Posts

Showing posts from 2021

छायाचित्र चारोळी आत्मप्रेरणा

Image
मुलांची सातत्यपूर्ण सर्वांगीण  गुणवत्ता आकड्यांच्या फूटपट्टीने मापू नका .... आवडीच्या क्षेत्रात करीअर करायला  त्यांच्या पंखात आत्मप्रेरणेचे बळ द्या…

छायाचित्र चारोळी काळीज कप्पा

Image
आठवण सरींचा धांडोळा  काळीज कप्प्याने उलगडला| एकेक कप्पा वाचताना मनात  रुंजी घालू लागला  | मुलायम शब्दकळेने गंधल्या संवेदना  गतस्मृतीला शब्द देती चेतना| सिंहावलोकनाची लक्षवेधी संकल्पना  सुखद क्षणाच्या अंतरंगी भावना||

वाचनयात्री पुरस्कार प्रसिध्दी बातम्या

Image

छायाचित्र चारोळी वाचन यात्री पुरस्कार

Image
'अक्षरप्रभुंचे शब्दांगण सजवायला वाचनसाखळीचे स्नेही शुभेच्छेला || चैतन्याचे चांदणे फुलले सांजेला "वाचनयात्रीने" सन्मानित केले रवीला||'

वाचन यात्री पुरस्कार अहवाल प्रतिभाताई

Image
सत्कार मूर्ती सन्माननीय श्री. रवींद्रकुमार लटिंगे,  मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा कोंढावळे, तहसील वाई, जिल्हा सातारा यांचा  #वाचनयात्री पुरस्कार सत्कार समारंभ एक कौटुंबिक सोहळा.....  काल शनिवार दिनांक 25/ 12/ 2021 रोजी देवगिरी हॉटेल येथे सुंदर आयोजन व नियोजनात वाचनयात्री  पुरस्कार सत्कार सोहळा संपन्न झाला. त्याचा संक्षिप्त आढावा मांडण्याचा  छोटासा प्रयत्न.   या समारंभात वाचन साखळी  समूह महाराष्ट्र राज्य संयोजिका या नात्याने अध्यक्षपद भूषविण्याचा  मान मला मिळाला.  आपण सुरू केलेल्या एखाद्या छोट्याशा उपक्रमात हजारो लोकांनी सहभागी व्हावे व इवल्याशा रोपट्याचे अवघ्या 18 महिन्यात वटवृक्षात रुपांतर व्हावे याचा आनंद नसे थोडका.   19 डिसेंबर 2021 ला वाचन साखळी समूह सदस्य, लेखक, आदर्श मुख्याध्यापक माननीय रवींद्र लटिंगे  सर यांच्या शंभराव्या  पुस्तक परिचयाची  पोस्ट पडताच  त्यांना समूहातर्फे वाचनयात्री पुरस्कार जाहीर झाला.  पुरस्कार जाहीर करून मी थांबले.....  पण आदरणीय श्री. गणेश तांबे सर वाचन साखळी समूह सदस्य...

पुरस्कार सन्मान सोहळा

Image
ऋणानुबंध जपणाऱ्या सन्माननीय स्नेहीजणांचे कृतज्ञतापूर्वक वंदन!!! 'अक्षरप्रभुंचे शब्दांगण सजवायला वाचनसाखळीचे स्नेही शुभेच्छेला | चैतन्याचे चांदणे फुलले सांजेला "वाचनयात्रीने" सन्मानित केले रवीला||'  *श्री.रविंद्रकुमार लटिंगे सर हे साहित्य क्षेत्रातील चालते-बोलते ज्ञानपीठ,राज्यस्तरीय वाचनयात्री पुरस्काराने सन्मानित*  आज *वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य आयोजित वाचनयात्री पुरस्कार वितरण सोहळा वाई येथील देवगिरी हॉटेल या ठिकाणी अतिशय उत्साहात संपन्न झाला* श्री.रविंद्र लटींगे सर यांनी केवळ चार महिन्यांमध्ये१०० पुस्तकांचे अतिशय उत्कृष्टरित्या पुस्तक परिचय केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. वाचन साखळी समूह हा जवळपास ७५०० सदस्यांचा समूह असून यामध्ये वाचनयात्री पुरस्काराचे ते दुसरे मानकरी ठरले.तर पहिले मानकरी हे सातारा जिल्ह्यातील श्री.गणेश तांबे,फलटण हे आहेत . सदर पुरस्कार वितरण प्रसंगी वाचनसाखळी समूहाच्या संयोजिका श्रीमती.प्रतिभाताई  लोखंडे, लेखिका व कवयित्री सौ.अंजलीताई गोडसे, वाचनयात्री पुरस्काराचे प्रथम मानकरी व लेखक श्री.गणेश तांबे,आत्मप्रेरणा पुस्तकाचे लेखक श्री. लक्...

वाचनयात्री पुरस्कार अभिप्राय

Image
प्रति, आ.श्री.रवींद्रकुमार लटिंगे सर, मुख्याध्यापक,जिल्हा परिषद शाळा कोंढावळे,ता.वाई,जि.सातारा.                        स.न.वि.वि. सर्वप्रथम आपले मनापासुन अभिनंदन करतो. महाराष्ट्र राज्य वाचनसाखळी समुहावर आपण शंभर पुस्तकाचे वाचन करुन सुंदर अशा वाचनीय शब्दामध्ये आपण परिचय करुन दिलात आणि ' वाचनयाञी ' हा पुरस्कार मिळविणारे समुहाचे दुसरे विजेते बनलेले आहेत. खरच,ह्रदयातुन अभिनंदन.इच्छाशक्ती,चिकाटी, सातत्य,प्रबळ अशी दृढ महत्वाकांक्षा,शब्दावरील प्रेम आणि निष्ठा,अविरत पणे परिश्रम करण्याची तयारी आणि वाचनाची आवड मनापासून जोपासणारे सिद्धहस्त लेखक म्हणजेच आ.रवींद्रकुमार लटिंगे सर. तुम्ही इतरांसाठी प्रेरणा आहात सर.तुमच्याकडून बरच काही शिकण्यासारखं आहे सर. प्रांपचिक जबाबदारी,शाळा हे सर्व सांभाळून आपण पुस्तक परिचयाची शतकपुर्ती साजरी केलीय.या काळात तुमची स्वतःची दोन पुस्तके प्रकाशित सुद्धा झालेली आहे.याबद्दल तुमच मनापासुन कौतुक. तुम्हाला मिळालेला हा पुरस्कार तुमच्या व्यांसगाचा आणि साहित्यावरील निर्व्याज अशा प्रेमाचा आहे. पुढेही तुमच समिक्षण कार्...

वाचनयात्री पुरस्कार ऋणनिर्देश

Image
                   ऋणनिर्देश पुस्तकपरिचय अनमोलभेट देवूया   वाचन चळवळीला हातभार लावूया  साहित्यकलेचे अवघे अनमोल भांडार वाचायला मिळती नानाविध प्रकार | वाचनसाखळीने ज्ञानयात्री जोडले  लेखक कवी समीक्षक स्नेही भेटले  वाचनाने विचाराला चालना मिळाली लेखनाची अभिरुचीत वाढ झाली| आपला वाचनसाखळी फेसबुक  म्हणजे महाराष्ट्रातील नवसाहित्यिकांची लेखणी व वाणीची शृंखला आहे.लेखनाचा व्यासंग जपत अनेकांनी साहित्य क्षेत्रात आपले लेखन प्रकाशित करुन, लोकार्पण केले आहे.स्वत: साहित्य निर्मितीचा आनंद घेऊन रसिकांना आनंदानुभव पुस्तकातून वाटण्याचा प्रयत्न निश्र्चितच कौतुकास्पद आहे. लिहित्या हातांना व्यक्त होण्यासाठी अॉनलाईन व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महनीय कार्य वाचन साखळी फेसबुक  महाराष्ट्र राज्याच्या संयोजिका आदरणीय प्रतिभाताई लोखंडे मॅडम व प्रतिभाताई टेमकर मॅडम यांनी केले आहे. पुस्तकांना जीवश्य कंठस्य मित्र समजणाऱ्या वाचनसंस्कृतीचे आपण सर्वजण ज्ञानाचे वारकरी आणि या समूह शृंखलेतील एकेक कडी आह...

पुस्तक परिचय क्रमांक-१०० वृध्दाश्रम

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य परिचय कर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे,  वाई पुस्तक परिचय क्रमांक- १०० पुस्तकाचे नांव--वृध्दाश्रम कवीचे नांव--सचीन तावरे प्रकाशक-अक्षरबंध प्रकाशन,नीरा ता.पुरंदर, जि.पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-मार्च २०१७ /प्रथमावृत्ती वाड़्मय प्रकार--कथासंग्रह पृष्ठे संख्या-११० मूल्य/किंमत--१२०₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚 १००||पुस्तक परिचय          वृध्दाश्रम           लेखक:सचीन तावरे 💫🍁💫🍁💫🔆💫🍁💫💫🍁🔆  वाचन साखळी फेसबुक समूह महाराष्ट्र राज्य संयोजिका आदरणीय प्रतिभाताई लोखंडे मॅडम व प्रतिभाताई टेमकर मॅडम यांच्या वतीने वाचनचळवळ रुजविण्यासाठी.'पुस्तक परिचय' हा अभिनव उपक्रम लिहित्या हातांसाठी व्यक्त व्हायला,स्वता:आनंदानुभूती घेऊन इतरांना ज्ञानाची शिदोरी द्यायला उपलब्ध करून दिला आहे…. माहे नोव्हेंबर २०२१मधे सर्वात जास्त पुस्तके पुस्तक परिचय केल्याबद्दलचे ,या बक्षीसाचे प्रायोजक माझे स्नेही शिक्षक मित्रवर्य श्री गणेश तांबे यांनी अनमोल भेट बक्षीस रुपाने पाठविले ,ते...

पुस्तक परिचय क्रमांक-९९ मी अन् माझा आवाज

Image
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य परिचय कर्ता-श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे,  वाई पुस्तक परिचय क्रमांक-९९ पुस्तकाचे नांव--मी अन् माझा आवाज कवीचे नांव--संदीप खरे प्रकाशक-रसिक आंतरभारती, पुणे प्रकाशन वर्ष व आवृत्ती-नोव्हेंबर २०१९ /पुनर्मुद्रण तिसरे वाड़्मय प्रकार--काव्यसंग्रह पृष्ठे संख्या-९६ मूल्य/किंमत--२००₹ 📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚📚 ९९||पुस्तक परिचय          मी अन् माझा आवाज           कवी:संदीप खरे  💫🍁💫🍁💫🔆💫🍁💫💫🍁🔆 'दमलेल्या बाबाची कहाणी' यासारखी अप्रतिम आणि वास्तवेचे दर्शन घडवून आणून रसिकांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय गाणी.रसिकांच्या हृदयसिंहासनवर अधिराज्य गाजविणारे संदीप खरे  हे प्रसिद्ध मराठीकवी व गायक आहेत. त्यांचे 'दिवस असे की','मी अन् माझा आवाज.'  आणि 'आयुष्यावर बोलू काही' हे गीतसंग्रह विशेष प्रसिद्ध आहेत.लोकप्रिय गायक सलील कुलकर्णींसोबत त्यांनी बरेच गीतसंग्रह(अल्बम) प्रकाशित केले आहेत.त्यांच्या सोबत गाण्यांच्या अनेक मैफिली संदीप खरे यांनी केल्या आहेत. व्या...