पुस्तक परिचय क्रमांक-९०सुरेश भट ह्यांची निवडक कविता
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई पुस्तक क्रमांक-९० पुस्तकाचे नांव--सुरेश भट ह्यांची निवडक कविता १९४६ ते १९९६ संपादकाचे नांव--शिरीष पै प्रकाशक-साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी,नागपूर प्रकाशन वर्ष व आवृत्ती-मार्च २०१८/ सहावी आवृत्ती एकूण पृष्ठ संख्या-२०० वाड्मय प्रकार---काव्यसंग्रह मूल्य--२००₹ 📖📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 ९० ||पुस्तक परिचय सुरेश भट ह्यांची निवडक कविता संपादक:शिरीष पै ♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️ माझिया गीतांत वेडे दु:ख संतांचे भिनावे; वाळलेल्या वेलीस माझ्या अमृताचे फूल यावे!! --कवीवर्य गझलसम्राट सुरेश भट गझलकार सुरेश भटांच्या कवितेत पंडित- अपंडित दोघांनाही हलवण्याचे सामर्थ्य आहे. सुरेश भट यांची कविता वाचताना त्यातल्या दु:खाच्या अनुभूती आस्वादकालाही आपल्या वाटतात. संवाद सुरू होतो.इथेच भटांचे यश आहे.मराठी कवितेच्या प्रांतात भटांना असली आपुलकी आजही लाभली आहे...