पुस्तक परिचय क्रमांक:१९७ गोपीची डायरी



वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-१९७
पुस्तकाचे नांव-गोपीची डायरी
लेखकाचे नांव--सुधा मूर्ती 
अनुवादक -लीना सोहोनी
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती मे २०२४
एकूण पृष्ठ संख्या-१६६
वाङ् मय प्रकार ---बालसाहित्य 
मूल्य--४९५₹
📖📚📚📚📚📚📚📚📚📚  
 १९७||पुस्तक परिचय
    गोपीची डायरी 
लेखक- सुधा मूर्ती 
अनुवादक -लीना सोहोनी 
#########################
कथाकार आणि कथालेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी पाळीव प्राण्यांच्या कुतूहल निर्माण करणाऱ्या कथांचे लेखन केले असून वनभटकंतीकार मारुती चितमपल्ली यांनी जंगलातील प्राण्यांच्या चित्तरकथा सुंदर शब्दात गुंफलेल्या आहेत.रसिक मनावर कथा, कादंबऱ्यांच्या माध्यमातून मोहिनी घालणाऱ्या सिद्धहस्त लोकप्रिय  लेखिका सुधा मूर्ती यांनी ‘गोपीची डायरी’या पुस्तकात गोपीची कहाणी आहे.
  गोपी हा मनुष्यप्राणी नसून प्रेमळ कुटूंबाने दत्तक घेतलेला ‘गोपी’कुत्रा आहे.सुधा मूर्ती यांच्या खास शैलीतून उतरलेल्या गोष्टीचा नायक गोपी स्वतःशीच बोलत त्याचा जीवनप्रवास उलगडत आहे. सुरुवातीला छोटसं पिल्लू असलेला गोपी नंतर मात्र खोडकर आणि खट्याळ होतो. त्याच्या आयुष्यात आणखी दोन सोबती कुत्रे सुद्धा येतात. प्रेमळ कुटुंबांचा गोपी हा एक चिरंतर ऊर्जेचा आणि चैतन्याचा झराच. गोपीच्या आयुष्यात असा एक दिवस येतो की त्याच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आश्चर्याचा धक्का त्याला त्या दिवशी बसतो. त्याच्या आयुष्यात नवीन आकर्षणं निर्माण होतात आणि त्याला एक नवीन मैत्रीण सुद्धा मिळते. आकर्षक अशी ‘नोव्हा’.ते दोघे मिळून त्यांचं स्वतःचं कुटुंब निर्माण करतात.लेखिका सुधा मूर्तींच्या लेखनाची ख्याती असलेल्या रसिक वाचकांना खरंतर बालवाचकांना हा गोपी खूप आनंद देऊन जाईल आणि आपल्या छोट्या पावलांनी त्यांच्या हृदयात शिरकाव करून,तिथं कायमचं स्थान मिळून बसेल यात शंकाच नाही. अशी सुंदर कथा ‘गोपीची डायरी.’ सुधा मूर्ती यांनी रेखाटलेली आहे आणि तिचा मराठी मध्ये अनुवाद लीना सोहोनी यांनी केलेला आहे.
अतिशय आकर्षक असं मुखपृष्ठ आणि गोपीचा जीवनप्रवास अधोरेखित करणारा मलपृष्ठावरील ‘ब्लर्ब'अप्रतिम आहे. पुस्तकाचा लेखन टाईप मुलांना वाचायला सहजगत्या येईल असा असून. प्रत्येक पानावर आशयाशी निगडीत सुंदर आकर्षक रंगीबेरंगी छायाचित्रांची रेलचेल आहे. सर्व चित्रे कुटूंबिय आणि गोपीची आहेत.मुखपृष्ठाच्या आतील पानावर गोपीचा संदेश दिला आहे.त्याच्या गंमतीदार गोष्टी  मुलांना निश्चितच आवडतील इतक्या सुंदर शब्दात तो आपणाला सांगतोय. गोपीच्या डायरीत गृहप्रवेश,प्रेम गवसलं आणि मोठं होताना असे मुख्य तीन भाग असून पहिल्या भागात आठ कथा आहेत.तर अनुक्रमे दुसऱ्या भागात पाच तर तिसऱ्या भागात नऊ गोष्टींचा समावेश केला आहे.गोपीच्या विविध भावमुद्रा आपणाला पानोपानी दिसतात.
या डायरीत त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटना प्रसंगांचे वर्णनात्मक नोंदी डायरीत आहेत. ‘गृहप्रवेश’ विभागात एक नवीन जग,माझं घर, नामकरण सोहळा,ढेकर, डॉक्टरांची भेट,पिशवीभर खेळणी, मुलींची भेट,शेअरिंग इज केअरिंग इत्यादी गोष्टी आहेत.तर ‘प्रेम गवसलं’ या प्रकरणात हॅपी बर्थडे डे टू मी!,आयुष्य -एक सुंदर स्वप्न, ऑफिसातला एक दिवस, आमचं एक कुटुंब, अखेर प्रेम मिळाले!आणि ‘मोठं होताना’या उत्तरार्धात उन्हाळ्यातल्या उबदार दिवशी, थंडगार स्विमिंग पूलमधली मजा,माझा पहिला हेअर कट,मी एक सेलिब्रिटी, शेताला भेट,सुट्टीचे झकास दिवस, प्रेमात पडणं, आनंदी आनंद,मी चोर पकडून दिला.असे घटना प्रसंग गोपी स्वगत आपणास ‘गोपीची डायरी’ या कहाणीत सांगतोय…गोपीचे लाडकरणारं, संवेदना जाणणारं एक प्रेमळ कुटुंब म्हणजे लेखिका सुधा मूर्ती यांच्या परिवार आहे.अतिशय समर्पक शब्दात एका श्वानाचे स्वगत गुंफले आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा 
लेखन दिनांक ५जानेवारी २०२५

Comments

  1. खूपच छान संवेदनशील आशय मांडणी👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गावच्या आठवणी यात्रेतील- लोकनाट्य तमाशा

गावचे वैभव -ग्रामदैवत श्री पद्यावती देवी

गावाकडच्या आठवणी यात्रा-कुस्तीचा फड