कविता आनंदाची शाळा



              आनंदाची शाळा 
गावाचा अभिमान आमचा अभिमान 
सातारा जिल्हा परिषदेची शाळा 
आनंदी वातावरणात आनंद पेरणारी 
सातारा जिल्हा परिषदेची शाळा |१|

 ज्ञान विज्ञान कला आणि क्रीडा 
कृतियुक्त शिक्षणाचा फुलवूया मळा
सातारा जिल्हा परिषदेच्या शाळेत 
शिकायला बाळांना लावूया लळा|२|

सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी 
केंद्र ते जिल्हास्तरीय विविध स्पर्धा 
कलाविष्काराला बालआनंद मेळा
केंद्र ते जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा |३|

अभिव्यक्तीला वाव आनंददायी शनिवारी 
अभ्यास सहलींतून भटकंतीची वारी
विविध स्पर्धा परीक्षांचा पॅटर्न सातारी 
 जिल्हा परिषदेची शाळाच लय भारी |४|

अवांतर गोष्टींची पुस्तकं वाचून 
परिचयाची वाचनउत्सवात संधी 
बालसाहित्य,ईबुक्स वाचनाच्या 
आवडीने विद्यार्थी बनतील छंदी |५|

शाळेच्या परसबागेत फुलतो 
भाजीपाल्याचा फळांचा बहार 
शारीरिक तंदुरुस्तीला त्रिस्तरीय 
सकस स्वादिष्ट पोषण आहार  |६|

नाविन्यपूर्ण विज्ञान केंद्रात 
कृतीयुक्त अध्ययनअनुभव 
 गुणवत्ता संवर्धनासाठी 
उपक्रम सगळे अभिनव |७|

श्री रवींद्रकुमार लटिंगे 
शाळा माझेरी पुनः ता.फलटण

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड