुनर्मुद्रण: जानेवारी २०१२ पृष्ठे संख्या–२०० वाड़्मय प्रकार-ललित लेखसंग्रह किंमत /स्वागत मूल्य--१७०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १७७||पुस्तक परिचय              ग्रामसंस्कृती          लेखक:आनंद यादव   📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 मराठी संस्कृती ‘एक’च असली तरी मराठी खेड्यांना, शहरांना खास अशी त्यांची त्यांची सांस्कृतिक वैशिष्ट्ये लाभलेली असतात.ही वैशिष्ट्ये तेथील विविध प्रकारच्या स्थानिक कारणांतून आणि परंपरातून निर्माण झालेली असतात.या परंपरा भौगोलिक,ऐतिहासिक,धार्मिक असू शकतात. गावाला अंतर्बाह्य त्याची अशी गुणवैशिष्ट्ये आणि खास असा चेहरा मोहरा लाभतो.त्यामुळे एक गाव दुसऱ्या पेक्षा वेगळं असतं.हेच गावचं व्यक्तिमत्त्व असतं.अश्या खेड्यांची ओळख अधोरेखित करणाऱ्या 'ग्रामसंस्कृती'या ग्रंथ...

पुस्तक परिचय क्रमांक:१७६ सुंदर पिचाई

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१७६ पुस्तकाचे नांव-सुंदर पिचाई लेखकाचे नांव- दिगंबर दराडे  प्रकाशन-मायमिरर पब्लिशिंग हाऊस,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती सप्टेंबर २०२३ पृष्ठे संख्या–१७६ वाड़्मय प्रकार-कथा किंमत /स्वागत मूल्य--२५०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १७६||पुस्तक परिचय              सुंदर पिचाई          लेखक: दिगंबर दराडे   📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 गुगलच्या नियंत्रणात सर्व जग आहे,पण ज्याच्या नियंत्रणात गुगल आहे.ते आहेत सुंदर पिचाई. मी जिथे जातो,तिथे भारत माझ्या बरोबर असतो. जगप्रसिद्ध गुगलचा भारतीय वंशाचा सीईओ! सुंदर पिचाई यांचा गुगलचे सीईओ प्रवास ‘सुंदर पिचाई’या पुस्तकात पत्रकार तथा लेखक श्री दिगंबर दराडे यांनी मांडला आहे.ही एक सक्सेस स्टोरी आहे.स्वप्नांना कवेत घेऊन ध्येय साध्य करणारे सर्वोत्कृष्ट कामगिरी करतच राहणारे तंत्रज्ञानातील मसिहा सुंदर पिचाई.तामिळनाडू राज्यातील मदुराई येथील सामान्य कुटुंबात जन्मलेले तैलबुध्दिमत्ता,ह...

पुस्तक परिचय क्रमांक:१७५ तारांगण

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१७५ पुस्तकाचे नांव-तारांगण लेखकाचे नांव- सुरेश द्वादशीवार   प्रकाशन-साधना प्रकाशन,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-दुसरी आवृत्ती  १४फेब्रुवारी २०१२ पृष्ठे संख्या–२२० वाड़्मय प्रकार-कथासंग्रह  किंमत /स्वागत मूल्य--२००₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १७५||पुस्तक परिचय               तारांगण          लेखक: सुरेश द्वादशीवार   📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 वर्णन करावयाच्या व्यक्तीला आपल्या व्यक्तीमत्त्वापासून तटस्थपणे दूर राखणे आणि त्याचे यथातथ्य व वाचकाला भावेल असे वर्णन करणे ज्यांना जमले असे लेखक मराठीत हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच आहेत.त्या परीघातील एक पत्रकार संपादक मुलाखतकार सुरेश द्वादशीवार यांचे व्यक्तीचित्रणं असलेलं पुस्तक ‘तारांगण’.यापूर्वी‘साधना’ साप्ताहिकातून यातील लेख प्रसिद्ध झाले आहेत.“ही नुसती व्यक्तीचित्रे नसून त्यापलीकडे जाऊन अनेक प्रश्नांची उत्तरे देणारी आणि अगोदर हाती आलेल्या काही उत्...