पुस्तक परिचय क्रमांक-६७ मुलांचे ग्रंथालय




वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य

 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई

 पुस्तक क्रमांक-६७

 पुस्तकाचे नांव--मुलांचे ग्रंथालय

पुस्तकांशी नाते जोडताना…..

 संपादकाचे नांव--मंजिरी निंबकर

प्रकाशक-ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे

प्रकाशन वर्ष व आवृत्ती-मे २०१९/प्रथमावृत्ती

एकूण पृष्ठ संख्या-८६

वाङमय प्रकार---ललित 

मूल्य--१००₹

📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚

६७||मुलांचे ग्रंथालय

पुस्तकांशी नाते जोडताना….

संपादक- मंजिरी निंबकर

-----------------------------------------------

ग्रंथालय आणि पुस्तके हे शालेय विविध विषयाचे पाठ्यक्रम, साक्षरता,खेळ,कला आणि मनोरंजन, मुलांच्या सामाजिक व भावनिक विश्र्वातील वैविध्य जोडणारा दुवा आहे.बाल साहित्य वापरून मुलांमध्ये वाचनाची आवड व प्रेम निर्माण करण्याचे कौशल्य शिक्षक पालक आणि ग्रंथपाल यांच्यामध्ये विकसित झाले तर मुलांची पाऊले शाळेबरोबर ग्रंथालयाकडे वळतील.कारण वाचनालये,ग्रंथालये ही जर शाळेची आत्मा बनली.तर मुलांना नियमितपणे वाचनाची सवय लागेल. कल्पनेच्या भराऱ्या घेण्याचे,स्वतंत्र विचार करण्याचे, कुतूहलाने प्रश्न विचारण्याचे आणि नवा अर्थ लावण्याचे स्वातंत्र्य ग्रंथालयात मिळेल.स्वयंअध्ययनाची सवय लागेल.


मुलांची पुस्तकांशी दोस्ती-मैत्री व्हायला सुरुवात होईल. केवळ दिनविशेष दिनीच वाचनाचे उपक्रमशील अनुकरणीय सोपान करण्यापेक्षा मुलांना ग्रंथालयात जाऊन पुस्तक वाचण्याची आवड कशी निर्माण होईल.यासाठी ''मुलांचे ग्रंथालय, पुस्तकांशी नाते जोडताना.'' या कृतीयुक्त पुस्तकाचे संपादन मंजिरी निंबकर यांनी केले आहे.


आपल्या देशात पूर्वी लहान मुलांसाठी केवळ मनोरंजनासाठी गोष्टींची पुस्तके होती.त्यातील बहुसंख्य लेखन इसापनीती पंचतंत्र,राक्षसाची गोष्ट,प्रीती गोष्ट,राजा-राणीची गोष्ट,चंपक, कॉमिक्स, चतुर बिरबलाच्या गोष्टी,चांदोबा आदि पुस्तके वाचायला मिळायची.


    सन २००५च्या राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या आराखड्यात पुस्तके आणि ग्रंथालयाचे मुलांच्या आयुष्यातील महत्त्व अधोरेखित केले आहे.स्वतंत्र ,क्रांतिकारी असे प्रयोग करून बालसाहित्य निर्माण करण्यासाठी लक्ष देण्यात आले आहे.मुलांचा सर्वांगिण विकास होऊन,मुलांच्यात वाचन संस्कृती रुजविण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद,समग्र शिक्षा अभियान आणि महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या वतीने आमुलाग्र परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न सुरू झाले आहेत. पाठ्यक्रमा सोबतच मुलांसाठी पूरक वाचनासाठी आकर्षक,रंगीत, चित्रमय पुस्तके शाळांपर्यंत पोहोचली आहेत.चित्र अक्षरटाईप वयानुरूप असूनआशय पातळीही इयत्तानिहाय आहे.


या पुस्तकात ग्रंथपाल,पालक आणि शिक्षक यांच्यासाठी ग्रंथालयाच्या माध्यमातून जगाशी नाते कसे जोडता येईल, याचे मार्गदर्शन करणारी ही पुस्तिका आहे.विविध ग्रंथपालांनी वेगळ्या पद्धतीचेअनवटवाटेने राबविले उपक्रम व प्रयोग सोदाहरण दिले आहेत.ग्रंथालयाचा नेमका वापर कसा अभिप्रेत आहे.यावर विवेचन करणारे लेख सहज सुंदर भाषेत ग्रंथपाल लिखित व्यक्त झाले आहेत.


 संपादक मंजिरी निंबकर यांचे मुलांचे ग्रंथालय,वाचून दाखविण्याचे महत्त्व आणि पुस्तकांनी विस्तारले. शिक्षण, विद्यादेवी काकडे यांचा ग्रंथपालाची भूमिका,प्रोफेसर कृष्ण कुमार लिखित गोष्टी सांगण्याचे महत्त्व,तर मधुरा राजवंशी यांचा प्रवासाच्या गोष्टींच्या पुस्तक प्रवासाची गोष्ट, तसेच अमृता धडाम्बे यांचा घाटपायथ्याची ग्रंथपाल नीता इंगळे यांचा पुस्तकांमुळे घडते मूल आणि सुप्रिया महामुनी यांचा जिवाभावाचे सोबती असे वैशिष्ट्येपूर्ण आशयाशी निगडित लेख वाचनिय आहेत.तसेच पुस्तकांसोबत करावयाचे कृतीयुक्त उपक्रम आणि खेळ यांचीही तपशीलवार माहिती दिली आहे.


  काचेच्या बंद दरवाजांची कपाटे,शांत आणि धीरगंभीर वातावरणात जुनी पिवळट पडलेली ,बाईडिंग केलेली जाडजुड पुस्तके असं जर ग्रंथालयाचे वातावरण असेल ,तर मुलं तिथं कशी रमणार आणि वाचनाची गोडी कशी लागणार.यासाठी भौतिक सुविधा,भिंती,ग्रंथालयातील मांडणी कशी असावी?आकर्षक व सुंदर कसे करावे? याचे तपशीलवार विवेचन 'मुलांचे ग्रंथालय'या लेखात केले आहे.


आवश्यक तिथं कृतीयुक्त कृष्णधवल छायाचित्रे नजर वेधतात.त्यावरुनही विषयाची माहिती लक्षात येते. 'ग्रंथालयातील ग्रंथपालाची भूमिका' या लेखात विचार मांडताना विद्यादेवी काकडे सहजसुंदर शब्दात विवेचन करतात.मुलांसाठी पुस्तकांचे भांडार खुले असावे.पुस्तके पाहून हाताळून घेण्याची संधी मिळावी.नवीन पुस्तके प्रदर्शित करावीत.मुलांना पुस्तकांचीओळख होण्यासाठी पुस्तकांचे प्रदर्शन भरवावे.मुलांच्या आवडी-निवडी, विचार-कल्पना जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणे. पुस्तक जंत्री कशी असावी याची माहिती दिली आहे.


प्रकट वाचनाप्रमाणेच स्वयंवाचन हेही महत्त्वाचे कौशल्य आहे.जेवढे स्वयंवाचन अधिक तितकी विषय प्राविण्यता अधिक असते.मुले वाचतील व्हायला स्वयंवाचन  होणे गरजेचे आहे.दररोज शाळेत ठराविक वेळेत स्वयंवाचन घ्यावे.पालकांनी मुले पुस्तकात रमण्यासाठी घरीही मासिके, वर्तमानपत्रे,गोष्टींची पुस्तके तसेच ई-बुकही उपलब्ध करून देता येईल.


 ग्रंथालयासाठी पुस्तकांची निवड कशी असावी याची माहिती वैविध्यपूर्ण पध्दतीने या लेखात मांडली आहे.तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम व खेळांचा उपयोग करून मुलांशी पुस्तक मैत्री कशी घडेल आणि वाचन संस्कृतीची चळवळ संवर्धनासाठी या पुस्तकाचे वाचन जरुरीचं आहे.छानच माहिती सहजसुंदर शब्दात व्यक्त केली आहे.शिक्षक पालक आणि ग्रंथपाल यांना उपयुक्त व मार्गदर्शक माहिती आहे.


✒️ परिचय कर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई.

लेखन दिनांक २३ सप्टेंबर २०२१

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड