पुस्तक परिचय क्रमांक:१६३ नात्यांचे सर्व्हिसिंग
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१६३
पुस्तकाचे नांव-नात्यांचे सर्व्हिसिंग
लेखकाचे नांव- विश्वास जयदेव ठाकूर
प्रकाशन -शब्दमल्हार प्रकाशन, नाशिक
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- फेब्रुवारी २०२१
पाचवी आवृत्ती
पृष्ठे संख्या–१५४
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह
किंमत /स्वागत मूल्य--९९₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१६३||पुस्तक परिचय
नात्यांचे सर्व्हिसिंग
लेखक: विश्वास जयदेव ठाकूर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
📚
स्वभावाचे आणि वर्तनाचे अनेक नमुने आपणाला अवतीभोवती बघायला मिळतात. एखाद्यावर स्नेहाच्या नात्याने आपण जीवापाड प्रेम करतो. निसंकोचपणे त्याच्या संकट काळी संवेदनशील मनाने. आपण सर्वतोपरी सहकार्य करतो.पण तीच चेहऱ्यावर मुखवटे घालून वावरणारी माणसं आपणाला पत्रकं समजून कृतघ्न होतात.याची सल मनात घेऊन लेखकाने वास्तव जीवनातील घडलेल्या घटना कथेतून व्यक्त केल्या आहेत.तो कथासंग्रह म्हणजे “नात्यांचे सर्व्हिसिंग’’.
लेखक तथा बॅंकेचे संस्थापक चेअरमन श्री. विश्वास ठाकूर यांनी आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्ष व बॅकेचे रौप्य महोत्सवी वर्ष कथासंग्रह लिहून साजरा केले आहे.
समाजात फायद्यासाठीच माणसं जवळ येतात. अन् संधीसाधू बनतात अशा लोकांचा बुरखा पाडण्याचे काम या कथांमधून दिसून येते.अतिशय सहज सुंदर आपलेपणाचा शब्दात त्यांनी कथा शब्दबध्द केल्या आहेत. सर्वसामान्य कष्टकरी लोकांना मदतीचा कर्जरुपी हात देऊन त्यांच्या जगण्याला अधिष्ठान देण्याचं महत्त्वाचे काम लेखक तथा बॅकेचे अध्यक्ष सन्माननीय विश्वास जयदेव ठाकूर यांनी केले आहे.मानवतावादी समाजात सचोटीने व्यवहार करण्याचा विश्वास त्यांच्या कथांमधून ओतप्रोत भरलेला आहे.अनेक नामवंत मान्यवरांनी त्यांच्या कथांचे कौतुक अभिप्रायातून केलेले आहे.
माणसांकडे पाहताना आपली दृष्टी कशी असावी याचेही सूचन हे पुस्तक करते.बॅकिंग क्षेत्रातील व्यक्तींने शेअर्सच्या भांडवलावर सर्वसामान्य रसिक भागधारकांना अनुभव कथांचा लाभांश देऊन मंत्रमुग्ध केले आहे.तर सर्वंच नात्यांचं सर्व्हिसिंग करणं का? जरुरीचं आहे याचं कथांमधून वैचारिक मंथन केले आहे.
“नात्यांचे सर्व्हिसिंग”या पुस्तकात पंचवीस कथांचे अनुभव कथन अनोख्या स्वरूपात लेखक श्री विश्वास जयदेव ठाकूर यांनी केले आहे.मोकळ्या आकाशात उडण्यासाठी पंखांना बळ देणाऱ्या तीर्थ स्वरुप पिता तथा दादा आणि जमिनीवर घट्ट पाय रोवून ठेवण्याच्या सक्तीची शिकवण देणारी माता या उभयतांना हे पुस्तक अर्पण केले आहे.तसेच लेखकांना समृद्ध करणाऱ्या खऱ्याखुऱ्या व्यक्तींनाही हे पुस्तक अर्पण केले आहे.
आपल्या नावातला ‘विश्वास’कामातून व्यक्त व्हावा.यासाठी अखंड कार्यरत असणारा माणूस. माणसं आणि पुस्तकं असं दुहेरी वाचन करणारा साहित्यप्रेमी.आव्हान आणि आवाहन यांची जागा ओळखून संस्थांना आणि स्नेही जणांना संवेदनशील मनाने आर्थिक मदत करणारा मदतगार.अनेकांचा आधार होवून पुण्य हाच आपला बॅक बॅलन्स मानणारा आगळावेगळा ठाकूर “विश्वास ठाकूर.”
जेष्ठ साहित्यिक आदरणीय मधू मंगेश कर्णिक यांनी ‘शुभास्ते पंथानं:’या लेखात आशिर्वादपर प्रसाद दिला आहे.अतिशय समर्पक शब्दात त्यांनी नात्यांचे सर्व्हिसिंग करणं का जरुरीचं आहे.याचा उहापोह केला आहे.सुंदर अन् सुरेख प्रस्तावना वाचण्याचे समाधान लाभतं. मग कथा वाचण्यासाठी उत्सुकता निर्माण होणारच!तसेच जेष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांचाही ‘ब्लर्ब’ पुस्तक वाचण्याची लालसा निर्माण करतोच.
विश्वास सहकारी बँकेच्या रजत महोत्सवी
वर्षाचे सेलिब्रेशन वास्तव जीवनात घडलेल्या घटनांचे दर्शन पंचवीस कथांमधून उलगडून दाखवले आहे. लेखकाच्या गोतावळ्यातील मित्रांना दिलेला सहकार्याचा हात पुढे बाय बाय कसा करतो याची प्रचिती या गोष्टींतून येते. त्यामुळे या कथा वाचताना आप्पलपोटी स्वार्थाने नातेसंबंधांला कशी तिलांजली दिली जाते हे नकळत उमगतं.मग ते नातं मित्रत्वाचे असू द्या नाहीतर रक्ताचे….
अनेक मान्यवरांनी त्यांच्या पुस्तकाचे कौतुक करुन अभिप्रायाची मुद्रा उठविली आहे.बॅकेचे व्यवहार आणि नाती यांची सुंदर उकल या कथांमधून दिसून येते.माणसामाणसाचं नातं म्हणजे नातेसंबंधाची गुंफण करणारा कुशल वीणकाम.सुगरणीच्या घरट्यासारखं.ती वीण चिंतनशीलतेने लेखक विश्वास ठाकूर यांनी केली आहे.अर्थव्यवहार आणि सहकार क्षेत्रातील उलाढालींचा परिचय करताना पैशापेक्षा माणूस महत्वाचा आहे. माणूसकीचं नातं अधोरेखित केले आहे.
प्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूर म्हणतात की,”जणू काही एखादा आपला मित्र जवळ बसवून मनातील गोष्टी सांगतोय; त्या गोष्टी मनाला भिडतायत.याची प्रचिती पानोपानी जाणवतं असं लिखाण केले आहे.अतिशय सुंदर पुस्तक आहे.आपण वाचा आणि विचारांचे सौंदर्य जपा….
परिचयक:श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे वाई सातारा
Comments
Post a Comment