पुस्तक परिचय क्रमांक:१६७ माणसं अशीही






वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१६७
पुस्तकाचे नांव-माणसं अशीही 
लेखकाचे नांव- महादेव मोरे 
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे 
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- प्रथमावृत्ती  २०१३
पृष्ठे संख्या–२७२
वाड़्मय प्रकार-कथासंग्रह 
किंमत /स्वागत मूल्य--१५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१६७||पुस्तक परिचय 
            माणसं अशीही 
         लेखक: महादेव मोरे 
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
  प्रतिभावान लेखक महादेव मोरे यांची साहित्य संपदा विपुल आहे. त्यांची ३८पुस्तके प्रकाशित आहेत. त्यातील मत्तीर,हेडाम, झोंबड, चिताक, चेहऱ्यावरचे चेहरे अशी अनेक पुस्तकं गाजली. त्यातील चिताक,झोंबड आणि चेहऱ्यामागचे चेहरे या पुस्तकांना सर्वोत्तम ग्रामीण साहित्य पुरस्कार प्रदान केला आहे.
 नुकतेच ऑगस्ट २०२४मध्ये त्यांचे निधन झाले.  त्यांच्या लेखणीस विनम्र अभिवादन करून आपणास “माणसं अशीही”या पुस्तकाचा परिचय करून देत आहे..
 महादेव मोरे म्हणजे प्रथितयश लेखक.ग्रामीण साहित्यातले एक महत्त्वपूर्ण साहित्यिक म्हणून त्यांचा उल्लेख होतो.महाराष्ट्र शासनाचा मराठी वाङमयनिर्मितीचा पुरस्कार दोनदा मिळविणारे ग्रामीण साहित्यातील एक सोनेरी पर्व. 
   गावकुसाच्या परीघाबाहेरील तळागाळातील कष्टकरी लोकांचे सुक्ष्मपणे निरीक्षण करून त्यांचे 
वास्तव जीवनगाणे शब्दबध्द करून; प्रवाही लेखणीतून व्यक्तिचित्र रेखाटणारे कलम बहाद्दर महादेव मोरे.आयुष्यभर पिठाची गिरणीत दळण दळून देत त्यांनी अत्यंत सकस, कसदार लेखन केलं.कर्नाटकातल्या निपाणीसारख्या प्रदेशात राहून त्यांनी ग्रामीण मराठी साहित्याचा ठसा उमटविला आहे. सीमावर्ती भागातील(निपाणी-बेळगाव) बोलीभाषेतील माणसाच्या चित्तरकथा“माणसं अशीही”व्यक्तिचित्रण कथासंग्रहात साध्या सोप्या रसाळ अक्षरदौलतीने पिठाच्या रंगावलीने रेखाटलेल्या आहेत.त्यांना भेटणारी माणसं ही विविध जाती- जमातींची आहेत.ती गरीब भोळी भाबडी आहेत,तशीच इरसालही आहेत; परिस्थितीने गांजलेली ,पिचलेली, निराश झालेली आहेत, तशीच स्वप्नं पाहणारी, आशेच्या एका तंतूमागे धावणारीही आहेत.मुख्य गावाच्या वेशीबाहेरील ही माणसं कधी हसवतात,तर कधी रडवतात तर कधी अचंबित करतात.मनात करुणभाव उत्पन्न करतात;तर कधी जीवनाबद्दलची अनोखी अंतर्दृष्टी देऊन जातात.
 ही व्यक्तीचित्रे यापूर्वी अनेकदा विविध दैनिकातून 
रविवारच्या पुरवणीत प्रसिध्दी मिळाली आहेत. खर तरं जेष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगूळकरांच्या ‘माणदेशी माणसे’ नंतर शब्दचित्रांची खंडित परंपरा साठीच्या दशकात महादेव मोरे यांनी यशस्वीपणे चालू केली आहे.’’अशी गौरवाची शाबासकी श्री.रंगराव बापूंनी दिली आहे.
मनोगतात आदरणीय जेष्ठ लेखक श्री महादेव मोरे म्हणतात की, “साप्ताहिक पुरवणीत शब्दमर्यादेत लिहिलेल्या व्यक्तीचित्रांना मान्यवर साहित्यिकांडून व वाचकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला.हे माझे अहो भाग्य आहे.’’
 सव्वीस व्यक्तीचित्रे ‘माणसं अशीही’ या ललित संग्रहात लेखक आपल्याशी संवाद साधतात.त्यांचे अंतरंग उलगडून दाखवले आहे.त्यांचे जीवनगाणे उमगते.
   साधारणपणे पन्नास व्यक्तिचित्रे या पुस्तकात समाविष्ट आहेत.जणूकाही आपल्या गावातीलच माणसंच भेटतात असं वाटतं.इतक वास्तव ताकदीने लेखन महादेव मोरे यांनी केले आहे.मग एखाद्या हॉटेलमध्ये काम करणारा भट्टीवाला स्वामी असो,की गावचा रेशन दुकानदार- ‘हे असंच चालायचं’ ही कथा.तर साहित्यिक जीए कुलकर्णी यांच्या गावच्या ‘गुग्गुळ’ची कथा एक छान देवदर्शन घडवतं;त्यातील वाद्ये वाजवणाऱ्या वाजापचे व्यक्तिचित्र वाचायला उद्युक्त करते.साहित्यिक जी. ए. यांच्या गावाची महती या लेखातून समजते.
वानगीदाखल काही कथांचा आशय वरील शब्दचित्रांतून समजतो.अतिशय सुंदर शब्दात गावातील माणसांची व्यक्तिचित्रे रेखाटली आहेत.

परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड