प्रति, आ.श्री.रवींद्रकुमार लटिंगे सर, मुख्याध्यापक,जिल्हा परिषद शाळा कोंढावळे,ता.वाई,जि.सातारा. स.न.वि.वि. सर्वप्रथम आपले मनापासुन अभिनंदन करतो. महाराष्ट्र राज्य वाचनसाखळी समुहावर आपण शंभर पुस्तकाचे वाचन करुन सुंदर अशा वाचनीय शब्दामध्ये आपण परिचय करुन दिलात आणि ' वाचनयाञी ' हा पुरस्कार मिळविणारे समुहाचे दुसरे विजेते बनलेले आहेत. खरच,ह्रदयातुन अभिनंदन.इच्छाशक्ती,चिकाटी, सातत्य,प्रबळ अशी दृढ महत्वाकांक्षा,शब्दावरील प्रेम आणि निष्ठा,अविरत पणे परिश्रम करण्याची तयारी आणि वाचनाची आवड मनापासून जोपासणारे सिद्धहस्त लेखक म्हणजेच आ.रवींद्रकुमार लटिंगे सर. तुम्ही इतरांसाठी प्रेरणा आहात सर.तुमच्याकडून बरच काही शिकण्यासारखं आहे सर. प्रांपचिक जबाबदारी,शाळा हे सर्व सांभाळून आपण पुस्तक परिचयाची शतकपुर्ती साजरी केलीय.या काळात तुमची स्वतःची दोन पुस्तके प्रकाशित सुद्धा झालेली आहे.याबद्दल तुमच मनापासुन कौतुक. तुम्हाला मिळालेला हा पुरस्कार तुमच्या व्यांसगाचा आणि साहित्यावरील निर्व्याज अशा प्रेमाचा आहे. पुढेही तुमच समिक्षण कार्...