पुस्तक परिचय- ५३ मिरासदारी
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचय कर्ता -श्री रवींद्रककुमार लटिंगे
पुस्तक क्रमांक-५३
पुस्तकाचे नांव--मिरासदारी
लेखकाचे नांव-द.मा.मिरासदार
प्रकाशक-कॉन्टिनेन्टल प्रकाशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-१९६६ आवृत्ती
पुनर्मुद्रणे--२००६
एकूण पृष्ठ संख्या-४७२
वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी, ललित ई. )--कथासंग्रह
मूल्य--२००₹
-----------------------------------------------
विनोदी साहित्याचे दालन आपल्या कसदार लेखणी अन् वाणीने श्रीमंत करणारे जेष्ठ साहित्यिक द.मा.मिरासदार
महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती अकादमीचा विंदा जीवनगौरव पुरस्कार प्राप्त लोकप्रिय विनोदी लेखक व कथाकथनकार द. मा. मिरासदार.
द. मा. मिरासदार ध्वनीक्षेपकासमोर उभे राहून हातवारे करीत बोलू लागले की, श्रोत्यांना एक अद्भुत नाट्य अनुभवायला मिळते.त्यांची विनोदी भाषणेही गाजलेली आहेत.कथेतील व्यक्तींचा विक्षिप्तपणा इरसालपणा ,गंभीरता अणि कारुण्य कथेतून बहरले आहे. उत्तम लिखाण आणि त्याचे उस्फूर्त सादरीकरण यामुळे हास्यकथा वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात त्यांच्या कायमच्या कोरल्या गेल्या आहेत. गावरान व्यक्तिव्यक्तिंचा अस्सल विनोदी संवाद रसिक वाचकांना खळखळून हसवितो.
'बापाची पेंड'या पहिल्याच कथासंग्रहाने ग्रामीण कथाकार म्हणून मान्यता मिळालेले दमा . लेखक मिलिंद जोशी दमांच्या कथांचे यथार्थ वर्णन करताना म्हणतात ,महाराष्ट्राच्या प्रत्येक खेड्यात जसे एक मारुतीचे देऊळ असते, एक पार असतो, एक ओढा असतो, त्या मातीत पिकणारे एक खास पीक असते, तसा गावरान विनोदही असतो.
गावओढ्यासारखा सतत तो खळाळत असतो.भंपक माणसांनी मारलेल्या बढायांतून, अडाण्यांच्या आणि भाबड्यांच्या सहज वागण्यातून, बेरकी लोकांच्या गप्पांतून, जुन्या माणसांच्या आठवणींतून, तरुण लोकांच्या हुंदडण्यातून विनोद उसळ्या घेत असतो. साठ वर्षांपूर्वी मराठी लघुकथेला नवा बहर आला. जुनी चाकोरी सोडून धीट अशा काही नव्या वाटा पाडल्या, त्या प्रा. द. मा. मिरासदार यांच्यासारख्या लेखकांनी.
मिरासदारीच्या निमित्ताने या हास्य कथासंग्रहाची प्रस्तावना जेष्ठ साहित्यिक वा.ल. कुलकर्णी यांनी केली आहे.
प्रा.द. मा.मिरासदारांनी'माझ्या विनोदाची उलटतपासणी'या समारोपाच्या सदरात मी विनोद लेखक कसा झालो?याचे खुमासदार शैलीत यथासांग वर्णन केले आहे. लहानपणी माझ्या आवडीच्या गोष्टी दोन गोष्टी होत्या पुस्तकें आणि गप्पा. जसे वाचायला येऊ लागले तसा मी पुस्तके वाचू लागलो. जसे एखाद्या ताटात वाढलेल्या पदार्थाचा फडश्या पाडावा तसा मी दिसेल ते पुस्तक किंवा न समजणाऱ्या विषयावरील एखादा ग्रंथ असो. समोर दिसेल ते पुस्तक नाकाला लावून त्याची पानावर पाने उलटायची सवय त्यांना लागली.
ते म्हणतात,'माझी कथा कसली तरी गोष्ट असते.सुरस आणि मनोरंजक निवेदन शैलीने ती गोष्ट मी सांगतो.
वाचन आणि गप्पागोष्टींचे मला जबरदस्त वेड आहे.'
कथेतील पात्रं मला शोधावी लागली नाहीत.तर तीच मला शोधत शोधत घरी आली. नेहमी खेडेगावातील पक्षकार मंडळी सकाळ- संध्याकाळ वडीलांच्या बैठकीच्या खोलीत बसलेली असते.ती नाना प्रकारच्या गोष्टी सांगत असत.ते संभाषण मी कान देऊन ऐकत होतो.
त्यामुळे कथांचा कच्चामालाची आवक ते स्टोअर करीत होते. अनुभवविश्र्व हीच विनोदाची बैठक असते.'माझी पहिली चोरी'ही विनोदी कथा नसून ती एक सामाजिक टीका आहे.अशा अनेक सुरस,मिश्कीलहास्य,आशय गर्भित,इरसाल आणि व्यक्ती सापेक्ष गुणांच्या आधारावर गोष्टी आहेत
नव्याण्णवबादची एक सफर, भुताचा जन्म, धडपडणारी मुले,व्यंकूची शिकवणी, शिवाजीचे हस्ताक्षर,कोणे एके काळी,नदीकाठचा प्रकार, शाळेतील समारंभ, माझी पहिली चोरी, विरंगुळा, निरोप, माझ्या बापाची पेंड,गवत, साक्षीदार, झोप, आजारी पडण्याचा प्रयोग, पाऊस,ड्राईंग मास्तरांचा तास,स्पर्श, पंचनामा,बांबू शेलाराचे धाडस आणि चोरी: एक पत्रकार
अशा आशयगर्भ मिश्किली बावीस कथांची मेजवानी रसिकांना खळखळून हसविणाऱ्या आहेत.प्रत्येक कथेतून व्यक्तींचे चेहरे दिसतात.
वाचताना त्या व्यक्तींचे दर्शन घडते.ही ताकद समर्थ लेखणीची आहे. या कथांचे रसग्रहण करताना पानोपानी आपल्याला जाणिव होते.नकळतपणे आपण मनातून दाद देत पुढे वाचत जातो.कथांचे गोष्टीरुप वाचताना आपण मंत्रमुग्ध होऊन शकतो.अबोल कथा वाचताना बोलक्या होतात.
# श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
__________________________
खूपच छान
ReplyDeleteखूप सुंदर
ReplyDeleteधन्यवाद
ReplyDelete