पुस्तक परिचय क्रमांक:२१७ करियरची गुणसूत्रे
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२१७
पुस्तकाचे नांव-करियरची गुणसूत्रे
लेखक:डॉ. भूषण केळकर , डॉ.मधुरा केळकर
प्रकाशन-न्यूफ्लेक्स टॅलेंट सोल्यूशन्स प्रा.लि., पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती -तृतीयावृत्ती १०मे २०२४
पृष्ठे संख्या–१६२
वाड़्मय प्रकार-ललित
किंमत /स्वागत मूल्य-२५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२१७||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव:करियरची गुणसूत्रे
लेखक: डॉ. भूषण केळकर, डॉ.मधुरा नाडकर्णी
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
CAREER ची गुणसूत्रे “Future -proof” करियर घडविण्यासाठी!
चॅटपॅट, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंडस्ट्री ४.०च्या काळात ८०%जॉब्स नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.नवीन करिअर्स निर्माण होणार आणि त्या नजीकच्या उद्याला आपण अजिबात तयार नाही.ती तयारी समजून घेण्यासाठी या पुस्तकाचा बहुआयामी उपयोग आपणाला होणार आहे.करिअर्स आवश्यक अशा ३००+ जास्त वेबसाईट्स -अॅप्स,१०+मनोरंजक व्हिडिओ क्यूआर कोडसह उपलब्ध आहेत.तसेच करिअर्सच्या प्रवासातील माईलस्टोन ठरतील अशा टिप्स उलगडणारे हे मराठीतील एकमेव पुस्तक आहे.
२२देशातील २१०००+पेक्षा विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या हितगुज आणि समुपदेशनाला हे पुस्तक समर्पित केले आहे.
लेखक डॉ.भूषण केळकर यांनी वय वर्षे १३ ते ७०पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून अनुभवाच्या जोरावर त्यांना यशस्वी केले.अशा यशोगाथांचे हे पुस्तक तयार झाले आहे.असे त्यांनी प्रस्तावनेत नमूद केले आहे.तर सहलेखिका डॉ.मधुरा केळकर यांनी मनातील इच्छेला आकार आणि भरारी घेण्यासाठी लागणारा आत्मविश्वास देण्यासाठी काय काय करावे लागते?याचे महत्त्व विषद केले आहे.त्या म्हणतात की, “आगामी काळात यशस्वी होण्यासाठी शिक्षणाच्या नेहमीच्या पदव्या घेताना तंत्रज्ञानावर आधारित इतर कोर्सेस ही करायचे आहेत.स्मार्ट पध्दतीने अभ्यास करत स्वतःला अपस्किल करायचे आहे.”
आपण जसे २३गुणसूत्रे घेऊन जन्माला आलो आहोत.ती २३गुणसूत्रे आपणाला जशी बुध्दीमत्ता आणि क्षमता ठरवून एक्स्प्रेस करतात.त्याच प्रमाणे तुम्हाला उत्तम करिअरसाठी बहुमूल्य २३ घटकांचे लेख दिलेले आहेत.
#नेमकं काय बदलतं आहे?
#Future -proof” करियरची निवड
#करियर डेव्हलपमेंट बाबत
#अभ्यासाचे पर्सनलायझेशन
#MOOCs(मूक्स): ऑनलाईन कोर्सेस
#डर के आगे जीत है!
#इंग्लिश आणि परकीय भाषा प्रभुत्व
#सृजनशीलता:
#लेकिन क्यु!
#संभाषणकौशल्ये
#स्मरणशक्ती
#अभ्यासाच्या २६पध्दती
#माइंडमॅप आणि फ्लॅशकार्डस्
#जनरल नॉलेज
#प्रकल्प/इंटर्नशिप/कार्यानुभव
#ऑलिंपियाडस्/हॅकॅथन्स/कॉम्पिटीशन्स्
#वेळाचा ताळमेळ
#माहिती शिष्यवृत्तींची
#पेटंट/पब्लिकेशन/इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी
#समाजमाध्यमे आणि तुमचा डिजिटल प्रेझेन्स!!
#समाजकार्र,कम्यूनिटी वर्क आणि सोशल क्वोशंट!!
#जॉब शोधताना+मिळवताना
#रुपये ९,९९९!!
सर्वच लेखांत उदाहरण दाखले देऊन त्या घटकांचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
यातील काही ठळकपणे नोंदवलेली निरीक्षणे.जी करिअरसाठी बहुमूल्य आहेत.करियर निवडण्याचे तीन महत्त्वाचे पैलू आहेत.१)जमणारे २)आवडणारे ३)व्यवहार्य
पहिल्या जमणाऱ्या करिअरमध्ये १)बौद्धिक व शारिरीक क्षमता २) चिकाटी महत्त्वाची असते.तर आवडणाऱ्या करिअरमध्ये आपल्या आवडीनिवडी तपासता येतात.तर तिसऱ्या व्यावहारिकतेत आर्थिक स्थैर्य आणि दीर्घकालीन मागणी हे दोन्ही अंग महत्त्वाची आहेत.आत्तापर्यंत शिक्षण ‘तीन आर’रिडिंग,रायटिंग आणि अरीथमेटिक यांच्याभोवती फिरत होते.तेच आता इंडस्ट्री ५.० च्या काळात ‘तीन आय’ला महत्त्व प्राप्त झाले आहे.ते तीन आय म्हणजे इंटरडिसिप्लिनरी,इंटर अॅक्टिव्ह आणि इंडिविज्युअलाइज्ड . ठराविक प्रकारचे काम न करता त्या अनुषंगाने आवश्यक असणारे वर्क आपणाला करता येणं आवश्यक आहे.
चले वाटते चलम चित्तम ततो वायू निरोधयेत् |
योगी स्थाणुत्वमाप्नोती ततो वायू निरोधयेत्|
हठयोगातील प्रदीपिकेनुसार हे अगदी नितळ सत्य आहे की,जसे श्वास तसे विचार.श्वास नियमित तर विचार सरळ आणि शांत.म्हणून श्वासांचे व्यायाम करणे आवश्यक आहे.श्वासांचे व्यायाम म्हणजे प्राणायाम.प्राणायाम आणि ध्यानधारणा केल्यास मन शांत एकाग्र होते.मन आणि शरीरातील एकरुपता वाढते.सृजनशीलता वाढते.बुध्दीची वाढ होते.मनशक्ती वाढते.Sound Mind in Sound Body
निरोगी शरीरात निरोगी मन असते.हे लेखकाने अनेक विद्यार्थ्यांची उदाहरणे दाखले देऊन स्पष्टिकरण केले आहे.तर आवश्यक तिथे आकृतीबंध,आलेख देऊन सोबतीला खात्री पटण्यासाठी क्युआर कोड दिलेले आहेत.
योग प्राणायाम ध्यानधारणा याशिवाय आपल्या आवडत्या कला किंवा छंदाची जोपासना आपणाला ताण घालवण्यासाठी मदतच करतात.ताण जाऊन आपले मन ताजेतवाने आणि प्रसन्न वाटते.
तसेच आपण एखादीतरी परकिय भाषा शिकणं महत्त्वाचे आहे.आपल्या संभाषण कौशल्याचे विश्लेषण तर फारच अप्रतिम केले आहे. डॉ.मेहराबियनच्या संशोधनानुसार संदेश समजण्यासाठी बोलणाऱ्याचे शब्द हे ७% महत्वाचे,कसे बोलतोय हे ३७% महत्त्वाचे आणि बोलतानाची शारीरिक भाषा ही ५५%
महत्त्वाची असते.म्हणजे ९३% संदेशवहन हे नॉन-व्हर्बल होतं.तसेच कोणत्या शब्दावर जोर दिलाय, आवाज कसा आहे? बोलण्याची पद्धत,पॉज कसा घेतला आहे? या सगळ्या नुसार एकाच शब्दाचा अर्थ पूर्णपणे वेगळा होऊ शकतो... अतिशय सविस्तरपणे माहिती दिली आहे.
२०१५ साली दहाव्या क्रमांकावर असणारी सृजनशीलता २०२०मध्ये तिसऱ्या क्रमांकावर होती.तीच आता २०२५मध्ये पाचव्या स्थानावर आहे.म्हणजे तुम्ही घेतलेल्या विषयावर आधारित असं काहीतरी नवीन निर्माण केलं पाहिजे. तरच तुमचा नोकरी मिळवून करियर घडविण्यासाठी फायदा होईल.
समारोपाच्या लेखात सरशेवटी अतिशय मार्मिक विचार दिला आहे. मित्र मैत्रिणींनो, तुम्हाला तुमचा हातोडा कुठेही मिळेल. शाळा, कॉलेज, विद्यापीठ आणि अन्य पुस्तकात सुध्दा! परंतु हातोडा 'कुठे' मारायचा याचं इंगित मात्र या पुस्तकातून नक्कीच मिळेल, असं अभिवचन दिले आहे..
अतिशय हसतखेळत सहज सुंदर सोप्या भाषेत करिअरच्या २३ गूणसुत्रांची लेखमाला उदाहरणे व दाखले, क्यूआर कोड आणि वर्गीकरण तक्ते देऊन केली आहे.त्याबद्दृ लेखक डॉ भूषण केळकर आणि सहलेखिका डॉ मधुरा केळकर यांच्या लेखणीला आणि संशोधनात्मक अभ्यासाला सलाम!
परिचयक:श्री रविंद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- ११ मे २०२५
Comments
Post a Comment