Posts

छायाचित्र चारोळी नभांगण

Image
गोफ विणला नभांगणी काळ्या पांढऱ्या आभाळी माथ्यावरुनी ढगांची सवारी कापूस पिंजत पुढं निघाली

काव्य पुष्प- २४३ धबधबा

Image
           धबधबे कड्यातून धबधबे वाहती दुधाळ जलधारा कोसळती दुग्धाभिषेक कातळाला करती तेव्हा दुधाळ फवारे उडती|| जलधारा उसळती कड्यावरी साखरनळ्या नजरेत भरी सृष्टी नटली रुपात भरजरी जलप्रपाताचे कोंदण भारी || कोसळती उंच कड्यातून  सफेद दुधाळ जलधारा| धबधबे घालती लोटांगण  अन् तुषार उसळवी वारा| उसळत्या जलधारा कड्याखाली  शुभ्र फवारे वाऱ्या संग उंडारी   गतीने उतरती पायथ्याखाली  जलप्रपाताचे सौंदर्य दिसे भारी || पानापानातून थेंब झरती वसुंधरेला चिंब भिजविती डोंगरमाथी प्रवाह ओघळती  कड्यातून खाली कोसळती||

स्वातंत्र्यदिनाचा विजय असो...

Image
स्वातंत्र्य संग्रामातील वीरांना प्रणाम करतो. बलिदानाचा रंग मी तिरंग्यात पाहतो . पराक्रमाचा जयघोष कानात गुंजतो . वंदे मातरम् म्हणताना ऊर अभिमानाने फुलतो...

अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिन

Image
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्धापनदिन महिला बचत गट कोंढावळे यांच्या वतीने केक कापून ,खाऊ वाटप करुन साजरा करण्यात आला. यावेळी सुनील जाधव सरांनी तिरंगा ध्वज गीत सादर केले. मुख्याध्यापक रविंद्र लटिंगे सरांनी स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व सांगितले.यावेळी सरपंच धोंडिबा कोंढाळकर, माजी सरपंच आनंदा कोंढाळकर, मधूकर कोंढाळकर , कोंडिबा कोंढाळकर, रोहिदास कोंढाळकर, बचत गट अध्यक्ष व सचिव,शिक्षक  आणि महिला उपस्थित होत्या

छायाचित्र चारोळी स्ट्रॉबेरी

Image
रसरशीत लालचुटुक स्ट्रॉबेरी गिरीस्थानची प्रसिद्ध बेरी | हिरव्या पानांत शोभतेय भारी  पर्यटकांची आवडती बेरी ! रसरशीत लालचुटुक स्ट्रॉबेरी गिरीस्थानची प्रसिद्ध बेरी  हिरव्या पानांत शोभतेय भारी  पर्यटकांची आवडती बेरी!

पुस्तक प्रकाशन सोहळा आभार

Image
भावकाव्यांनी सजली, नवी कोरी 'हिरवी पाती'...*  *कृष्णा तीरावरी जपली, निसर्गप्रेमींची ही नाती...* *'पाऊले चालती' बहू, प्रवास वर्णनांच्या सांगाती...* *सारस्वत घडविती थोर, महाराष्ट्र भूमीची  माती...*                                   रचना-श्री श्रीगणेश शेंडे हिरव्या पातीच्या सहवासात सोनियांची पावले चालती रवींद्र सरांच्या लेखनीतून सरस्वती बोलती....                                                  रचना-कवनप्रित  माझ्या जीवनातील मंगलमय दिन .......  सोनजाई डोंगर पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात 'हिरवी पाती' काव्यसंग्रह आणि 'पाऊले चालती' प्रवासवर्णन या द्विज अक्षरशिल्पांचे  मातापिता आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रकाशन संपन्न झाले.हा अविस्मरणीय क्षण साजरा करण्यासाठी झटलेल्या ज्ञात -अज्ञात आनंदयात्रींना मनपुर्वक वंदन. तसेच मित्र,नातेवाईक,पाहुणे आणि स्नेहीजणांनी फेसबुक ,...

कविता संग्रह हिरवी पाती

Image
मनोगत कोरोना संसर्गापासून सुरक्षिततेसाठी लॉकडाऊन झाले.जैसे ते परिस्थितीत सगळं स्थिर झालं.घरातच ठाण मांडून बसावे लागले.चळवळ्या लोकांना जखडल्या सारखं झालं.घरीच बसून करावे काय?हा यक्ष प्रश्न नजरेसमोर उभा ठाकला.टी.व्ही.किती वेळ पहायचा, वर्तमानपत्राची पानं कितीवेळा चाळायची, घरच्या वाचनालयातील पुस्तके कितीवेळ वाचत राहणार, फेसबुक आणि व्हाटसअपवर कितीवेळ चॅटिंग करणार.मनाची उलघाल व्हायची. सगळं दैनंदिन रुटिनच बदललं. काळाबरोबर समायोजन साधावं लागलं.   अशा सैरभैर वेळी पत्रकार शिक्षकमित्र श्री सुनील शेडगे आणि केंद्रप्रमुख श्री दीपक चिकणे सरांनी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करा. तुमचे छंद जोपासा.लेखन आणि वाचनातून अभिव्यक्त व्हा.तुमच्या अविष्कारासाठी उपक्रमशील,छांदिष्ट आणि शिक्षक हितगुज समुहावर तुमची लेखनशैली बहरु द्या.असा मित्रत्वाच्या नात्याने मौलिक सल्ला देवून लेखनातून व्यक्त होण्याची उर्मी निर्माण करण्याची प्रेरणा दिली.एका आशेच्या किरणाला प्रेरणा मिळाली. जमतयका बघूया म्हणून जुने फोटो चाळताना साठवणीतल्या आठवणी जाग्या झाल्या. तदनंतर आत्तापर्यंतच्या झालेल्या भटकंती वर लेखन करायला ...