पुस्तक परिचय क्रमांक:२२५ साक्षेप




वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-२२५
पुस्तकाचे नांव-साक्षेप
लेखक: डॉ.रवींद्र शोभणे
प्रकाशन-दिलीपराज प्रकाशन,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती -प्रथमावृत्ती २०२३
पृष्ठे संख्या–१६४
वाड़्मय प्रकार-समिक्षण
किंमत /स्वागत मूल्य-२००₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
२२५||पुस्तक परिचय 
पुस्तकाचे नांव: साक्षेप 
लेखक: डॉ रवींद्र शोभणे
📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚📚 
कथा, कादंबरी, समीक्षा, संपादन, व्यक्ती रेखाटन अशा साहित्याच्या विविध क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटविणारं मराठी साहित्यातील एक आघाडीचं नांव डॉक्टर रवींद्र शोभणे.
प्रतिभावंत लेखकांनी निर्माण केलेल्या साहित्य लेखनाचा शोध घेऊन त्याचे समिक्षण करून रसिक वाचकांना पुन्हा नव्याने पुस्तक वाचण्याचा आनंदानुभव उपलब्ध करून देणे.याच हेतूने अनेक लेखक कवींच्या साहित्यांचे समिक्षण डॉ.रवींद्र शोभणे यांनी ‘साक्षेप’या समिक्षणपर ग्रंथात लेख समाविष्ट केले आहेत.लेखक तसेच कवी यांच्या साहित्य लेखनाचे मर्म शोधण्यासाठी त्यांनी बारा लेखकांच्या साहित्याचे समिक्षण केले आहे.तसेच पहिल्या मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनात अध्यक्ष म्हणून केलेल्या बीजभाषणाचा आणि काळाची चिरंतन मूल्ये मी कादंबरीतून मांडतो.ही डॉक्टर कुळकर्णी यांनी लेखकाची साहित्य लेखन प्रवास समजून घेण्यासाठी घेतलेली मुलाखत उत्तरार्धात समाविष्ट केली आहे.आणि लेखकाचा वाड्मयीन परिचय दिला आहे.मराठी कथा आणि कादंबरीच्या क्षेत्रात लक्षणीय कामगिरी केली आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि धार्मिक जीवनातील ताणतणाव त्यांच्या लेखनातून व्यक्त होतात.त्यांनी ‘साक्षेप’हा समीक्षा ग्रंथ जगण्याच्या वाटा समृद्ध करीत नवी दृष्टी देणाऱ्या पुस्तकांना समर्पण केले आहे.
‘साक्षेप’ समिक्षा ग्रंथात नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कथासंग्रहातील कथाविश्वाचे अंतरंग समर्पक शब्दात उलगडून दाखविले आहेत. लेखक भारत सासणे यांच्या लघुकादंबऱ्या वाचकांना काय वैचारिक खाद्य देतात.याचे विवेचन केले आहे.त्यांनी गावच्या मातीतली व्यक्तिरेखा केंद्रस्थानी ठेवून कथा लिहिल्या आहेत.प्रतिभा सराफ यांच्या कवितांचे भावविश्व ‘अलवार दु:खाची प्रचीती’पटवून दिली आहे.
जगण्याचे संदर्भ हरवले,तू नसल्यावर 
शब्दांचेही अर्थ बदलले,तू नसल्यावर 
तुझा चेहरा दिसू लागला मुलीत आता
जगण्याचे मी पुन्हा ठरवले,तू नसल्यावर 
कवयित्रीने स्त्रीच्या भावजीवनाच्या अनेकविध छटा रेखाटल्या आहेत.त्यांच्या कवितासंग्रहाचे वैशिष्ट्य अधोरेखित केले आहे.वेगळी शब्दकळा आणि प्रतिमाविश्व घेऊन अनवटतेची ढाल समोर करून साहित्य विश्वात प्रवेश केलेल्या कवी ग्रेस (माणिक सीताराम गोडघाटे)यांच्या ललितसंग्रहाचे विश्लेषण‘कावळे उडाले स्वामी’: धुक्यापलीकडे…?या लेखातून पटवून दिले आहे.
अभिजात कलाकृतीचा श्रीमंत अनुवाद:द ग्रेप्स ऑफ रॉथ या लोकप्रिय कादंबरीचा श्री.मिलिंद चंपानेरकर यांनी केलेला अनुवाद.मराठी कथेचा मानदंड: शांताराम, तत्त्वचिंतक कादंबरीकार:डॉ.एस.एल. भैरप्पा यांच्या कादंबरीवर समर्पक शब्दात विवेचन केले आहे.त्यांनी भारतीय प्राचीन परंपरा ते आधुनिक जीवनशैली,धर्म-जात 
व्यवस्था, प्रसिध्दी माध्यमे,कला क्षेत्रे अशा मानवी जीवनाला व्यापणाऱ्या विषयावर कादंबरीचे लेखन केले आहे.तसेच सुपरिचित लेखक नागनाथ कोत्तापल्ले यांच्या कादंबरीलेखनाचे समिक्षण यथार्थ शब्दात मांडले आहे.मध्यरात्र,पराभव, गांधारीचे डोळे या कादंबरीतील आशय, पात्रे आणि विचारधारा यावर समिक्षण केले आहे.
मराठी लेखकांचे राजकीय आकलन या लेखात सिंहावलोकन करत,आत्तापर्यंतचा आलेख समर्पक शब्दात मांडला आहे. मुक्तात्मा,आशा,प्रवासी ,टारफुला, गांधारी,सत्तांतर आणि सिंहासन आदींचे विवेचन केले आहे.तर पुढील‘माणसांच्या उभ्या - आडव्या नात्यांची कहाणी क्ष चा उलगडा केला आहे.या कादंबरीचे लेखक वसू भारद्वाज.मुंबईतल्या गिरणी कामगार चळवळीचे नेते दिनकर पेडणेकर कादंबरीचे नायक.१६५ दिवस चाललेल्या 
संपाचा निर्णय न लागल्याने कामगार देशोधडीला लागतात याचे शब्दचित्र ‘क्ष’ मध्ये आहे. त्याचे विश्लेषण केले आहे.पुन्हा नव्याचा सातत्याने शोध घेणारा लेखक: नागनाथ कोत्तापल्ले यांच्यावरील लेख आहे.२०२३साली पणजी गोवा येथे संपन्न झालेल्या ‘पहिले मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष म्हणून अध्यक्षीय भाषणाचा लेख.
‘साक्षेप’या समिक्षा ग्रंथामुळे लोकप्रिय साहित्यिकाच्या अक्षरग्रंथाचे(पुस्तकांचे) समिक्षण कसं असावं याचं मुर्तिमंत उदाहरणं म्हणजे डॉ.रवींद्र शोभणे यांचे समिक्षा लेख.अतिशय समर्पक शब्दात आणि प्रवाही शैलीत त्यांनी समिक्षण केले आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक- १३जून २०२५



Comments

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड