पुस्तक परिचय क्रमांक:२२४ रसीदी टिकट
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२२४
पुस्तकाचे नांव-रसीदी टिकट
लेखक:अमृता प्रीतम
अनुवाद -मुरलीधर शहा
प्रकाशन-श्रीविद्या प्रकाशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती -सहावी आवृत्ती २०२२
पृष्ठे संख्या–१७१
वाड़्मय प्रकार-कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य-२५०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२२४||पुस्तक परिचय
पुस्तकाचे नांव: रसीदी टिकट
लेखक: अमृता प्रीतम
अनुवाद -मुरलीधर शहा
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚
पंजाबी साहित्यातील एक सर्वश्रेष्ठ प्रतिभा! भारतीय वाड्मय सृष्टीचं एक अपूर्व देणं अमृता प्रीतम! पद्मविभूषण आणि पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या भारतीय ज्ञानपीठ व साहित्य अकादमी पारितोषिक विजेत्या लेखिका अमृता प्रीतम यांच्या हिंदी आवृत्तीचा अनुवाद मुरलीधर शहा यांनी मराठी भाषेत पुस्तकाचे नांव जसेच्या तसे ‘रसीदी टिकट’ठेवून केले आहे.
अक्षरांची रंगावली रेखाटणाऱ्या ‘लेखणी’विषयी अमृता प्रीतम याचं अतिशय सुंदर काव्य आहे.
जिने आपल्या अंकावर मला खेळवलं होतं
आणि जिने माझ्या आईच्या आईला जन्म दिला होता,कुठूनतरी धावत आली.आपल्या हातात काही अक्षरं घेऊन आली अन् म्हणाली,यांना छोट्या काळ्या रेषा समजू नकोस रेषांचे हे पुंजके तुझ्या आगीचे समर्पक आहेत.आणि नंतर हे सांगता सांगता ती पुढे निघून गेली
‘तुझ्यातल्या आगीचं आयुष्य या अक्षरांना लाभो.’
अमृता प्रीतम या पंजाबी, हिंदी आणि भारतीय साहित्याचा एक महान स्तंभ राहिल्या आहेत,ज्यांनी स्त्रीवाद, विभाजन, मानवी पीडा आणि स्वातंत्र्य या विविध विषयांवर लेखन केले.त्यांचा आवाज आजही कथा कादंबरी आणि कवितेतून प्रेरणा देतोय.
नाना प्रकारचे अपमान,पदरी दारुण निराशा आणि सामाजिक व साहित्यिक जीवनात होणारी जीवघेणी कोंडी या सर्वांवर मात करून चालणारी एक जगतविख्यात प्रतिभावंत साहित्यकर्ती अमृता प्रीतम यांची ‘अक्षरयात्रा’म्हणजे ‘रसीदी टिकट’ होय.
रसीदी टिकट म्हणजे आपण कोणताही व्यवहार केला की ज्याला त्याच्या कामाचा मोबदला किंवा खरेदीची किंमत अंदाज करणाऱ्याची पावतीवर तिकिट (रेव्हेन्यू तिकीट) लावून सही घेतो ते तिकीट. आयुष्य म्हणजे एखादी लहान घटना पावतीच्या तिकीटा एवढी…अनुवादक डॉ.
मुरलीधर शहा यांचा‘लुक एक बिट हायर!’
हा या पुस्तकाची कहाणी अधोरेखित करतो.
लेखिका अमृता प्रीतम यांचा संक्षेपाने पण या कादंबरीचा अंतरंग जमाखर्चाच्या तिकीटासारखा आहे.कारण इतर तिकीटांचा आकार बदलतो पण या पावतीच्या तिकीटाचा आकार बदलत नाही. त्यांनी आजवर लिहिलेल्या कविता कादंबऱ्यांच्या कच्च्या जमाखर्चाची पावती पक्की करण्यासाठी ‘रसीदी तिकट’या कादंबरीचे लेखन केले आहे.
‘रसीदी टिकट’ही अमृता प्रीतम या श्रेष्ठ साहित्यकर्तीची आत्मकथा आहे.तिच्या अग्निज्वालांमधून उमटलेले शतदल.ही एकार्थाने सत्यापासून सत्यापर्यंत पोहचण्याची प्रक्रिया होय.या पुस्तकात खरंअसलेल्या पण प्रत्यक्षात कधीही साकार न झालेल्या स्वप्नांची आखीवरेखीव मांडणी केली आहे.तिला आलेलं कटु व दाहक अनुभव वास्तवपणे रेखाटले आहेत.तर तरल भावात्मकता व भेदक वास्तव अचूकपणे अनुवादक डॉ मुरलीधर शहा यांनी मांडले आहे.
प्रस्तुत कादंबरीत लेखिकेने तिच्या अंतरंगात डोकावून बालपण ते साहित्यिक प्रवास शब्दबध्द केला आहे.काही घटना प्रसंग लेख स्वरूपात असून त्यांना शिर्षक दिले आहे.तर डायरीत परदेशातील प्रवासाच्या नोंदी तारखेसह तपशीलवार दिल्या आहेत.प्रवासाची डायरी,पाचशे वर्षांची यात्रा, सत्याची बीजं,काळ्या ढगांच्या सोनेरी कडा, अग्निस्नान,इमरोज,एक क्रम, वर्तमानपत्रांची अजब टिपणे, धर्मयुद्ध, घटना -पाहिलेल्या! ऐकलेल्या! घडलेल्या!,कल्पनेची जादू,एका लेखकाची इमानदारी,काळे ढग आदी विश्लेषणात्मक लेख काव्य आणि त्यातील घटना प्रसंग ठळकपणे दिसून येतात.तर जात-फिनिक्स पक्षांची हे दीर्घकाव्य उगवणाऱ्या आणि मावळणाऱ्या सूर्याचे पंजाबी भाषेतील काव्य अर्थासह वाचनीय आहे.आणि
तदनंतर एका डायरीचे पान हा लेख दैनंदिन लेखनाची सवय कशी लागली याची जाणीव करून देतो.इमरोज़ (चित्रकार) यांच्याशी असलेलं त्यांचं प्रेमसंबंध,तसेच साहिर लुधियानवी या प्रसिद्ध शायरबाबतचं त्यांचं एकतर्फी प्रेम, तसेच विवाह, समाज,लेखन, स्त्री-पुरुष संबंध यावरही निर्भीड भाष्य केलं आहे
अतिशय परखडपणे भोगलेलं सोसलेलं अनुभवलेलं जीणं त्यांनी शब्दबध्द केले आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक- १२जून २०२५
Comments
Post a Comment