पुस्तक परिचय क्रमांक:१९३ मंतरलेले बेट
वाचन साखळी समूह महाराष्ट्र राज्य
पुस्तक परिचयकर्ता-श्री रवींद्रकुमार गणपत लटिंगे ओझर्डे-वाई
पुस्तक परिचय क्रमांक-१९३
पुस्तकाचे नांव-मंतरलेले बेट
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथम आवृत्ती १डिसेंबर २०२४
पृष्ठे संख्या–१२४
वाड़्मय प्रकार- अनुवादित कादंबरी
किंमत /स्वागत मूल्य--१२०₹
📖✒️📚📚📚📚📚📚📚📚📚
१९३||पुस्तक परिचय
मंतरलेले बेट
लेखक: व्यंकटेश माडगूळकर
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
मंतरलेले बेट ही कादंबरी ‘बिग सिटी, लिट्ल बॉय’लेखक मॅन्युअल कॉमरॉफ यांच्या लिखीत कादंबरीचा अनुवाद कथालेखक थोर साहित्यिक व्यंकटेश माडगूळकर यांनी केलेला आहे.न्यूयाॅर्क शहरातल्या ‘मॅनहटन’या अद्भुत रम्य बेटाची महती रेखाटली आहे.निसर्गात भटकंती करणं मनाला ताजेतवाने करतं.
कर्णकर्कश आवाज,सततच्या कामाच्या व्यापातून मनाला शांतता लाभावी म्हणून आपली पाऊलं भटकायला उत्सुक असतात.पण काही लेखकांची प्रवासवर्णने वाचताना त्या ठिकाणाचा माहोल आपल्या नयनचक्षूंसमोर उभा राहतो.अन् त्यात परदेशी पर्यटन स्थळांचे वर्णन असेल,तर वेगळाच वाचनाचा अनुभव रसिकांना मिळतो.इतकं सुंदर स्थळांचे वास्तवदर्शी शब्दचित्र लेखणीतून निर्माण झालेले आहे.
या कादंबरीत एकूण पाच भाग आहेत. मंतरलेले बेट,नवे शतक,वसंत ऋतू, स्वातंत्र्य आणि घडाभर अनुभव…
माझ्या नव्या डोळ्यांनी बघितलेले हे सगळे जग किती सुंदर होते!जगातल्या सगळ्या जातीजमाती न्यूयॉर्क शहरामध्ये गुण्यागोविंदाने एकत्र नांदत होत्या.काळे, गोरे,भटके,तांबडे, जिप्सी सगळे शेजारी शेजारी राहत होते.अशा सरमिसळीतून अमेरिकन माणूस जन्माला.नानाविविध प्रकारचे व्यावसायिक कौशल्य व हुन्नर बरोबर घेऊन आहे आहेत. ‘मॅनहटन’ म्हणजे एक लहानसे जगच होते.लेखक म्हणतात की, “या जगात माझा जन्म झाला.याच गावावर माझा जीव जडला. ’’इथे त्यांना बोटी,रेल्वे बघायला मिळाल्या.तसेच बाजारपेठ, मंडई, रस्ते, घोड्यांचा बाजार, विविध दुकाने.अन् आवडते ठिकाण होतं -सेंट्रल पार्क. तळ्यात बोटिंग करून मग हिरव्यागार लुसलुशीत गवताळ बागेत हुंदडत फिरावे.प्राणीसंग्रहालयातील प्राणी निरखून बघावेत.या शहरात कुठेही भटकायला बाहेर पडलो,तिथं माणसाचं मन रमणारच्.
ते दरवर्षी पणजोबाची समाधी बघायला जात.तिथे त्यांनी वृक्षारोपण करुन छोटीशी बाग बनविली आहे.अचानक १८९८ साल्यातल्या फेब्रुवारी महिन्याच्या पंधरा तारखेला युनायटेड स्टेट्सचे लढाऊ जहाज क्युबातल्या हवाना बेटाजवळ कुणीतरी दारुगोळ्याने उडवून दिले.लोक गोंधळून गेले.युध्द होणार ! हा शब्द जिकडे तिकडे
ऐकू येऊ लागला. ‘युध्दस्य कथा रम्य:’या उक्तीप्रमाणे युद्ध सुरू होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असताना.शाळकरी मुलांना काय सुचते? त्यांच्या मनात कोणकोणतेविचार येतात. ते सैन्यात भरती व्हायला जातात.तिथले घटना प्रसंगांचे वर्णन अतिशय सुंदर शब्दात केले आहे.या काळात वर्तमान पत्रे कशी सनसनाटी बातमी अंक काढून छापतात. त्याचेही वर्णने सुंदर शब्दात मांडली आहेत.लेखकाचे देशप्रेम उफाळून आलेले असते.
‘रफ रायडर्स’या फलटणीत त्यांना भरती व्हायला जायचं होतं.पण वय कमी होते. त्यामुळे त्यांना संधी मिळाली नाही..मग लेफ्ट राईट करत ‘न्यूयॉर्क फायर झुएव्ह’ या प्रसिद्ध रेजिमेंटमध्ये दाखल झालो. चीनमध्येही युद्ध सुरू झाले होते.नवीन
वर्षाचे स्वागत करायला लोकं काय काय करतात.जगबुडी आणि वर्षाअखेरीस साजरे कसे करतात याचु ठळक वैशिष्ठ्ये मांडलेली आहेत.
नवे शतक, नवीन वर्षाच्या प्रारंभी आपण स्वागत कसे करतो?नवे शतक सुरू झाले म्हणून जीवनमानात बराच बदल घडू लागला.वीज आली. मोटारगाड्या धावू लागल्या. विमाने, सिनेमा आणि औषधाचा शोध लागला. नव्या काळाची जाणीव झाली. बदललेल्या नव्या जमान्यातील सुधारणेवर लेखकांनी आवर्जून फोकस केला आहे.न्यूयॉर्क शहर आणि मॅनहॅटन बेटाचे झालेले बदल परिवर्तन आणि विविधांगी देशोदेशीच्या जातीजमातींची वैशिष्टे कथन केली आहेत.
सुंदर शब्दांकनात प्रवासवर्णन केले आहे.
परिचयक:श्री रवींद्रकुमार लटिंगे वाई सातारा
लेखन दिनांक:२७डिसेंबर २०२४
Comments
Post a Comment