पुस्तक परिचय क्रमांक:१९२ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर

वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई पुस्तक परिचय क्रमांक-१९२ पुस्तकाचे नांव-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर लेखक: दिलीप बर्वे प्रकाशन-दिलीपराज प्रकाशन,पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती १डिसेंबर २०२४ पृष्ठे संख्या–९४ वाड़्मय प्रकार-ऐतिहासिक चरित्र किंमत /स्वागत मूल्य--१४०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚 १९२||पुस्तक परिचय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर लेखक: दिलीप बर्वे 📚📚📚📚📚📚📚📚📚📚 “हर हर महादेव,हर हर महादेव!” कर्मयोगिनी रणरागिणी दातृत्वसरिता धर्मपरायण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्राची ओळख महाराष्ट्रातील सर्वांना व्हावी. यास्तव लेखक दिलीप बर्वे यांनी ‘सती न गेलेली सती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’हे जीवनचरित्र ३००व्या जन्मदिनाच्या निमित्ताने रेखाटले आहे. वाचन साखळी समूहाचे प्रसिध्दी प्रमुख तथा ब्लॉग रायटर आदरणीय कचरु चांभारे सरांनी मला बक्षिसरुपाने भेट दिलेला ग्रंथ.त्याबद्दल सरांना मनस्वी धन...