श्री सुनील भिसे सेवापुर्ती समारंभ








आमचे ओझर्डे गावचे शिक्षक मित्रवर्य श्री सुनील जगन्नाथ भिसे ३७.५ वर्षाच्या प्रदीर्घ शैक्षणिक सेवेतून नियत वयोमानानुसार ३१ मे २०२५रोजी सेवानिवृत्त झाले.त्यांच्या सेवापुर्ती सेवागौरव समारंभात सुत्रसंचलन, प्रस्ताविक आणि सन्मानपत्र वाचन अशी
 तिहेरी संधी मिळाली.... तसेच शैक्षणिक कार्याचा आलेख शब्दांकनात 
करण्याची संधी मिळाली.
 त्यांना सेवापुर्तिच्या हार्दिक शुभेच्छा!! आणि निरामयी आरोग्यासाठी सदिच्छा!!!

भिसे सरांनी सामाजिक बांधिलकी म्हणून आपुलकी मतिमंद शाळा,वाई अक्षर इन्स्टिट्यूट,
यशोधन निराधार आश्रम आणि संजय गायकवाड सामाजिक विकास संस्था पाचवड या संस्थांनी ५० हजार रुपायांची आर्थिक मदत केली.तसेच त्यांचे सुपुत्र सत्यम् लिखित,' गॉडस् फेवरेट चाईल्ड 'या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. आपल्या जेष्ठ बंधू श्री विश्वास आणि श्री हणमंत ,बहिणी शालन विमल आणि शांता 
यांचा माझ्या यशामागे आईवडिलांच्या संस्कारांइतकाच वाटा माझ्या बहिण-भावांचा आहे, कारण त्यांनीच माझे शिक्षण पूर्ण होवून नोकरीला  लागेपर्यंत साथ दिली. मदतीचा हात दिला.
 आईवडिलांनंतर केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करुन व्यासपीठावर स्थान दिले. असा हा घरगुती समारंभ 
डीएडचे मित्रपरिवार,किकली केंद्रातील सर्व शिक्षक, आप्तेष्ट आणि ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सेवाप्रारंभ आणि सेवापुर्ती या दोन शब्दांमधील यशस्वी वाटचाल म्हणजे आपण शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घकाळ केलेली तपस्या...*
अध्यापक, स्कूलमास्तर पदवीधरशिक्षक ते मुख्याध्यापक अशी शैक्षणिक वाटचाल करीत ३७.५ वर्षाच्या प्रदीर्घ ज्ञानसेवेतून शिक्षकमित्रवर्य श्रीमान   सुनील भिसे सर मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त होत आहेत.शैक्षणिक कार्यकर्तृत्वाची पताका फलटण,वाई आणि सातारा या तिन्ही तालुक्यातील शाळेत फडकवत ठेवून विदयार्थ्यांची  सर्वांगीण गुणवत्ता  उंचावण्यासाठी आपण केलेले प्रयत्न म्हणजे आम्हा शिक्षकांसाठी प्रेरक दीपस्तंभच..
शिक्षणातून देशसेवा, शिक्षणातून प्रगती, शिक्षणातून उजळतो इतरांना उजळविणारा एक ज्ञानदीप…सेवागौरव एका तेजस्वी सेवाव्रती ज्ञानगुरुचा..
जीवनातील वसंत हा अनुभवांचा प्राजक्त सडा…
हजरजबाबी आणि अभ्यासूवृत्तीचा घेऊ आम्ही धडा…
आरोग्य संपदा तुम्हाला लाभो हीच मनापासून सेवापुर्तीची शुभेच्छा….

Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड