पुस्तक परिचय क्रमांक:२१८ शिवाज्ञा


वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२१८
पुस्तकाचे नांव-शिवाज्ञा एक जबाबदारी 
लेखक:कृष्णकांत गणपत देसाई 
प्रकाशन-मायमिरर पब्लिशिंग हाऊस, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती -द्वितीयावृत्ती २०२२
पृष्ठे संख्या–२४०
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य-२५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२१८||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव: शिवाज्ञा एक जबाबदारी 
लेखक: कृष्णकांत गणपत देसाई 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 
स्वप्न शहाजीराजांचे संकल्पना जिजाऊंची विचार छत्रपती शिवरायांचे शौर्य युवराज छत्रपती शंभूराजांचे आणि जबाबदारी मावळ्यांची….
 या ऊर्ज्वशील विचाराने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची महापराक्रमाची आणि राज्यकारभाराची गाथा व आजच्या वर्तमान परिस्थितीची आणि  स्वता:च्या आयुष्यातील घटना यांची सुंदर सांगड घालत शिवव्याख्याते तथा लेखक कृष्णकांत देसाई यांनी ‘शिवाज्ञा एक जबाबदारी’या मौलिक ग्रंथाचे लेखन केले आहे.
शिवजयंती घराघरात,शिवराय मनामनात 
 जगाच्या इतिहासातील पहिलेच उत्तुंग व्यक्तिमत्त्व असे आहे की ३५० वर्षे झाली तरी आजही लाखो मावळे मरण्यासाठी तयार आहेत.असे एकच राजे जिजाऊंचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज 
जगाच्या इतिहासात पहिलीच शिवशाही, ज्या काळात एकाही शेतकऱ्याने कधी आत्महत्या केली नाही.त्या शिवशाहीचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज 
आजही तमाम मराठी माणसांच्या हृदयसिंहासनावर विराजमान झालेले एकमेवाद्वितीय राजे….श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज.लहानांपासून थोरांपर्यंत आदराने ज्यांचे नाव घेतले जाते.नामघोषणा कानावर आली की मुखातून शब्द उमटतात…छत्रपती शिवाजी महाराज की जय… सह्याद्रीच्या कुशीतला कडेकपारीतला दुर्गकिल्ल्यांच्या 
परिसरात वावरणाऱ्या पत्येक मावळ्याच्या 
कणाकणात आणि मनामनात महाराजांचे स्थान अजरामर आहे..
त्याच दऱ्याखोऱ्यांत जन्म झालेल्या युवा शिवव्याख्याते कृष्णकांत देसाई यांनी शतकी लेखमालिकेत शिवरायांचे अलौकिक कार्याला एक विचारधारा समजून आजच्या युगात आपलं जगणं कसं असावं ते पटवून दिले आहे.आजही छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा कशी उपयुक्त ठरते.ते विविध उदाहरणे दाखले आणि छोट्या छोट्या गोष्टींतून समजून दिले आहे.
श्री संदीप पाटील सरांचे मनोगत या पुस्तकाची आशयघनता उलगडून दाखविते.यापुर्वी फेसबुक, व्हाॅटसअप आणि प्रतिलिपी या आभासी पटलावर लोकप्रिय आणि वाचकप्रिय झालेल्या लेखांचे संकलन ‘शिवाज्ञा एक जबाबदारी'या पुस्तकात केल्याचे ते आवर्जून नमूद करतात.छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व,त्यांचे आचार, विचार, कृती आणि स्वभाव वैशिष्ट्ये यांचा अभ्यास करून त्याचा सद्यपरिस्थितीशी संबंध जोडत परखडपणे आणि स्पष्टपणे विचार लेखक कृष्णकांत देसाई यांनी मांडले आहेत.विचारधारेचे शिवधनुष्य लीलया पेलले आहे. “महाराजांसारखं दिसण्यापेक्षा त्यांच्यासारखं असणं आणि वागणं महत्त्वाचं,”हे संस्कारक्षम विचार त्यांच्या सगळ्या लेखातून अधोरेखित होतात.
लेखक या शतकी लेखातून वाचकांशी छान संवाद साधतात.छत्रपती शिवाजी महाराजांच्या अलौकिक कार्याची महती लेखातून प्रकट केली आहे.स्वप्न, स्वराज्याचे डोहाळे,आबासाहेब चंद्रकोर मावळा, पणती वंशाची,इतिहासाची पाने चाळताना, व्यक्तिमत्त्व या लेखातील  शिवाजी महाराजांचे विशेषगुण, सौंदर्य, विवाह एक बंधन,चौरंग मशागत,कोंढाणा, रयतेची काळजी, खंजीर, खरे शिवभक्त, निर्णयक्षमता जडणघडण आदी लेख वाचनीय आणि वैचारिक मंथन करायला उद्युक्त करणारे आहेत.
समस्त शिवप्रेमी आणि तरुण वाचकांसाठी हे पुस्तक म्हणजे शिवविचारधारेची पर्वणी ठरेल असे पुस्तक आहे.
कोरोना काळात लॉकडाऊन असताना सगळं जग अस्वस्थ असताना ,त्यांनी मिळालेल्या संधीचं सोनं करत लेखांकन केले आहे.हीच सकारात्मक ऊर्जा लेखकाजवळ होती.वाणीप्रेमानेच लेखणीतून त्यांनी सुंदरशी अक्षरपेरणी करत शिवविचारधारेचे स्वतः आचरण करत,वाचकांना विचारधारेचे ममत्व आणि महत्व पटवून दिले आहे.
‘शिवाज्ञा एक विचारधारा’या लेखमालेस मानाचा मुजरा! छत्रपती शिवाजी महाराज की जय….!
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक: ९ मे २०२५



 




Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड