पुस्तक परिचय क्रमांक-७२ साताऱ्याच्या सहवासात
वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई पुस्तक क्रमांक-७२ पुस्तकाचे नांव--साताऱ्याच्या सहवासात लेखकाचे नांव--श्री सुनील शेडगे प्रकाशक- वैभव शेडगे, शाकुंतल प्रकाशन, सातारा प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती नोव्हेंबर २०१९ एकूण पृष्ठ संख्या-१३६ वाङमय प्रकार ----पर्यटन व प्रवासवर्णन मूल्य--२००₹ 📖📚📚📚📚🍁📚📚📚📚🍁 ७२||पुस्तक परिचय साताऱ्याच्या सहवासात लेखक सुनील शेडगे ☘️🍁☘️🍁☘️🍁☘️🍁☘️🍁☘️🍁☘️ 'देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे| मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे| देखणी ती पाऊले जी ध्यासपंथी चालती| वाळवंटी सुद्धा स्वस्तिपद्मे रोखिती||' निसर्ग कविवर्य बा. भ. बोरकर यांच्या वरील काव्यपंक्तीची उपमा, ज्यांना 'देखने हात आणि देखणी दृष्टी' लाभलेली आहे.असे प्रतिभासंपन्न पत्रकार, छायाचित्रकार आणि ब्लॉग लेखक म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मित्रवर्य सुनील शेडगे सर माझे साहित्यातील प्रेरणास्थान ज्यांच्या मुळे मी माझी दोन पुस्तके प्रकाशित करु शकलो. 'हिरवी पाती' व 'पाऊले चालती'या दोन पुस्तकांची प्रस्त...