पुस्तक परिचय क्रमांक:२१४ मेंदूची मशागत
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२१४
पुस्तकाचे नांव-मेंदूची मशागत
लेखक:देवा झिंजाड
प्रकाशन- न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-१८डिसेंबर २०२४
प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–२१२
वाड़्मय प्रकार-ललित
किंमत /स्वागत मूल्य-३००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२१४||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव:मेंदूची मशागत
लेखक: देवा झिंजाड
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
ज्यांच्या लेखणीतून कष्टाचा आवाज निढळाच्या घामासारखा उमटतो. लेखातून कष्टकरी,श्रमजीवी लोकांचं जीणं दिसतं. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि शिक्षणासाठी जे निढळाच्या घामाने ओलंचिंब झालेले जे दिवस मायलेकांनी अनुभवले. तसेच लेखकाने सामाजिक ज्वलंत प्रश्नांवर पोटतिडकीने भाष्य करत प्रेरक हितोपदेश केला आहे.ते मेंदूला वैचारिक खाद्य देणारे पुस्तक ‘मेंदूची मशागत’.
अनुभवसिद्ध आणि कृतीयुक्त शिदोरीचे लेख घामाच्या शाईने, भाषण स्पर्धेतील बक्षिसं म्हणून मिळालेल्या फाऊंटन पेनने आणि निवडणूक काळात वाटायला दिलेल्या हॅण्डबीलाच्या मागच्या बाजूवर उमटवले आहेत.असंच मला पुस्तकाचा आस्वाद घेताना दिसून येते.याती सर्वं लेखांना कष्टाचा आवाज आहे.
गरिबीची भोकं मुजवण्यासाठी श्रीमंत जमीनदारांची अर्धलीने केलेल्या शेतीत बालपणी सुट्टीच्या दिवशी काम करायला जाणारे लेखक देवा झिंजाड यांचे तिसरे अक्षर साहित्य ‘मेंदूची मशागत’
साहित्य क्षेत्राचा आढावा घेता असं लक्षात येते की माणसाचे शरीर,आहार,विहार, व्यायाम,सौंदर्य, व्यक्तिमत्त्व विकास, सकारात्मक विचार आदी विषयांवर परदेशी व अनुवाद केलेल्या साहित्याची रेलचेल दिसून येते.त्यांचा खप भरपूर आहे.परंतू या सर्वांच्या केंद्रस्थानी असणाऱ्या मेंदूचा खूराक कोणता आहे? यावर चिंतन आणि मनन करून अल्पावधीतच सामान्य रसिक वाचकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘एक भाकर तीन चुली’या कादंबरीचे लेखक देवा झिंजाड
यांच्या सामान्य माणसाच्या मनातील भाषेत आणि वास्तव आशयात लेखणीबध्द केलेलं साहित्य वाचलं की ज्यांनी बालपण ते शाळकरी वयातील काळजाच्या कप्प्यात जतन करून ठेवलेल्या आठवणींचा बांध फुटतो.आणि सुखदुःखाच्या अश्रूंना मोकळी वाट मिळते.
मनात साठून राहिलेल्या आठवणी जाग्या होतात. अन् मग ते हितगुज लेखकाशी संपर्क साधून केलं जातं.यावरुनच् त्यांच्या लेखाचा दर्जेदारपणा उठावदारपणे नजरेत भरतो.
त्यांच्या लेखणीचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या मातेने अन् त्यांनी भोगलेलं, सोसलेलं, अनुभवलेलं जीणं आणि सद्यस्थितीत नेमकं काय केलं पाहिजे?याचा संदेश वाचकाला त्यांच्या लेखनात मिळतोय. माणसांच्या मेंदूची मशागत घटना, प्रसंगी आलेल्या अनुभवातून सामान्य माणसाच्या भाषेत लिहिलेले लेख.जे यापूर्वी दैनिक सकाळच्या अॅग्रोवन पुरवणीमध्ये यापूर्वी प्रसिद्ध झालेले आहेत. बालपण ते तरुणपणात जवळून पाहिलेल्या सामाजिक ज्वलंत समस्या आणि प्रश्नांवर फालतू स्तोम माजवणाऱ्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे.त्यावर वैचारिक मंथन करायला लावणारेसर्वच लेख आहेत.
त्यांच्या साहित्याने लोकप्रियतेचा कळस गाठला आहे.कारणं त्यांचं लेखनच या हृदयाचे त्या हृदयाशी घट्ट झाल्याने त्यांना जवळजवळ पन्नासएक राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. याची ओळख परिशिष्टात दिलेली आहे.
‘रावण राजा राक्षसांचा’ आणि ‘ द आंत्रप्रेन्युअर’ या लोकप्रिय साहित्याचे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले लेखक शरद तांदळे यांनी ‘मेंदूची मशागत’या वैचारिक पुस्तकास सकस अशी प्रस्तावना दिली आहे. वाचनसंस्कृतीचं महत्त्व ते वारंवार ठळक करतात कारण लेखक बालपणी भेळ बांधलेलं कागदही वाचून काढत होते.वाचनाचे बाळकडू त्यांना वडिलांकडून मिळाले. ते म्हणतात की, “वाचन केल्याने फक्त माहिती मिळत नाही तर आपल्या मनाची आणि मेंदूचीही मशागत होते.”
शेतातली कामं करताना जशी भलरी गाऊन कामाचं हुरुप वाढवलं जातं.तसं शेतीमातीतल्या लेखकाने ‘मशागतीची भलरी’या मनोगतातून या पुस्तकाबद्दल कल्पना मांडली आहे.त्यांचे मातृत्वाचा पाझर आपणाला ‘एक भाकर तीन चुली'या कादंबरीतून व्यक्त होतो.तसेच इथेही बऱ्याच लेखातून मातृप्रेम दिसून येते.कारण त्यांच्या जडणघडणीत आईचं मोठी हक्कदार आहे.हे पुस्तक म्हणजे मायलेकाच्या पुर्वीच्या कष्टमय श्रमसाधनेची अनुभवसिध्दता आहे. “जीवनाच्या वाटेवर पावलोपावली उपयोगी पडेल”, असं दीपस्तंभासारखे पुस्तक आहे .अशी त्यांची इच्छा आहे.पुढे ते नमूद करतात की, “वाचन,चिंतन,कृती, अनुकरण यातून मेंदूची मशागत व्हावी हाच खरा उद्देश आहे.’’
यातील बरेच लेख नव्वदीच्या दशकातील सामान्य माणसाच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेचे ज्वलंत दर्शन घडवितात.आपण काही प्रसंगी भावस्पर्शी होते.अंतकरणात यातना होतात.अन् डोळ्यासमोर आपला भूतकाळ उभारतो.
पापण्यांच्या कडा ओलसर होतात.इतकं वास्तव रेखाटन त्यांनी केले आहे.
कठीण प्रसंगी सामोरे कसं जायचं हे त्यांच्या आईनेच छोट्या छोट्या गोष्टींतून समजून दिले आहे.
सामाजिक परिस्थितीवर आणि ध्येयवेडी समाजसेवा करणाऱ्या व्यक्तिमत्वांची शब्दचित्रे वाचताना आपण भावस्पर्शी होतो.या पुस्तकात सत्तेचाळीस लेखांची मालिका आपल्या मेंदूला सर्वसमावेशक वैचारिक खाद्य पुरवते.अतिशय सहज सोप्या भाषेत त्यांनी आशयाशी निगडीत लेख गुंफले आहेत.केवळ वाचून न काढता त्यावर कृतीयुक्त अनूभती घ्यावी असेही लेखकाने सुचविले आहे.हे सगळ्यात महत्वाचे आहे.स्वत:चार दिनक्रमही दिला आहे.खरेच आपल्या मेंदूची मशागत करण्यासाठी देवा झिंजाड यांनी नक्षत्रासारखी अक्षरबीजांची पेरणी केली आहे. खूपच वैचारिक मंथन करायला उद्युक्त करणारे लेख आहेत.सर्वांनी पुस्तक वाचावे असे माझं मत आहे.अप्रतिम साहित्य.आपल्या लेखणीला आणि निरीक्षणशक्तीला लाखो सलाम!
परिचयक :श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक-२५ एप्रिल २०२६
Comments
Post a Comment