निसर्ग सौंदर्य काव्य पुष्प-१९५
निसर्ग सौंदर्य
निळसर आभाळात पुंजके ढगांचे
क्षितीजा पल्याड एकत्र दिसते
हिरवेगार डोंगरावर झाडींचे गालिचे
क्षणभरात दृश्य नजरेस पडते|
धरणाचा फुगवटा मातीशी खेळतो
काठाच्या झुडूपांना सामावून घेतो
तरंगावर पाना-फुलांना नाचवितो
निष्पर्ण झाडांची शिल्पे घडवितो|
खेळायला आभाळ खाली आलं
जलातल्या सावलीशी बघतं झालं
वारं पानांपानात सळसळू लागलं
हळूवार जलतरंग उमटवू लागलं |
विहंगम दृश्याने मन रेंगाळते
जलाचे सौंदर्य स्मरणात ठेवते
पाखरांची किलबिल गाणं गाते
नीरव शांततेत आनंद वाटते|
श्री रविंद्र लटिंगे ओझर्डे वाई
काव्य पुष्प-१९५
यापूर्वीच्या कविता व लेख वाचण्यासाठी खालील ब्लाॅगला भेट द्यावी.
https://raviprema.blogspot.com
सुंदर रचना केली आहे
ReplyDelete