पुस्तक परिचय क्रमांक:१७० आंत्रप्रेन्युअर
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१७०
पुस्तकाचे नांव-द आंत्रप्रेन्युअर
लेखकाचे नांव- शरद तांदळे
प्रकाशन-न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती
पृष्ठे संख्या–१८४
वाड़्मय प्रकार-आत्मचरित्र
किंमत /स्वागत मूल्य--३००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१७०||पुस्तक परिचय
द आंत्रप्रेन्युअर
लेखक:शरद तांदळे
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
पाहिलेलं स्वप्न साकार करण्यासाठी कोणत्या अग्निदिव्यातून जावे लागते.याचे वास्तव लेखन एका जिद्दी ध्येयवादी तरुण उद्योजकाने ‘आंत्रप्रेन्युअर’ या उद्योगगाथेत केलं आहे. शिक्षण,स्पर्धा परीक्षा, नोकरी, व्यवसाय यापरिघातून फिरताना आलेल्या, घडलेल्या, अनुभवलेल्या सुखदुःखाच्या प्रसंगाची गुंफण या स्टोरीचा नायक तथा ‘रावण-राजा राक्षसांचा’या पुस्तकाचे लेखक शरद तांदळे यांनी केली आहे. पुस्तकाचे नाव जरी इंग्रजी असले तरी त्यातील लेखन मराठीतच आहे.पुस्तकाचे नाव हे लेखकांना परदेशात यशस्वी उद्योजकाचा पुरस्कार मिळालेला आहे.त्या पुरस्काराचे नाव ‘द आंत्रप्रेन्युअर’
विशेषत: व्यवसाय करताना आलेले अनुभव त्यांनी शब्दबध्द केले आहेत.ते ही जसेच्या तसे. त्यामुळे सहजसुंदर शैलीतले लेखन वाचताना आपण तन्मयतेने एकरुपतेने वाचतच राहतो.वास्तव अनुभव सकारात्मक आणि नकारात्मक सुध्दा मांडलेले असल्याने यशाचे रहस्य उलगडत जाते.
त्यांना सन २०१३साली ‘यंग आंत्रप्रेन्युअर अवॉर्ड २०१३’हा जागतिक दर्जाचा पुरस्कार ,प्रिन्स चार्ल्स यांनी, सेंट जेम्स पॅलेस लंडनमध्ये प्रदान केला.तो अतिशय महत भाग्याचा क्षण, त्यांनी मलपृष्ठावर रंगीत छायाचित्रात प्रसिद्ध केला आहे.तर मुखपृष्ठावर अंतरंगातील माईलस्टोन जीवनाला कलाटणी देणारे, आकार उकार अन् मकार देणारे घटक इंग्रजी शब्दांत रेखाटले आहेत.आकर्षक अन् आशयगर्भता लक्षात येणारं मुखपृष्ठ. भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम ज्यांनी देशातल्या लाखो तरुणांना उंची स्वने पाहायला शिकवले.आणि कृतीतून जगण्याची कला शिकविणारे लेखकाचे पिताजी तथा प्राचार्य उत्तमराव तांदळे यांच्या स्मृतींना हे अक्षर साहित्य अर्पण केले आहे.
त्यांना व्यवसाय उभारणी करताना आलेले अनुभवांची शिदोरी एकत्र केली.तर अनेक नवउद्योजकांना ती उपयोगी पडेल.मदत होईल.असे सुतोवाच अनेक मित्रांनी केल्याने.त्यांनी वास्तव अनुभव रेखाटले.अनेकांच्या सहकार्याचा नामोल्लेख त्यांनी प्रस्तावनेत केला आहे.स्वस्वप्नांना वास्तवाशी जोडून, स्वतःच्या क्षमता आणि मर्यादा ओळखून स्वतःला घडवणं म्हणजेच यशस्वी आयुष्याचे गमक शरद तांदळे यांनी तरुणांना या प्रेरणादायी पुस्तकात गुरुमंत्र दिला आहे.
या पुस्तकात बारा लेख विचारांचे सौंदर्य अधोरेखित करणारे आहेत.मी असा वागलो.मला असं वाटतं होतं मला सहज मिळेल.पण प्रत्यक्ष प्रथमदर्शनी यशाला कवेत घेता आले नाही.पण निराश न होता काय काय केले.याचे विवेचन या पुस्तकात आहे.नव उद्योजकांना प्रेरणादायी पुस्तक आहे.लेखांची नामावली इंग्रजीत असली तरी लेख सगळे मायभाषेतच आहेत.
हे उद्योजक होण्यासाठी प्रेरणादायी साहित्य आहे.यात रॅटरेस,मेंटर,जॉब,स्ट्रगल,इन्स्पिरेशन, आंत्रप्रेन्युअर,अॅस्पिरेशन,वर्कलोड,बॉस,व्हिजन आणि पॅशन अश्या बारा लेखात उद्योग व्यवसाय उभारताना भोगलेल्या यातना, केलेलं कष्ट अन् चिंतन मंथन आत्मविश्वास याचे रेखाटन केले आहे.सकारात्मक चर्चा घडविणारं पुस्तक आहे. खरंतर मोठं यश मिळविण्यासाठी विचारांची औकात वाढवली पाहिजे.तसेच प्रबळ इच्छाशक्तीबरोबरच प्रबळ ईर्ष्याही पाहिजे.व्हिजन पाहिजे.अन् ते उघड्या डोळ्यांनी तयार केले पाहिजे.आपल्याकडे व्यवसायाचा वारसा असण्यापेक्षा आरसा असला पाहिजे.अन् मेहनतीने कामं केलं पाहिजे.कामावर विश्वास,निष्ठा पाहिजे. अपयश पचविण्याची ताकद पाहिजे.अन् चांगले सकस साहित्याचे वाचन केले पाहिजे.बाजारात आपले क्रेडिट निर्माण झाले पाहिजे.लेखक शरद तांदळे विद्यार्थी दशेतून कॉन्ट्रॅक्टर कसे होत गेले याची कहाणी म्हणजे आंत्रप्रेन्युअर.
तरुणांनी या पुस्तकाचे रसग्रहण केले पाहिजे.
अप्रतिम शब्दांकन!एक चिरकाल स्मरणात राहील असे साहित्य आहे.अनुभवांच्या शिदोरीवर रेखाटलेले आहे.
श्री रविंद्रकुमार लटिंगे वाई सातारा
प्रेरणादायी पुस्तक परिचय
ReplyDeleteधन्यवाद मित्रहो
ReplyDelete