पुस्तक परिचय क्रमांक:२१६AI च्या बटव्यातून



वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२१६
पुस्तकाचे नांव-AI च्या बटव्यातून 
लेखक: डॉ अमेय पांगारकर, 
डॉ भूषण केळकर , माधवी नाडकर्णी 
प्रकाशन-रुद्र एंटरप्राइजेस , पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती -प्रथमावृत्ती २१एप्रिल २०२४
पृष्ठे संख्या–१४२
वाड़्मय प्रकार-ललित
किंमत /स्वागत मूल्य-२५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२१६||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव: AI च्या बटव्यातून
लेखक: डॉ अमेय पांगारकर, डॉ भूषण केळकर, माधवी नाडकर्णी 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 
    मोबाईल वापरु शकणाऱ्या प्रत्येकासाठी AI च्या बटव्यातून, रोजच्या वापरातील सहज सोपीAI टूल्स .बदलत्या तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगात टिकून राहण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना आणि उद्योजकांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे.बदलत्या तंत्रज्ञाची ओळख करून देणारे आकर्षक मुखपृष्ठ नजरेत भरते तर मलपृष्ठावर AI तंत्रज्ञानाची गरज उठावदार करणारे ब्लर्ब नालंदा विद्यापीठाचे उपकुलगुरू पद्मभूषण डॉ विजय भटकर,NAAC चे संचालक डॉ अनिल सहस्त्रबुद्धे आणि सुपरिचित लेखक तथा टेक्रोक्रॅट अच्युत गोडबोले यांचे आहेत.यावरुनच या पुस्तकाची आशयघनता लक्षात येते.अन् वाचायला उत्सुकता निर्माण होते.
  बालपणापासून कुतूहल निर्माण करणाऱ्या ‘मनास’हे पुस्तक अर्पण केले आहे.‘AI च्या बटव्यातून’या पुस्तकाला  पद्मभूषण डॉ विजय भटकर यांची प्रस्तावना लाभली आहे.व्यवसायाला भविष्यात सक्षम बनविण्यासाठी कोणती काळजी घ्यावी.याचे विश्लेषण या लेखातून जाणून घेता येते.विविध क्षेत्रात पसरलेल्या १७०हून अधिक टुल्सची माहिती दिली आहे.ही साधने आपणाला एक आयचा वापर करून गुणवत्ता वाढवण्यास सक्षम करण्याबरोबरच निर्णय घेण्याचा वेग वाढविण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल. ए.आय.विषयीची मौलिक माहिती देणारे हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे.
 लेखक डॉ अमेय पांगारकर मनोगतात व्यक्त होतात की, “दैनंदिन जीवनातील बहुतांश गोष्टी ए आयच्या मदतीने घडत आहेत.स्मार्ट उत्पादने सर्वदूर प्रचलित झाली आहेत.सगळीकडे अल्गोरिदम्सचे’ साम्राज्य पसरले आहे.अभूतपूर्व जगातील प्रगत होत असलेल्या ए आय प्रणित जादुई सफर या पुस्तकातून होणार आहे.”
अत्याधुनिक अशा व्हाईस सहाय्यक ते आपले संभाषणाची हेरगिरी करण्यापासून ते आपल्या प्रत्येक निवडीवर प्रभाव अधोरेखित करणाऱ्या प्रणालीपर्यंत चॅटबॉटस ते होम डिव्हाइसेस पर्यंतच्या ४५ क्षेत्रातील १७०हून अधिक टुल्सची ओळख आपण करून घेणार आहोत.
 या बटव्यात एकंदर ४९ लेखमालिका आहे.त्यातून आपण एक आय प्रणित टूल्स ची सोदाहरण, विवेचन आणि विश्लेषक पध्दतीने ओळख करून घेणार आहोत.
दररोज नवनव्या तंत्रज्ञानाची भर पडत आहे.फोर जी फाय जी आलेलं आहे. यातील जी म्हणजे ‘जनरेशन’आपण एक उदाहरण घेऊ.पहिला केवळ संपर्क साधण्यासाठी केवळ सेल फोन होता.तो टच स्क्रीन, अँड्राईड झाला आहे.संपर्क साधण्या बरोबरीने फोटो काढणे.संदेश पाठविणे.इमेल करणे. व्हिडीओ कॉल, टायपिंग ऐवजी व्हाईस टायपिंग अशी कितीतरी फिचर्स सध्याच्या मोबाईल मध्ये आहेत.त्याच बरोबर आपण व्हाईस चॅटिंग आपण करतोय. तसेच गुगलवर पाहिजे ते सर्च केलं की क्षणातच डेटा मदतीला धावून येतोय.ही सगळी किमया एक आय तंत्रज्ञानाची आहे.
AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ होय.यासाठी पारिभाषिक शब्दांची ओळख होणं महत्वाचं आहे.अल्फा न्यूमरिकल,डेटा सायन्स,अनस्ट्रक्चर्ड डेटा,पॅटर्न,न्यूरल नेटवर्क, रिनफोसमेंट लर्निग,अल्गोरिदम्स आणि क्लस्टरिंग आदी शब्दांची ओळख करून घेणं.
   AI समजून घेताना डेटाचे योग्य संकलन, पृथक्करण त्यातून मिळालेले महत्त्वाचे निष्कर्ष वापरणे हे मूळ उद्दिष्ट पूर्तीसाठी महत्त्वाच्या पायऱ्या वापरणं महत्त्वाचे आहे.माहिती मिळवणे,प्री प्रोसेस करणे, पृथक्करण करणे, फीचर्स शोधणे, मॉडेल निवडणे, उपलब्ध डेटावर ट्रेनिंग करणे. ट्रेनिंग  अचूक आहे का हे तपासणे, माहितीचे इंटरप्रिटेशन करणे आणि शेवटी मॉडेल बरोबर असेल तर त्याचे वर्गीकरण करून ते डिप्लॉय करणे.
चॅटजीपिटी सारख्या कृत्रिम प्रणालीने जगामध्ये माहिती देण्याचा उच्चांक गाठला आहे.बहुतांशी मोबाईल वापरकर्ते या अॅपचा वापर करतात. 
२०११पासून मानवाची प्रगती या आधीच्या शतकापेक्षा झपाट्याने वाढत आहे. दूरध्वनी वापरायला ७५वर्षे लागली. मोबाईल वापरायला १० वर्षे आणि नेटफ्लिक्सला ३.५वर्षे फेसबुकला १०ते १२ वर्षे तर लागली.तेच चॅटजीपिटीने काही दिवसांत सुसाट वेग घेतला आहे. भारतीय माणूस दिवसभरात सरासरी ७तास ४२मिनीटे मोबाईलवर घालवतो.
त्यामुळे ए.आयला तुमचा स्वभाव,वागणं, संवाद विसंवाद,तुमची आवड यांचा मतितार्थ माहीत झालेला आहे.
आजच्या काळातील चिराग म्हणजे प्रॉम्प्ट 
आपण सांगितले की तसंच झालं की भारी वाटतं. यापुर्वी माणसं स्मार्ट होती आता साधनं स्मार्ट झाली आहेत.स्मार्टफोन,एसी,घड्याळ टिव्ही.याचा स्विकार करायला हळूहळू सुरुवात झाली आहे.हे अनेक उदाहरणे दाखले देऊन स्पष्टिकरण केले आहे.कलाकृती सुध्दा कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करते.अन् त्या कलाकृतीचा लिलाव हजारो डॉलरची बोली लावून केला जातो.बोली लावणाऱ्यांना कळतही नाही की ही कलाकृती एआय तंत्राचा वापर करून तयार झाली आहे.
लोगो तयार करणे.सादरीकरण करणे. ब्लॉग लेखन, ग्राफिक्स डिझाईन बनविणे.फोटो एडिटिंग, पॉडकास्ट, वेबसाईट बनविणे, मार्केटिंग, नोकरी शोधणे, शेअर मार्केटिंग,ई-कॉमर्स,वाहणे, इंटिरिअर डिझायनिंग,अॅनिमेशन, निवडणुकीत प्रचार करणे आदी क्षेत्रात आता एआयची हुकमत चालतेय.
काळाच्या प्रवाहाबरोबर आपण आपल्या व्यवसायासाठी,सेवेसाठी आणि नोकरीसाठी बदलणं गरजेचं आहे.यासाठी एक आय तंत्रज्ञानाची माहिती घेणं आवश्यक आहे.तरच या माहितीच्या युगात आपला परफॉर्मन्स चांगला राहिल.अन्यथा
आपण कुठे याचं सिंहावलोकन करणं गरजेचं आहे.
अतिशय समर्पक शब्दात आणि सहज सुंदर सोप्या भाषेत, अवघड वाटणारा विषय डॉ अमेय पांगारकर, डॉ भूषण केळकर आणि माधवी नाडकर्णी यांनी समजून दिला आहे. 'एआयच्या बटव्यातून ' हे पुस्तक जसं ग्राणीण भागात घरातील एखाद्या शरीराविषयी काय आजार झाला तरं हमखास गुण येणारं झाडपाल्याची मात्रा आजी आपल्या बटव्यातून देत होती.तसचं एआय या प्रणालीने एखादं  टूल्स बनविण्यासाठी मार्गदर्शक ठरेल असे हे पुस्तक म्हणजे रसिक वाचकांना पर्वणीच ठरेल.अश्या पुस्तकाचे वाचन करून आपण कुठे आहोत?याची आय ओपन टेस्ट करणं महत्त्वाचं आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक -८ मे २०२५

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड