पुस्तक परिचय क्रमांक-६८ सांजवात
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-६८
पुस्तकाचे नांव--सांजवात
लेखकाचे नांव--वि.स.खांडेकर
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-पुनर्मुद्रण हे २०१६
एकूण पृष्ठ संख्या-९०
वाङमय प्रकार --कथासंग्रह
मूल्य--१२०₹
📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚
६८|पुस्तक परिचय
सांजवात
लेखक-वि.स.खांडेकर तथा भाऊसाहेब
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
मराठी साहित्याला खऱ्या अर्थाने देश पातळीवर लोकप्रियता मिळवून देणारे महान ऋषितुल्य गुरुवर्य ज्येष्ठ साहित्यिक, पटकथा लेखक,ज्ञानपीठ पारितोषिकाने सन्मानित झालेले भाऊसाहेब तथा वि. स.खांडेकर अशा अनेकविध बिरुदावलीने सन्मानित झाले आहेत.त्यांची साहित्य संपदा विपुल असून साहित्यक्षेत्रातील चौफेर क्षेत्रात लेखन केले आहे.त्यातीलच एक कथासंग्रह 'सांजवात' होय
या अक्षरशिल्पात लघूकथांचे लेखन कसे घडले.अन् त्या कथेतील आशय आणि व्यक्तिंचा उलगडा दोन शब्द या शीर्षकाखाली भाऊसाहेबांनी केला आहे.यात तीन जगे, शिखर,दोन मोसंबी,शांती,सोन्याची गाडी, दोन भुते आणि सांजवात या नावाच्या सप्त कथा आहेत.यातून व्यक्तींचे चेहरे आणि मुखवटे कसे असतात.याचे अस्सल नमुने वाचायला मिळतात.लोकांची वागण्याची बोलण्याची आणि कृतीची पध्दत कशी असते.हृदयात एक अन् तोंडात एक अशा पध्दतीने लोकं का वागतात.हे समजून जाते.
या लघूकथा भाऊसाहेबांनी युद्ध पूर्व काळात लेखणीबध्द केलेल्या दिसून येतात. गदिमा टीकाकारांचा खरपूस समाचार घेताना ते म्हणतात,'साहित्याचा चव्हाटा हा आठवड्याचा बाजार असल्याने असले धक्के खाण्याची सवय आता माझ्या अंगवळणी पडली आहे. उखाळ्यापाखाळ्या काढणे आणि कोपरखळ्या मारणे यापलीकडे ज्यांच्या बुध्दीची गती जात नाही.असे टीकाकार संसाराप्रमाणेसाहित्यातही असायचेच.त्यांचे उद् गार उद् बोधक नसलेतरी मनोरंजन निश्र्चितच करतात.पावसाळ्याच्या आरंभी पृथ्वीवर लुकलुकणाऱ्याकाजव्यांपासून आकाशात चमचमणाऱ्या विजेपर्यंतची विविध तेथे मनुष्याला दर्शनीय वाटत असली,तरी त्यांची तुलना सूर्यप्रकाशाशी करण्याचा वेडेपणा कोण करेल?
शिरोड्याला असताना ज्या एकाच वृत्तीने लघूकथा लिहिलेल्या होत्या.त्या कोल्हापूरात आल्यावर मला दुर्लभ झाल्या.कारण माझे नैसर्गिक मित्र समुद्र किनारा आणि टेकडी मला पारखे झाले.भौतिक संस्कृतीच्या जरतारी चिंध्यांनी त्यांच्या जखमा बांधल्याने ते फक्त जगाला दिसत नाही.तदनंतर याची जाणीव भाऊसाहेबांना झाल्यामुळे लोकांची सुखाची व्याख्या बदलली.मनुष्याच्या शरीराच्या सावली इतकीच त्याच्या मनाची काळी बाजूही त्याच्या सोबत जन्माला आली.आणि ती जगाच्या अंतापर्यंत जिवंत राहणार हे त्यांना उमगले.
'पापाचा पैसा'या शब्दप्रयोगाला त्यावेळी सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीने काही तरी विकृत अर्थ होता.चेहरे आणि मुखवट्याची ओळख या कथांतून भाऊसाहेबांनी उलगडून दाखविलीआहे.
कथांचे हृदगताचे सविस्तर वर्णन वाचताना आपणाला त्याकाळातील माणसांच्या स्वभाव वैशिष्टयांची ओळख होते.व्यक्तिमन आणि समाजमन यातल्या अंतराकडे दुर्लक्ष करून त्याचा पुरस्कार करणाऱ्याच्या वाट्यालाही पदरात अपयश पडते.हे शांती या कथेतून उलगडले आहे.'दोन भुते'ही लघूकथा रुपक कथा असून देव आणि स्वत:च्या प्रयत्नावर काय,जोपर्यंत अर्धवट श्रद्धा ठेवणाराचीच संख्या जगात जास्त आहे.तो पर्यत त्याला मार्ग दाखविणाऱ्या विचारवंतांची त्याच्याकडून उपेक्षाच होत राहणार.हे कटू सत्य सूचित केले आहे.
'सांजवात'ही कथा रसिक वाचकांची सर्वात आवडणारी आहे.हे भाऊसाहेबांनी स्पष्ट केले आहे.देशभक्तीची पार्श्वभूमी असणारे कथानक आहे.या कथेवर तेव्हा किर्लोस्कर मासिकात दुसऱ्या कुणीतरी ही कथा कशी लिहिलीअसेल यावर लेख छापून आला होता.सांजवात मध्ये आईच्या तोंडी 'हवा तो दे तू मान !पण ज्याला देव म्हणशील त्याच्यावर ठेव भाव. त्याच्या पूजेकरिता प्राण द्यायची पाळी आली, तरी' असं काळजाला भिडणारे वाक्य आहे.आईची जीवनश्रध्दा हाच कथेचा प्रेरक आहे.
'सोन्याची गाडी' ही कथा कौटुंबिक असून मानवी जीवन निर्मळ आणि प्रगतिशील ठेवण्यासाठी लागणारी श्रद्धा आधुनिक काळात दिवसेंदिवस लोप पावतेय याचे चित्रण करणारी आहे.कीर्तीच्या, वैभवाच्या आणि स्वता:च्या महत्त्वाकांक्षेच्या तृप्तीच्या नादात ते नकळतपणे आपले जीवनातले सर्वात मोठे कर्तव्य विसरून जातात.जशी पाण्याच्या अतिरेकामुळे झाडांची मुळे कुजून जातात, तशी श्रीमंतीत वाढणाऱ्या मुलांचीही दुर्गुणांची अधिक मोठी खाण आसते.माणसाचे नैतिक अध:पतन कसे होते.ते ही कथा वाचताना लक्षात येते.
'दोन मोसंबी'या गोष्टीची पार्श्वभूमी अधिक व्यापक आहे. जीवनाला आधारभूत असलेल्या एका श्रध्देचा-माणुसकीचा प्रश्नच याकथेत चितारलय. देशसेवेत प्रामाणिकपणे कर्तृत्वाचे सर्व आयुष्य घालवल्यामुळे तो कफल्लक झालेला आहे.तशातच तापाने फणफणाऱ्या
आजारी भाचीसाठी दोन मोसंबी कुठून आणावित या विवंचनेत पडलेला कवी या कथेचा नायक आहे.कुठूनतरी पाच रुपये मिळावेत म्हणून तो संपादक, डॉक्टर, चित्रपट निर्माते इत्यादी बड्या परिचितांच्या घरांचे उंबरे झिजवतो.काम होईल म्हणून आशाळभूतपणे पाहतो.पण कोणीही त्याला पैसे देत नाही.
पण याच वेळी परस्त्रीचा विनयभंग केला या आरोपावरून पोलिस कस्टडीत जगू भेटतो.
अठराविसे दारिद्रयातही मनुष्य सच्चेपणाने कसा राहतो यांची प्रचिती जगू आणि शेवंता यांच्यात खरे जीवनसर कवीला दिसतो.पण आता अश्रध्देने तो अस्वस्थ होत नाही, तो हसत हसत तिला म्हणतो, 'मी ही स्वप्नात तुझ्या जादूच्या बागेत गेलो होतो. मलाही तिथं दोन मोसंबी मिळाली. त्या मोसंब्यांपैकी एकाचं नाव आहे जगू आणि दुसऱ्याचं शेवंती.
'तीन जगे' यात आजच्या आर्थिक आणि सामाजिक क्रांतिच्या स्वप्नांळू कल्पना साध्यासुध्या जीवनमुल्यांना जे विकृत आणि ढोंगी स्वरुप प्राप्त झाले आहे.त्याचे कथन केले आहे. पहिले श्रीमंतांचे जग,दुसरे गरिबांचे जग, आणि तिसरे या दोन जगांच्या सरहद्दीवर लुढबुडणाऱ्या मध्यमवर्गीयांचे जग!या कथेतला रघुनाथ हा मध्यम वर्गातला अर्धजागृत,पण दुर्बळ आत्म्याचा प्रतिनिधी आहे.त्याला दलितांचे दुःख कळते,ते दूर करण्याकरता तो यथाशक्ती धडपड करत असतो.पण त्याची स्वतःची शक्ती मर्यादित असते.सितारामचे एकशे साडेसदतीस रुपयांचे कर्ज फेडणे ही या सहृदय कारकुनाची आवाक्या बाहेरची गोष्ट आहे.शेठजी भावाला भेट म्हणून एका वेळेला एकदम एवढ्या रकमेचे आंबे विकत घेऊन देऊ शकतात.हे तो उघडल्या डोळ्यांनी बघतोआणि तेवढ्याच रकमेकरिता सीतारामा सारख्या होतकरू मुलाला कष्टाने मिळवलेले शिक्षण अर्धवट सोडून देऊ नोकरीच्या पाठीमागे भटकत जावे लागते.हे ही तो बघतो. अश्रुंनी कोणतीच सामाजिक क्रांती होणार नाही. तिच्यासाठी मानवी आत्म्यातला सुप्त अग्नीच भडकावा लागतो.तेव्हाच विशाल सामाजिक क्रांतीचे पाऊल पुढे पडेल असे भाऊसाहेबांना वाटते.सामाजिक समाजवादी अभिसरणाच्या आणि जीवनमूल्यांची आठवण करुन देणाऱ्या या कथा आहेत.वाचताना यांची जाणीव होतेच. Teach me something to be brave. अप्रतिम कथासंग्रह वाचक रसिकांच्या संग्रही असावा...
परिचय कर्ता-रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
२७ सप्टेंबर २०२१
Comments
Post a Comment