जागतिक मैत्रीदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! मैत्रीचे नाते जपणाऱ्या तमाम मित्रमैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा!! मैत्रीचे नाते.......... आपुलकीने जपते निरपेक्षपणे उभारते सुखदुःखात उमगते हितगुजाने बहरते | मैत्रीचे नाते.......... जिवापल्याडचे नाते शुभचिंतक असते लढण्याचे बळ देते उर्मीला प्रेरणा देते | मैत्रीचे नाते.......... संकटात मशाल होते गगनाचा आधार बनते प्रसंगावेळी धीर देते स्पष्टतेने व्यक्त होते | मनाचे कवाड उलगडते मर्म जाणून मंथन करते मोद हर्षाचा झरा होते कौतुके खांद्याव मिरवते| दुःख अडवायला उंभऱ्यासारखा , मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……… १ वाट चुकणार नाही जीवनभर कोणी, एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……. २ आत्महत्याच करणार नाही कोणी, मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…….. ३ त्रासलो जिंदगी चाळताना पुन्हा, बस धडा मैत्री वाचण्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा……. ४ मैत्री चाटते गाय होऊन मना, जा बिलग तू तिला वासरासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा…… ५ कवी...